बहुतेक लोकांची सकाळ चहानेच होते. बरेच लोक दिवसातून अनेक वेळा चहा पितात. चहा म्हणजे अनेकांसाठी अमृतच. कामाच्या ठिकाणी रिफ्रेश करणारे एनर्जी ड्रिंक म्हणूनही चहाकडे पाहिले जाते. हल्ली अनेक ठिकाणी मातीच्या कपातून चहा (Kulhad Tea) दिला जातो. या मातीच्या कपाला कुल्हड असे म्हणतात. या मातीच्या कपातून चहा पिल्याने तुमच्या आरोग्यास अनेक फायदे होतात. कुल्हडचा चहा आपल्या आरोग्याला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचवत नाही.
कुल्हडमधून चहा प्यायल्याचे फायदे: (Benefits Of Kulhad Tea) संसर्गाचा धोका टाळू शकता: अनेकदा आपण दुकानात ज्या प्लास्टिकचे ग्लास किंवा कपमध्ये चहा पितो ते नीट धुतले जात नाहीत, त्यामुळे संसर्गाचा धोका निर्माण होतो. कुल्हडमध्ये चहा प्यायल्याने संसर्गाचा धोका टाळू शकता. कुल्हड एक इको-फ्रेंडली उत्पादन आहे, ज्यामध्ये चहा प्यायल्याने पोटातील अॅसिडिटीची समस्या दूर होते. त्यामुळे कोणत्याही चहाच्या टपरीवर कुल्हडमधूनच चहा प्या.
गॅसची समस्या होत नाही: कुल्हड चहामुळे पोटात एसिड तयार होत नाही. याशिवाय हा चहा प्यायल्यानंतर तुम्हाला आंबट ढेकर येणे आणि पचनाशी संबंधित समस्यांची काळजी करण्याची गरज नाही. चहा प्यायल्यानंतर गॅसची समस्या होत नाही.
आरोग्यासाठी हानिकारक: चहा प्यायल्याने कर्करोग , लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो, असे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. पण कागदाच्या बनवलेल्या आणि फक्त एकदाच वापरावयाच्या कपातून (once usable paper cups) चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. या कपामध्ये असलेल्या प्लास्टिक आणि इतर हानिकारक पदार्थांमुळे गरम द्रव पदार्थ दूषित होत असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले आहे. हे कप तयार करण्यासाठी, सहसा हायड्रोफोबिक फिल्मचा एक थर वापरला जातो. हा थर प्रामुख्याने प्लास्टिकचा बनलेला असतो. त्याच्या मदतीने, कपमधील द्रव टिकून राहतो. गरम पाणी घालल्यानंतर हा थर वितळण्यास सुरवात करतो.
कागदी कप धोकादायक: कागदी कपांमध्ये सुद्धा काही प्रमाणात प्लॅस्टिकचा अंश असतो. कपच्या आतील भागाला प्लॅस्टिकचा एक पातळ थर देण्यात येतो. या थरामध्ये प्लॅस्टिकसह इतरही काही हानिकारक पदार्थांचा समावेश असतो.