ETV Bharat / sukhibhava

'ही' थेरेपी अल्झायमर रोगाला आळा घालू शकते, अभ्यासातून समोर - अल्झायमर ईटीव्ही भारत

पीयर - रिव्ह्यू जर्नल एजिंगमध्ये प्रकाशित एका अभ्यासातून असे लक्षात आले आहे की, ऑक्सिजन थेरेपी ( oxygen therapy ) अल्झायमर ( Alzheimer ) रोगाची वाढ टाळू शकते. उंदरांवर केलेल्या एका संशोधनाच्या निष्कर्षातून असे समोर आले आहे की, अल्झायमर रोगामध्ये मेंदूत उद्भवणाऱ्या एका विशिष्ट थराची निर्मिती ऑक्सिजन थेरेपीने थांबवता येऊ शकते. याने हा आजार कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Jan 5, 2022, 5:40 PM IST

इस्त्रायलमध्ये तेल अवीव विद्यापीठाच्या शास्त्रज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासात अल्झायमरला ( Alzheimer ) रोखण्यासंबंधी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. उंदरांवर केलेल्या या संशोधनात शास्त्रज्ज्ञांना असे दिसून आले की, जर शुद्ध ऑक्सिजनला एका चेंबरच्या माध्यमातून दाबासह श्वासाच्या माध्यमातून घेतल्यास त्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते, आणि लोकांची संज्ञानात्मक क्षमता चांगली होती. टाईम्स ऑफ इस्रायलमध्ये प्रकाशित या अहवालानुसार, पशूंमध्ये ऑक्सिजन थेरेपी प्लाक ( brain plaque ) निर्मिती थांबवण्यात मदत करते.

संशोधनाच्या निष्कर्षांबाबत संशोधनाचे प्रमुख लेखक, प्राध्यापक उरी ऐशर सांगतात की, हे अल्झायमरचे कायम निदान होऊ शकते, असे मी मानत नाही. मात्र, या थेरेपीच्या मदतीने अल्झायमरची गंभीरता आणि त्याच्या प्रसाराच्या वेगाला मंद केले जाऊ शकते. परंतु, या दिशेने अजून अधिक शोध करणे गरजेचे आहे. पण, हे शक्य आहे की, काही वर्षांत लोकांना या थेरेपीचा लाभ मिळणे सुरू होईल.

संशोधनात उंदरांवर केले प्रयोग

या संशोधनात पशू प्रयोगांत उदरांचा समावेश करण्यात आला होता. प्रयोगादरम्यान अल्झायमर ( Alzheimer ) रोगात मज्जातंतूला होणाऱ्या नुकसान सारखे लक्षण असणारे, अनुवांशिकरित्या संशोधित 15 उदरांचा समावेश करण्यात आला होता. त्यांच्यावर ऑक्सिजन थेरेपीचा वापर करण्यात आल्यावर असे लक्षात आले की, ही थेरेपी मेंदूत एमलॉईडच्या ( amyloid ) निर्मितीवर प्रतिबंध तर घालतेच, त्याचबरोबर आधीपासूनच असलेल्या एमलॉईडच्या थराला देखील हटवते.

एमलॉईड हा न विरघळणारा प्रोटीन आहे, ज्यास अल्झायमर रोगात मज्जातंतूमध्ये होणाऱ्या नुकसानाची गंभीरता वाढवणाऱ्या घटकांमधून एक असल्याचे मानले जाते. प्रयोग केल्यानंतर थेरेपी मिळालेल्या उंदरांमध्ये एमलॉईडच्या थराच्या प्रमाणात एक तृतीयांश वाढ दिसून आली. तेच मेंदूत आधीपासूनच असलेल्या एमलॉईडच्या थराचा आकार सरासरी निम्म्याहून कमी झाला. अल्झायमरमध्ये, मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो, मात्र संशोधनकर्त्यांनी थेरेपी मिळालेल्या उंदरांच्या मेंदूतील रक्त प्रवाहात सुधारणा झाल्याची नोंद दिली.

ऐशरी सांगतात की, संशोधनात काही उंदरांना एका नियंत्रित गटामध्ये ठेवण्यात आले होते, ज्यांना ऑक्सिजन थेरेपी दिली नव्हती. अशा उंदरांमध्ये थेरेपी मिळालेल्या उंदरांपेक्षा अधिक एमलॉईडचे थर आढळून आले. संशोधनात पथकाने 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या 6 व्यक्तींना देखील विषय बनवले होते. ज्यांमध्ये अल्झायमरमुळे संज्ञानात्मक क्षमता खालवल्याची लक्षणे होती. अहवालानुसार, 90 दिवसांत ऑक्सिजन थेरेपीच्या 60 सत्रांनंतर सर्व व्यक्तींच्या मेंदूतील रक्त प्रवाहात सरासरी 20 टक्के सुधारणा झाली आणि स्मृती चाचण्यांमध्ये सरासरी 16.5 टक्के सुधारणा झाली.

ऐशरी सांगता की, विषयाच्या बाबतीत कमी मानुष्यांचा या प्रयोगामध्ये समावेश करण्यात आला होता. परंतु, त्यांच्या ऑक्सिजन थेरेपीचे लाभ प्रत्यक्षरित्या दिसून आले. त्याच वेळी उंदरांमध्ये देखील या थेरेपीचे फायदे मानवांसारखेच होते. या विषयात अधिक संशोधन केल्यास चांगले लाभ समोर येऊ शकतात, असे मत ऐशरी यांनी व्यक्त केले. अधिक संशोधनाने अशा लोकांना मदद मिळू शकते जे अल्झायमरच्या ( Alzheimer ) सुरुवाती आधी किंवा त्या दरम्यान संज्ञानात्मक क्षमता गमवून बसतात, असेही ऐशरी म्हणाले.

- आईएएनएस

हेही वाचा - आवडत्या वनस्पतींसाठी कुठली कुंडी निवडावी कळेणा? मग 'ही' माहिती वाचा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.