हैदराबाद : Orange Peel Benefits संत्री हे अतिशय चविष्ट आणि रसाळ फळ आहे. हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आढळतात, जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. संत्र्याची साल देखील खूप फायदेशीर आहे. यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फायबर, फोलेट असे अनेक पोषक घटक संत्र्याच्या सालीमध्ये आढळतात. ज्याचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. चला जाणून घेऊया संत्र्याच्या सालीचे फायदे.
- वजन कमी करण्यास उपयुक्त : संत्र्याच्या सालीमध्ये कॅलरीज कमी असतात. याशिवाय यामध्ये भरपूर फायबर असतं. जे भुकेवर नियंत्रण ठेवतं. तुम्ही तुमच्या वजन कमी करण्याच्या आहारात संत्र्याच्या सालीचा चहा समाविष्ट करू शकता. त्यामुळं वजन कमी होण्यास मदत होईल.
- फुफ्फुसासाठी फायदेशीर : संत्र्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणात आढळतं, जे फुफ्फुसांना अनेक प्रकारच्या संसर्गापासून वाचवतं.
- हृदयासाठी फायदेशीर : हृदय निरोगी ठेवण्यासाठी संत्र्याची साल खूप उपयुक्त आहे. त्यात फ्लेव्होनॉइड हेस्पेरिडिन असतं, जे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतं. याच्या मदतीने तुम्ही हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहू शकता.
- रक्तातील साखर नियंत्रित करते : संत्र्याची साले मधुमेही रुग्णांसाठी जादूचे काम करतात. यामध्ये असलेले पेक्टिन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते.
- पचनासाठी फायदेशीर : संत्र्याची साल पचनाच्या समस्या कमी करण्यासाठी गुणकारी आहे. ज्यांना अपचन किंवा बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांच्यासाठी ही सालं खूप फायदेशीर ठरू शकतात. त्यामध्ये असलेलं पेक्टिन पोटात चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करतं. पचनाच्या समस्या कमी करण्यासाठी तुम्ही संत्र्याच्या सालीचा चहा पिऊ शकता. हे रिकाम्या पोटी पिणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
- त्वचेसाठी चांगले : संत्र्याची साल आपल्या त्वचेसाठी वरदानापेक्षा कमी नाही. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर हे औषधापेक्षा कमी नाही. त्याची पावडर मधात मिसळून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. तुमचा चेहरा चमकेल आणि डागही नाहीसे होतील.
- झोपेसाठी उपयुक्त : जर तुम्हाला शांत झोप येत नसेल तर संत्र्याची साल पाण्यात टाकून कुस्करून प्या. हे नियमित केल्याने तुम्हाला रात्री चांगली झोप मिळेल.
हेही वाचा :