अटेन्शन डेफिसिट हाइपरअॅक्टिव्हिटी डिसऑर्डरग्रस्त (एडीएचडी) बहुतांश मुलांमध्ये कालांतराने म्हणजेच, प्रौढ झाल्यावर या विकाराचा प्रभाव कमी दिसून येतो. नुकत्याच झालेल्या एका आभ्यासात असे लक्षात आले आहे की, केवळ 10 टक्के मुलांमध्ये मोठे झाल्यावर याचा जेवढा तीव्र प्रभाव दिसून येत नाही, तेवढा प्रभाव कमी वयात दिसून येतो. या आभ्यासातून असे लक्षात येते की, प्रौढत्वामध्ये या विकाराचे लक्षण वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होऊ शकतात.
अमेरिकन जर्नल ऑफ साइकेट्रीमध्ये प्रकाशित युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसिनच्या एका संशोधनात संशोधकांनी सांगितले की, अटेन्शन डेफिसिट हाइपरअॅक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी) मनोविकाराने पीडित मुलांमध्ये केवळ 10 टक्केच मुले अशी असतात जी प्रौढ झाल्यानंतर त्यांच्यामध्ये या विकाराचे परिणाम दिसून येतात. हे उल्लेखणीय आहे की, अनेक दशकांच्या विविध संशोधनात एडीएचडीला एक असे न्यूरोबायोलॉजिकल डिसऑर्डर म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहे, ज्याचे लक्षण सामान्यत: बालपणात पहिल्यांदा दिसून येतात. पूर्वी केलेल्या या आभ्यासांमध्ये असे मानले गेले आहे की, सुमारे 50 टक्के प्रकरणांमध्ये एडीएचडीची लक्षणे प्रौढ झाल्यानंतरही राहतात.
संशोधनाचे निष्कर्ष
या आभ्यासात संशोधक आणि वॉशिंग्टन विद्यापीठातील मनोचिकित्सा आणि वर्तणूक विज्ञानाचे सहयोगी प्राध्यापक, मार्गरेट सिबली सांगतात की, एडीएचडीने पीडित लोकांना हे समजून घेणे गरजेचे आहे की, त्यांच्या जीवनात कधीही अशी परिस्थिती किंवा वेळ येणे सामान्य आणि स्वाभाविक आहे जेव्हा त्यांच्या अतिवर्तनामुळे गोष्टी नियंत्रणाबाहेर होऊ शकतात.
संशोधकांनुसार, जर एडीएचडीग्रस्तांना दोन गटांमध्ये विभागले तर, पहिल्या गटात गोंधळ (disorder), विस्मरण, कामावर टिकून राहण्यात अडचण, अतिसंवेदनशील किंवा आवेगपूर्ण लक्षणे आणि दुसऱ्या गटामध्ये खूप अधिक उर्जा असणे जसे, इकडे - तिकडे पळणे आणि वस्तूंवर चढणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. तेच प्रौढांमध्ये सामान्यत: एडीएचडीचे परिणाम शाब्दिक आवेग, निर्णय घेण्यात अडचण आणि विचार न करता कृती करणे, यांतून दिसून येतात. संशोधकांच्या मते, हा विकार पीडितांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतो.
शोधकर्ता सांगतात की, एडीएचडीग्रस्त लोक हाइपर फोकस करण्याची एक अद्वितीय क्षमतेबाबतही सांगतात. ऑलिम्पिक अॅथलिट माइकल फेल्पस आणि सिमोन बाइल्सनी देखील उघडपणे त्यांच्या एडीएचडी विकाराची पुष्टी केली आहे. संशोधकांच्या मते, हा विकार सुमारे 5 ते 10 टक्के लोकसंख्येवर परिणाम करतो. या संशोधनाच्या आभ्यासासाठी संशोधकांच्या पथकाने 16 वर्षांपर्यंत एडीएचडी असणाऱ्या 558 मुलांच्या गटाचे निरीक्षण केले, ज्यांचे वय 8 ते 25 वर्षांपर्यंत होते.
संशोधनात गटाचे आठ मुल्ल्यांकन करण्यात आले होते, ज्यात मुलांमध्ये (subject) अजूनही एडीएचडीची लक्षणे आहेत का? हे निर्धारित करण्यासाठी मुलांचे (subject) दर दोन वर्षांनी निरीक्षण करण्यात आले. याकाळात मुलांच्या पालक आणि शिक्षकांकडून माहिती देखील घेण्यात आली.
काय आहे अटेंशन डेफिसिट हाइपरअॅक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी)
'ईटीव्ही भारत सुखीभव'च्या तज्ज्ञ आणि ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वीणा कृष्णन सांगतात की, एडीएचडी हा मेदूशी संबंधित विकार आहे, जो केवळ मुलांमध्येच नाही, तर मोठ्यांमध्ये देखील दिसू शकतो. या विकाराचा परिणाम म्हणून मुले सहसा कुठल्याही कार्यामध्ये किंवा वर्तनात अतिसक्रियता दाखवतात. एडीएचडीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास मुलाच्या मानसिक स्थितीवर नकारात्मक परिणाम दिसू लागतात. सामान्यत: मुले असो किंवा मोठे, ही मानसिक स्थिती किंवा आजार झाल्यास त्यांच्या वर्तनात खूप बदल दिसून येतो. स्मरणशक्ती कमकुवत होते आणि कोणत्याही गोष्टीवर त्यांना लक्ष केंद्रित करता येत नाही. या विकारासाठी कुटुंबात तणावपूर्ण वातावरण, कोणती मज्जातंतुविज्ञानविषयक समस्या, पोषणयुक्त आहाराची कमतरता आणि दृष्टी दोष यांना जबाबदार मानले जाते, परंतु अनेकदा ही समस्या अनुवांशिक देखील असू शकते.
मुलांमध्ये, अतिसक्रियता ज्यामुळे एका ठिकाणी न बसणे, सतत चिंताग्रस्त किंवा अस्वस्थ राहणे, दुसऱ्यांचे लक्ष आकर्षित करण्याचे प्रयत्न करत राहणे, शाळा आणि घरी सर्व ठिकाणी बेजबाबदार असणे, दुसऱ्यांचे न ऐकणे, बहुतेक गोष्टी विसरणे, कोणत्याही कार्याला व्यवस्थित न करणे, ओरडने आणि अनेकदा दुसऱ्यांना मारहाण करणे यांसारखे मुख्य लक्षण दिसून येतात. तर, प्रौढांमध्ये एडीएचडीची लक्षणे अधिक प्रमाणात दिसून येतात, जसे एकाग्रता कमी होणे, विसरण्याचा आजार, विनाकारण नेहमी दुखी राहणे, खूप लवकर कोणत्याही गोष्टीविषयी अतिसंवेदनशील किंवा अस्वस्थ होणे, वैयक्तिक संबंधात जुळवून घेण्यात अडचण येणे इत्यादी.
हेही वाचा - गर्भावस्थेत केशर खाण्याचा सल्ला का दिला जातो? वाचा..