हैदराबाद : आजकाल डेटिंग अॅप्सचा वापर अनेकजण करत आहेत. चांगले जीवनसाथी शोधण्यासाठी लोक डेटिंग अॅप्सचा वापर करतात. जर तुम्हीही डेटिंग अॅप वापरत असाल तर तुम्ही त्याच्याशी संबंधित काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. डेटिंग अॅप वापरण्याचे काही तोटे असू शकतात. हे अॅप वापरत असताना तुमची स्वतःची सुरक्षितता पाहणे देखील खूप महत्वाची आहे. अनेकवेळा लोक डेटिंग अॅप्सवरून बनवलेल्या रिलेशनशिपमध्ये कोणत्या ना कोणत्या फसवणुकीत अडकतात. त्यामुळे डेटिंग अॅप वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे महत्त्वाचे आहे.
- लगेच भेटण्यासाठी तयार होवू नकात : जर तुम्ही डेटिंग अॅपद्वारे एखाद्याला भेटण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही आधी तुमच्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे. डेटिंग अॅपवर मॅच झाल्यानंतर लगेच एखाद्याला भेटण्याची प्लॅनिंग करू नका, त्या व्यक्तीला जाणून घेण्यासाठी तुमचा वेळ घ्या.
- डेटिंगच्या अगोदर व्हिडिओ कॉल : जर तुम्ही एखाद्याला भेटण्याचा विचार करत असाल तर डेटिंगच्या अगोदर व्हिडिओ कॉल करा, याद्वारे तुम्हाला समजेल की फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती तीच व्यक्ती आहे की नाही. तसेच तुम्ही समोरच्या व्यक्तीला त्याच्या बोलण्यातून आणि हावभावाने ओळखू शकाल.
- सार्वजनिक ठिकाणी भेटण्याची प्लॅनिंग करा : जर तुम्ही एखाद्याला पहिल्यांदा भेटण्याचा विचार करत असाल तर नेहमी सार्वजनिक ठिकाणी भेटण्याची योजना करा. उद्याने, कॅफे, रेस्टॉरंट इत्यादी ठिकाणे तुमच्यासाठी सुरक्षित असतील.
तुमच्या स्वतःच्या कॅबने किंवा कारने जा : जर तुम्ही एखाद्याला पहिल्यांदा भेटण्याचा विचार करत असाल तर नेहमी तुमच्या स्वतःच्या कॅबने किंवा कारने जा. जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवत नाही तोपर्यंत, त्याला तुम्हाला न्यायला येण्यास किंवा सोडायला जाण्यास सांगू नका. तुम्ही कोणाला आणि कुठे भेटायला जात आहात हे एखाद्या मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला माहीत असू द्या. तुमच्या सुरक्षा नियमात हे प्रथम करा.
हेही वाचा :