ETV Bharat / sukhibhava

ऑक्युपेशनल थेरपी तुमच्या आयुष्याला जीवन देते - cardiac

ऑक्युपेशनल थेरपीचा व्यवसाय हा पुनर्वसन उपचारांची एक शाखा असून विविध वयोगटांतील लोकांना पुन्हा आपल्या व्यवसायात गुंतण्यासाठी आणि जीवन संपूर्णपणे तसेच समाजाचा उत्पादक भाग बनण्यासाठीही मदत करते. ते आरोग्याला चालना देतात, दुखापती टाळतात आणि दिव्यांगता असलेल्या व्यक्तिला प्रतिष्ठेने जगण्यासाठी सक्षम करतात.

Occupational Therapy
ऑक्युपेशनल थेरपी
author img

By

Published : Jul 25, 2020, 12:31 PM IST

ऑक्युपेशनल थेरपी काय आहे, दैनंदिन जीवन जगताना रूग्णाची प्रकृती बरी होऊन त्यात सुधारणा आणि कौशल्य विकसित होण्यासाठी ती कशी मदत करते, यावर ईटीव्ही भारत सुखीभवने हैदराबादच्या उस्मानिया रूग्णालयातील ऑक्युपेशनल थेरपी तज्ञ आरती रूमाले यांच्याशी बातचीत केली.

आम्ही सर्वच जण व्यवसायात गुंतलेलो असतो. व्यवसायाची व्याख्या अशी करण्यात आली आहे की कोणताही अर्थपूर्ण उपक्रम, ज्यात स्वतःला गुंतवण्यासाठी त्यात क्रियाशील बनलेला असतो. दैनंदिन आधारावर, अनेक असे उपक्रम आहेत की ज्यात आपण गुंतलेलो असतो. उदाहरणार्थ, वैयक्तिक काळजी, काम, फावला वेळ, खेळ, घराची स्वच्छता, जेवण तयार करणे, शिक्षण आणि सामाजिक-सांस्कृतिक क्रियाकलाप आदी. असे उपक्रम स्वतंत्रपणे करण्याची क्षमता ही अमूल्य आहे, कारण त्यात स्वतःची प्रतिष्ठा आणि कल्याणाला चालना दिलेली असते. नुकताच चमच्याने खाऊ लागलेल्या बालकाच्या चेहऱ्यावर ही भावना स्पष्टपणे दिसते आणि ती इतक्या प्रमाणात असते की ते पाणी पिण्यासाठी चमच्याचा उपयोग करते. हळूहळू ही उत्तेजना लोप पावते आणि ती एक नेहमीची क्रिया होऊन बसते आणि त्यावर मग कुणी फारसा विचार करत नाही.

पण काही घटना अशा असतात जेथे जन्मापासून असलेली दिव्यांगता किंवा अत्यंत क्लेशकारक किंवा वैद्यकीय घटनेत एखाद्या व्यक्तिला केअरटेकरवर अवलंबून रहावे लागते. याचा परिणाम व्यक्तिचे आरोग्य आणि कल्याणावर थेट होऊ शकतो. ऑक्युपेशनल थेरपीचा व्यवसाय हा पुनर्वसन उपचारांची एक शाखा असून विविध वयोगटांतील लोकांना पुन्हा आपल्या व्यवसायात गुंतण्यासाठी आणि जीवन संपूर्णपणे तसेच समाजाचा उत्पादक भाग बनण्यासाठीही मदत करते. ते आरोग्याला चालना देतात, दुखापती टाळतात आणि दिव्यांगता असलेल्या व्यक्तिला प्रतिष्ठेने जगण्यासाठी सक्षम करतात. ऑक्युपेशनल थेरपिस्ट रूग्णालय, बाह्यरूग्ण विभाग, मानसिक आरोग्य, बालरोगशास्त्र, वृद्धत्व आणि त्यामुळे होणारे आजार, ह्रदयविकार आणि नवजात अतिदक्षता विभाग, शाळा, कार्यालये अशा विविध प्रकारच्या व्यवस्थेत याच तत्वाने काम करतो.

ऑक्युपेशनल थेरपीच्या प्रक्रियेत पद्धतशीर ऑक्युपेशनल थेरपी मूल्यांकन गुंतलेले असते. ऑक्युपेशनल थेरपिस्ट, जो संलग्न आरोग्य सेवा व्यावसायिक असतो व्यक्तिचे भौतिक(शरिर), सामाजिक(कुटुंब आणि आधार व्यवस्था),मानसिक आणि पर्यावरणीय(घर आणि सभोवताल) यांचे मूल्यांकन करतो. या प्रकारे गोळा केलेल्या माहितीचा, ऑक्युपेशनल थेरपिस्टला एखादी हालचाल करण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य सुधारण्यासाठी उपचारांचा हस्तक्षेपाची योजना तयार करण्यासाठी सहाय्य करते. दैनंदिन हालचालींमध्ये सुधारणा किंवा पुनर्रचना करण्यात सहभाग घेणे शक्य व्हावे, यासाठी ते वेगवेगळ्या उपचारात्मक हस्तक्षेपांचा वापर करतात. आवश्यकता भासल्यास ऑक्युपेशनल थेरपिस्ट व्यक्तिचा हालचालीतील सहभाग वाढवण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी परिस्थितीत सुधारणाही करतात. उदाहरणार्थ, संगणक वापरकर्त्यांनी कार्यक्षमपणे काम करावे म्हणून कामाच्या ठिकाणी योग्य तशी जुळवाजुळव करणे.

तुम्ही आरती रूमाले यांच्याशी arthi.rumale@gmail.com वर संपर्क साधू शकता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.