ETV Bharat / sukhibhava

प्रतिभाशाली मुलांची काळजी कशी घ्यावी? त्यांच्या पोषण आहाराबाबत जाणून घ्या....

author img

By

Published : Jul 7, 2021, 6:04 PM IST

प्रतिभाशाली मुलांची काळजी कशी घ्यावी, शिक्षकांनी आणि पालकांनी त्यांच्याशी कसे वागावे, याबाबत 'ईटीव्ही भारत सुखीभवने' महाराष्ट्र राज्यातील, नाशिक येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. शामा जगदिश कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. याबाबत डॉ. शामा म्हणाल्या....

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

प्रतिभाशाली मूल (Gifted Child) म्हणजे काय?

कोणताही मुलगा ज्याची सामान्य मानसिक क्षमता खूप जास्त आहे किंवा ज्ञानाच्या विशिष्ट क्षेत्रात त्याची विलक्षण क्षमता आहे, त्यास प्रतिभाशाली मुलगा, असे म्हणतात (Gifted Child). अशा मुलांमध्ये उच्च आकलन क्षमता असते. ते इतर बरोबरीच्या मुलांच्या तुलनेत पटकन शिकतात. ते एक किंवा अधिक क्षेत्रात उच्च पातळीवर कामगिरी करतात.

अत्यंत हुशार मूल -

स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेल्या मुलांना प्रतिभाशाली मूल (Gifted Child) म्हणता यईल का?

ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेल्या मुलांमध्ये विस्तृत बुद्ध्यांक (IQ) असू शकते. ते अत्यंत हुशार असू शकतात किंवा त्यांचा बुद्ध्यांक फारच कमी असू शकते.

मूल प्रतिभाशाली (Gifted Child) आहे की नाही, हे कसे ओळखता येईल?

बुद्ध्यांक चाचणी (IQ test) करून हे ओळखता येईल.

बुद्ध्यांक :

1) 80 - 100 सामान्य

2) 100-120 सामान्यापेक्षा अधिक

3) 120-140 हुशार

4) 140 पेक्षा अधिक - विलक्षण बुद्धी

प्रतिभाशाली मुलाच्या (Gifted child) शैक्षणिक कामगिरीचे मुल्यांकन कसे केले जाते?

बऱ्याचदा अशी मुले वर्गातील उपक्रम जलद गतीने संपवतात. आणि एकदा ते कार्यातून मुक्त झाले, तर ते खट्याळपणे वागतात. अशात जर शिक्षक प्रशिक्षित नसेल, आणि मुलगा हा अत्यंत हुशार असल्याचे तिला माहिती नसेल, तर कदाचित ती त्याला शिक्षा करू शकते. असा मुलगा एखाद्या क्षेत्रात पुढे असू शकतो आणि दुसर्‍या क्षेत्रात मागे राहू शकते. मात्र, हे शिक्षकाला माहिती नसल्यास, शिक्षेमुळे मुलाची कार्यक्षमता बिघडू शकते.

अशा मुलासाठी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे?

अशी मुले अत्यंत संवेदनशील असल्याने त्यांना योग्य भावनिक आधाराची आवश्यकता असते. त्यांच्या संगोपनासाठी पालकांना मार्गदर्शन आवश्यक आहे. योग्य संसाधनांचा अभाव, हे मुलास उच्च पातळीचे यश मिळू देणार नाही.

प्रतिभाशाली मुलाशी (Gifted child) वागताना पालक आणि शिक्षकांना शिक्षण महत्वाचे?

मल्टीविटामिन, मेमरी टॉनिक यावर कितीही पैसा खर्च करण्यासाठी पालक तयार असतात, मात्र डॉ. शामा यांच्या मते, कोणत्याही टॉनिकपेक्षा आहारातील पोषण हे सर्वात महत्वाचे आहे. आपल्या आयुष्याच्या पहिल्या हजार दिवसांत ब्रेन वायरिंग होते. म्हणजे, न्यूरॉन्स विकसित होतात, कनेक्शन विकसित होतात आणि मेंदूची वाढ होते. गरोदरपणात, म्हणजेच २८० दिवस मातेच पोषण अत्यंत महत्वाचे असते. पहिल्या सहा महिन्यांत बाळाला विशेष स्तनपान दिले पाहिजे. आणखी कशाचा तरी एक थेंबही दिला जाऊ नये. सहा महिन्यानंतर घरगुती नरम ताजे शिजवलेले अन्न (soft complimentary freshly cooked food) द्यावे. स्तनपान झालेल्या बालकांचे बुद्ध्यांक खूप उच्च असते.

या १ हजार दिवसांत तुम्ही जेवढे जास्त मुलाकडे लक्ष द्याल, तितकीच मुलाची बुद्धिमत्ता जास्त असेल. या दिवसांत तुम्ही प्रेम करायला शिकवले, तर मुलगा प्रेमळ होईल, जर तुम्ही त्याला द्वेष शिकवला, तर तो द्वेष शिकेल आणि जर तुम्ही त्याला काहीच नाही शिकवले, तर त्याला काही येणार नाही. त्यामुळे, या दिवसांमध्ये तुम्ही मुलाला काय शिकवता हे महत्वाचे आहे. तुम्ही त्याच्याशी कसे वागता, तुम्ही त्याला काय देत आहात, तुम्ही त्यास कोणत्या सवयी लावतात, हे महत्वाचे आहे.

अन्न हे जगण्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहे. प्रथिने (Protein), जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिज घटक (Minerals Constitution) असलेले अन्न हे एक चांगले पौष्टिक स्रोत आहे. आहारात भाज्या, स्प्राउट्स, डाळी आणि धान्यांचा योग्य समावेश केल्याने मुलाचे शारीरिक आणि मानसिक विकास होण्यास मदत होते. मूल हे त्याला दिलेल्या सर्व अन्न पदार्थांना एक्स्प्लोर (explore food) करेल, त्यामुळे अन्नाची चव विकसित करण्यास मदत होईल. लहान बाळ चांगली चव आणि रंग असणाऱ्या अन्न पदार्थांचा सेवन करेल.

मातांनी पोषण मुल्यावर (nutrition value) जास्त लक्ष दिले पाहिजे, विशेषत: घरी शिजवलेले आणि ताजे अन्न, जे सॉलिड (solid) आहे. भारतीय अन्न पदार्थ जसे हळद हे केवळ जखमच भरून काढत नाही, तर ते रोगप्रतिकारशक्ती देखील वाढवते. रागी किंवा बाजरी (Ragi or millets) हे कॅल्शियम देतात, तर स्प्राउट्स आणि डाळी हे प्रथिने (protein) देतात. फळे आपल्याला विविध विटामिन जसे, विटामिन-सी देते. लोकांचा असा गैरसमज आहे की, पॅक केलेले अन्न मुलांना नैसर्गिक अन्नाच्या तुलनेत अधिक प्रथिने (protein) देतात. चिप्स, बिस्किटे, टीन फूड देण्याऐवजी मुलांना इडली, उपमा, दुधासोबत पोहा, शिरा, स्प्राउट दोसा, वेजिटेबल स्ट्यू द्यावे. सर्व 5 ज्ञानेंद्रियांना संबोधित केले पाहिजे. मुलाला पोत, रंग जाणवू द्या, हे कुटुंबात सामील झाल्याची भावना देते. मेंदुला माहिती मिळणे गरजेचे आसते, असे डॉ. शामा सांगतात.

काही महत्वाची माहिती

  • डीएचए हे अक्रोड, फ्लॅक्स सीड, अलगी, चिआ सीड, हेम्प सीड, एडमामे बीन्स (edamame beans), राजमा (kidney beans), सोयाबीन आणि फिशमध्ये सापडते.
  • लोह (iron) हे गूळ, डेट्स आणि लोह भांड्यात शिजवलेल्या अन्नात सापडते (food cooked in Iron Utensils).
  • मेंदूपर्यंत पोहचणारे नैसर्गिक अन्न डीएनएमध्ये मदत करतात.
  • टिंड किंवा प्रोसेस्ड अन्नाला कोणतेही पौष्टिक मुल्य नसते, ते मेंदूला चालना देखील देत नाही.
  • तृणधान्य, अनपॉलिश्ड डाळींचे एकत्रिकरण हे मेंदू तयार करण्यात मदत करते.
  • बाल मेंदू 1000 दिवसांत बुद्ध्यांक लागवडीस मदत करते.
  • पोष्टिक अन्न हे मेदूला मजबूत करण्यास मदत करते.

- डॉ. शामा जगदिश कुलकर्णी, बालरोग तज्ज्ञ, नाशिक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.