तिरुवनंतपुरम Nipah Virus : निपाह व्हायरस हा एक झुनोटिक रोग आहे, जो प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरू शकतो. याशिवाय दूषित अन्नातूनही या रोगाचा प्रसार होऊ शकतो. केरळच्या कोझिकोडमध्ये चार जणांना निपाह व्हायरसची लागण झाली आहे. या ४ पॉझिटिव्ह प्रकरणांपैकी दोघांचा मृत्यू झाला असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे. केरळमध्ये निपाह व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी बुधवारी विधानसभेत दिली.
निपाह व्हायरसचे लक्षणं : तुम्हाला निपाह व्हायरसची लागण झाली आहे का, हे ओळखण्यासाठी जाणून घ्या निपाह व्हायरसची लक्षणं काय आहेत.
- उच्च ताप
- पोटदुखी आणि डोकेदुखी
- खोकला
- थकवा
- श्वास घेण्यास त्रास
- उल्टी आणि अतिसार
- सांधे आणि स्नायूंमध्ये वेदना
- अशक्तपणा आणि चक्कर येणे
- एन्सेफलायटीस (मेंदूचा ताप)
- हळूहळू कोमाच्या स्थितीत जाणे
निपाह व्हायरसपासून वाचायचं कसं : निपाह व्हायरसपासून वाचायचं असेल तर खालील उपायांचा अवलंब करा.
- आजूबाजूला वटवाघुळं किंवा डुक्करं असतील तर खबरदारी घ्या.
- पक्षी किंवा जनावरांनी खाल्लेल्या फळांपासून दूर रहा.
- फळं आणि भाज्यांना स्वच्छ धुऊनच खा.
- आजाराच्या संपर्कात आल्यास वारंवार स्वच्छ हात धूत रहा.
- आजारी व्यक्तीला भेटताना मास्कचा वापर करा.
- सोशल डिस्टेसिंगचं जाणीवपूर्वक पालन करा.
- सौम्य लक्षणं जाणवल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क करा.
कोझिकोड जिल्ह्यात प्रत्येकाला मास्क लावण्याचा सल्ला : केरळमध्ये निपाह विषाणूचा प्रसार वाढू नये यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी आतापर्यंत १६८ लोकांना ट्रॅक केलं आहे, जे संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात आले होते. यामध्ये १२७ हेल्थ प्रोफेशनल्सचा समावेश आहे. यासह आरोग्य मंत्र्यांनी कोझिकोड जिल्ह्यातील प्रत्येकाला मास्क लावण्यास सांगितलंय. कोझिकोड शहरात दोन केंद्र आहेत. 'जिल्हा अधिकारी प्रत्येक गोष्टीची बारकाईनं तपासणी करत आहेत. चार पॉझिटिव्ह रुग्णांचा रुट मॅप लवकरच तयार केला जाईल', असं आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितलं.
हेही वाचा :