ETV Bharat / sukhibhava

Navratri २०२३ : नवरात्रीच्या उपवासाचे खास नियम; जाणून घ्या कोणत्या गोष्टींची घ्यावी विशेष काळजी - Navratri 2023 Special Rules for Navratri Fasting

Navratri २०२३ : 15 ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात झाली. देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी भक्त उपवास करतात. जाणून घेऊ या उपवास करताना कोणत्या खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

Navratri 2023
नवरात्रीच्या उपवासाचे खास नियम
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 18, 2023, 3:18 PM IST

Updated : Oct 18, 2023, 3:54 PM IST

हैदराबाद : Navratri २०२३ : 15 ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गेची पूजा केली जाते. या काळात देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीचे नऊ दिवस भाविक देवीची भक्तिभावाने पूजा करतात. अनेक भाविक नऊ दिवस उपवास करतात आणि त्यांच्या मनाला शांती मिळते. उपवासात सात्विक अन्न खाल्लं जातं. चला जाणून घेऊ या नवरात्रीत उपवास करताना काय खावं आणि काय खाणं टाळावं.

नवरात्रीच्या उपवासात काय करावे

  • सकाळची सुरुवात प्रार्थनेने करा : नवरात्रीचे व्रत पाळण्यामागचा भाविकांचा मुख्य उद्देश अदिशक्तिचा आशीर्वाद मिळावा हा असतो. यासाठी सकाळी स्नान करून प्रार्थना करून दिवसाची सुरुवात करावी. तुम्ही मंदिरांनाही भेट देऊ शकता आणि देवीचं दर्शन घेऊ शकता.
  • निरोगी अन्न खा : उपवासात फक्त सात्विक अन्नच खावे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही भाज्या, फळे, दुधाचे पदार्थ, दही आणि ड्रायफ्रुट्सचे सेवन करू शकता.
  • शरीर हायड्रेटेड ठेवा : उपवासाच्या काळात शरीरात पाण्याची कमतरता होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्य असल्यास उपवासात भरपूर पाणी प्या. तुम्ही तुमच्या संध्याकाळच्या जेवणात फळ, दूध आणि हर्बल चहाचा रस देखील समाविष्ट करू शकता.
  • खडा मिठाचे सेवन करावे : खडा मीठाला हिमालयीन मीठ देखील म्हणतात. उपवासाच्या वेळी रोजच्या मिठाच्या जागी खडा मिठाचे सेवन केले जाते. त्यामुळे उपवासात जेव्हाही फळांचा आहार घ्यावा तेव्हा खडा मीठाचा वापर नक्की करा.
  • स्वच्छतेची काळजी घ्या : व्रत पाळताना स्वयंपाकघर आणि मंदिराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते. म्हणून उपवास करताना आपले घर आणि मंदिर पवित्र ठेवा. अन्न बनवताना स्वयंपाकघर अस्वछ असणार नाही याची काळजी घ्या.
  • उपवास सोडण्यापूर्वी फळे खा : उपवास सोडताना फळे खाण्याची परंपरा सुरुवातीपासून चालत आली आहे. फलाहाराने भूक मिटण्याबरोबरच योग्य घटकही पोटात जातात.

नवरात्रीच्या उपवासात काय खाऊ नये :

  • धान्य आणि कडधान्यांचं सेवन टाळा : नवरात्रीच्या उपवासात कडधान्ये आणि धान्ये खात नाहीत. याच्या जागी तुम्ही गव्हाचं पीठ, राजगिरा यांचं सेवन करू शकता.
  • लसूण आणि कांदा खाऊ नका : नवरात्रीचे नऊ दिवस कांदा आणि लसूण खाणे टाळावे.
  • सिगारेट आणि दारूपासून दूर रहा : असं मानले जातं की, नवरात्रीचे नऊ दिवस कोणत्याही प्रकारच्या नशेपासून दूर राहावे. या काळात सिगारेट आणि दारू पिऊ नये.
  • तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाऊ नका : नवरात्रीत सात्विक अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. उपवासात तेलापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे.
  • पॅक केलेले अन्न खाणे टाळा : उपवासात पॅकबंद अन्न खाऊ नये. त्याऐवजी स्वच्छता राखून घरीच अन्न तयार करा.

हेही वाचा :

  1. Navratri 2023 : तुम्ही गरबा, दांडिया फक्त आनंदासाठी करता का? जाणून घ्या त्याचे आश्चर्यकारक फायदे...
  2. Navratri 2023 : उपवासात होऊ शकतो गॅस आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास; करा हे उपाय
  3. Navratri २०२३ : नवरात्रीत चप्पल न घालण्याचं काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या...

Last Updated : Oct 18, 2023, 3:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.