हैदराबाद National Youth Day 2024 : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या दिवशी राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात येतो. स्वामी विवेकानंद यांनी आपल्या आदर्श तत्वज्ञानानं जगभरात नावलौकिक मिळवला. त्यामुळं स्वामी विवेकानंद यांना तरुणांचा आदर्श सुधारक म्हणून मानलं जाते.
काय आहे राष्ट्रीय युवा दिनाचा इतिहास : स्वामी विवेकानंद हे जगभरातील तरुणांचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळं राष्ट्राच्या हितासाठी त्यांनी तरुणांना मार्गदर्शन केलं. त्यांच्या आदर्श शिकवणुकीमुळं जगभरात त्यांच्या विचाराचा वारसा जपणारे लाखो तरुण आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारनं 1984 मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीला राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित केलं. राष्ट्राच्या हितासाठी जीवन अर्पण करणाऱ्या या तरुणांच्या 'हिरो'ला आदरांजली वाहण्यासाठी राष्ट्रीय युवा दिन 12 जानेवारीला साजरा करण्यात येतो.
स्वामी विवेकानंद यांचा जीवन प्रवास : स्वामी विवेकानंद यांचा जन्म कोलकाता इथं 12 जानेवारी 1863 ला झाला. त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे उच्च न्यायालयाचे वकील होते. त्यांनी आपल्या मुलाचं नाव नरेंद्र असं ठेवलं होतं. आपल्या मुलानं चांगलं शिक्षण घेऊन मोठा माणूस होण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. नरेंद्र यांना लहानपाणापासूनचं संगीत, खेळ आदी विषयात रस होता. मात्र 1881 मध्ये नरेंद्र यांचा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला. त्यांनी श्रीरामकृष्ण परमहंस यांना भेटल्यानंतर त्यांनाच आपलं गुरू मानलं.
देव पाहिला आहे का ? : रामकृष्ण परमहंस यांना गुरू मानल्यानंतर स्वामी विवेकानंद यांनी त्यांना प्रश्न केला, तुम्ही देव पाहिला आहे का ? यावर रामकृष्ण परमहंस यांनी लगेच 'होय' असं उत्तर दिलं. "मी तुम्हाला पाहतो, तितक्याचं स्पष्टपणे देवाला पाहतो" असं रामकृष्ण परमहंस यांनी सांगितल्यानंतर या गुरू शिष्याचं नातं अधिक दृढ झालं. त्यानंतर स्वामी विवेकानंद यांनी आपलं जीवन अध्यात्मिक साधनेसाठी समर्पित केलं.
स्वामी विवेकानंदांचे शिकगोत ऐतिहासिक भाषण : स्वामी विवेकानंद यांनी शिकागोत 11 सप्टेंबर 1893 ला ऐतिहासिक भाषण केलं. यावेळी त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवातचं "माझे सर्व बंधू आणि भगिनी" अशी केल्यानं जगभरातून परिषदेला आलेल्या विद्वानांनी टाळ्यांचा कडकडात केला. स्वामी विवेकानंद यांनी शिकागोच्या या परिषदेत केलेलं हे भाषण जगप्रसिद्ध आहे. स्वामी विवेकानंद यांनी पाश्चात्य देशातील नागरिकांना हिंदू धर्माची ओळख करुन दिली. हिंदू धर्मातील अध्यात्म आणि सहिष्णभाव जगापुढं मांडला. त्यामुळं स्वामी विवेकानंद यांची जगभरात ओळख झाली. रामकृष्ण परमहंस यांच्या निधनानंतर स्वामी विवेकानंद यांनी कोलकाता इथं रामकृष्ण मठाची स्थापना केली. त्यानंतर 4 जुलै 1902 मध्ये बेलूर मठात ध्यान करताना स्वामी विवेकानंद यांनी शेवटचा श्वास घेतला.
हेही वाचा :