ETV Bharat / sukhibhava

National Vaccination Day 2023 : गोवरमुळे जातो हजारो बालकांचा बळी, अशी घ्या आपल्या चिमुकल्यांची काळजी - गोवर

गोवरमुळे देशभरातील हजारो बालकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यासाठी बालकांचे लसिकरण करणे गरजेचे आहे. नुकत्याच मुंबईत आलेल्या साथीने अनेक बालकांचा बळी गेला. त्यामुळे पालकांनी आपल्या चिमुकल्यांचे लसिकरण करणे गरजे आहे. राष्ट्रीय लसिकरण दिनानिमित्त गोवरबाबतची काळजी कशी घ्यावी याबाबतची ही खास माहिती.

National Vaccination Day 2023
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 16, 2023, 10:28 AM IST

हैदराबाद : गोवरमुळे हजारो चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे आपल्या चिमुकल्यांना वेळेवर लस देणे गरजेचे आहे. नागरिकांमध्ये चिमुकल्यांच्या या विविध आजारांबाबत जनजागृती करण्यासाठी १६ मार्च हा दिवस राष्ट्रीय लसिकरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. चिमुकल्यांचे सर्वाधिक मृत्यू गोवरमुळे होतात. त्यामुळे गोवर हा घातक आजार असून त्याला आळा घालण्यासाठी पालकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे.

पाच वर्षाखालील चिमुकल्यांचा जातो बळी : गोवर हा चिमुकल्या मुलांसाठी अतिशय घातक संसर्गजन्य आजार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरक्षित आणि स्वस्त लस उपलब्ध असूनही 2018 मध्ये जगभरातील १ लाख ४० हजार चिमुकल्यांचा गोवरच्या आजाराने बळी गेल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले. त्यामुळे या आजाराची गंभीरता किती भयानक आहे, याची प्रचिती येते. बळी गेलेल्या चिमुकल्यापैंकी सगळ्यात जास्त चिमुकले हे ५ वर्षाखालील होते. त्यामुळे ५ वर्षाच्या आतील बालकांना गोवरचा सर्वाधिक धोका असल्याचे स्पष्ट होते.

लसिकरणामुळे कमी झाले चिमुकल्यांचे मृत्यू : केंद्र सरकाने बालकांसाठी विविध प्रकारच्या लसिकरणाची मोफत सोय उपलब्ध करुन दिली आहे. लसिकऱण झाल्यामुळे बालकांना होणाऱ्या संसर्गजन्य आजारापासून सुटका होते. त्यासह बालकांमध्य रोगप्रतिकार शक्ती वाढते. 2000 ते 2018 पर्यंत उपलब्ध असलेल्या आकडेरीनुसार लसिकरणामुळे तब्बल ७३ टक्के बालकांचे मृत्यू कमी झाले आहे. त्यामुळे बालकांसाठी लस किती उपयोगी आहे, याचा अंदाज येतो.

गोवर म्हणजे काय : गोवर हा पॅरामिक्सो विषाणूमुळे होणारा संसर्ग आहे. हा संसर्ग खोकला, शिंकणे, स्पर्श करणे आणि संक्रमित व्यक्तीच्या मलमूत्र खाणे आदीद्वारे पसरतो. हा विषाणू एखाद्या व्यक्तीच्या घशात आणि नाकामध्ये आढळतो. जेव्हा तो एखाद्या लहान मुलाला संक्रमित करतो तेव्हा तो त्याच्या श्वसनमार्गाला, फुफ्फुसांना आणि त्वचेला तसेच शरीराच्या इतर भागांना संसर्ग होतो. हा संसर्ग गर्भवती महिलेला झाला तर तो न जन्मलेल्या बाळासाठीही घातक ठरू शकतो. या संसर्गाचा धोका मुख्यतः कुपोषणग्रस्त असलेल्या मुलांना आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या बालकांना अधिक होतो. बालकांना आणि गरोदर महिलांना गोवरचे लसीकरण करण्यात आलेले नाही, त्यांच्यामध्येही हा संसर्ग पसरण्याची शक्यता जास्त असते. 1963 मध्ये गोवरची लस बाजारात येण्यापूर्वी गोवरची महामारी दुसऱ्या-तिसऱ्या वर्षी पसरत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गोवरने दरवर्षी सुमारे 2.6 दशलक्ष बालकांचा मृत्यू होत असल्याचे या आकडेवारीवरुन स्पष्ट होते.

काय आहेत गोवरची लक्षणे : संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर साधारणत: 7 ते 14 दिवसात गोवरची लक्षणे दिसू लागतात. वेळेवर लक्ष न दिल्याने प्रकृती बिघडू शकते. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रे (CDC) नुसार गोवरची काही वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.

  • संसर्ग झाल्यानंतर 7 ते 14 दिवसांनी पहिली लक्षणे दिसतात
  • बालकांना 104 अंशांपेक्षा जास्त ताप असू शकतो
  • सारखा खोकला येतो
  • नाक सारखे वाहत राहते
  • डोळ्यांच्या बुबुळे लाल होणे आणि त्यातून सतत स्त्राव होणे
  • ही लक्षणे दिसल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी लहान पांढरे ठिपके तयार होऊ लागतात

शरीरावर उठू लागते पुरळ : गोवरची लक्षणे दिसू लागल्यानंतर ३ ते ५ दिवसांनी शरीरावर सपाट पुरळ उठू लागते. ही पुरळ तोंडाच्या आणि मानेच्या वरच्या भागापासून सुरू होऊन शरीराच्या खालच्या भागात पसरत जाते. या पुरळमध्ये थोडासा फुगवटा येऊ शकतो. ही पुरळ वेगाने पसरून शेजारी दोन पुरळ एकात विलीन होतात. त्यानंतर संपूर्ण शरीराच्या त्वचेवर पुरळ दिसू लागतात. त्यामुळे बालकांना १०४ अंश ताप येतो.

बालकांचे करावे लसिकरण : गोवरमुळे बालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे त्याचे वेळेवर लसिकरण होणे गरजेचे आहे. यासाठी नॅशनल हेल्थ पोर्टल ऑफ इंडिया (NHP) नुसार सर्व मुलांना गोवरची लस दोनदा देण्यात यावी. जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबतची शिफारस केली आहे. या लसी गोवर रुबेला ( MR ) आणि गोवर मम्स रुबेला ( MMR ) यांचे मिश्रण आहेत. पहिली गोवर लस 9 ते 12 महिने वयाच्या मुलांना दिली जाते. दुसरी लस 16 ते 24 महिने वयाच्या मुलांना दिली जाते. काही कारणास्तव मुलाला विशिष्ट वयात लसीकरण करता आले नाही, तर ते नंतर केले पाहिजे असेही आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - Covid Impact On Teens Mental Health : कोरोनाचा बालकांच्या मानसिक आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम ; लॅन्सेटचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.