'मोसंबी' किंवा गोड लिंबाचा वापर कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी केला जाऊ शकतो. IIT (BHU) मधील संशोधकांचा दावा आहे की 'मोसंबी' (Citrus limetta) च्या सालीचा वापर पाण्यातील जड धातू काढून कर्करोग आणि इतर जीवघेण्या आजारांपासून बचाव करण्यासाठी केला जाऊ शकतो.
स्कूल ऑफ बायोकेमिकल इंजिनीअरिंग, IIT (BHU) मधील संशोधकांनी पर्यावरणास अनुकूल आणि किफायतशीर असा सोध लावला आहे. दूषित पाणी आणि सांडपाण्यापासून हेक्साव्हॅलेंट क्रोमियमसारखे विषारी हेवी मेटल आयर्न काढून टाकते.
डॉ. विशाल मिश्रा यांचे संशोधन
स्कूल ऑफ बायोकेमिकल इंजिनीअरिंगचे सहयोगी प्राध्यापक डॉ. विशाल मिश्रा आणि त्यांचा विद्यार्थी वीर सिंग यांचा मोसंबीच्या सालीचा कर्करोग टाळण्यासाठी कशी मदत होईल याविषयीचा शोधनिबंध 'सेपरेशन सायन्स अँड टेक्नॉलॉजी' या ( Separation Science and Technology ) या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.
हेक्साव्हॅलेंट क्रोमियम शरीरासाठी घातक
हेक्साव्हॅलेंट क्रोमियम मानवांमध्ये कर्करोग, यकृत आणि मूत्रपिंडाचे आजार आणि यकृत खराब होणे आणि त्वचेच्या समस्या यासारख्या अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांसाठी जबाबदार आहे. "हे एक नवीन इको-फ्रेंडली उत्पादन असून, सायट्रस लिमेटा (Mosambi) पील बायोमासपासून तयार केले आहे. हे शोषक इतर पारंपारिक पद्धतींच्या तुलनेत सांडपाण्यातील हेक्साव्हॅलेंट क्रोमियम (Hexavalent Chromium) काढण्यासाठी खूप प्रभावी आहे. तसेच हेक्साव्हॅलेंट क्रोमियमला जलीय द्रावणापासून वेगळे करण्यास कमी वेळ लागतो. "
काय आहे हे संशोधन
वीर सिंग यांच्या मते, धातू काढण्याच्या प्रक्रियेनंतर हे शोषक जलीय माध्यमापासून ( aqueous medium ) सहज वेगळे केले जाऊ शकते. संशोधकांनी सिंथेटिक सिम्युलेटेड सांडपाण्यात या शोषकांच्या हेक्साव्हॅलेंट क्रोमियम काढण्याच्या क्षमतेची चाचणी केली. आणि त्याचे चांगले परिणाम मिळाले. या शोषकाची जड धातू काढण्याची कार्यक्षमता शिसे, तांबे आणि कॅडमियम (copper and cadmium) सारख्या इतर जड धातूंसाठी तपासण्यात आली. जड धातूंमध्ये कार्सिनोजेनिक गुणधर्म (Carcinogenic Properties) असल्याने कर्करोग होतात. या प्रक्रियेची माहिती देताना ते म्हणाले, "आम्ही मोसंबीची साले गोळा करतो, वाळवतो, ग्रेन्युलमध्ये बारीक करतो आणि नंतर त्यात चिटोसन या बायोपॉलिमरने बदल करतो. त्यानंतर साले पाण्यात टाकून जड धातू वेगळे करू शकतात."
जलजन्य आजार मोठी समस्या
विकसनशील देशांमध्ये जलजन्य आजार ही मोठी समस्या आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, दरवर्षी 3.4 दशलक्ष लोक, बहुतेक मुले, पाण्याशी संबंधित आजारांमुळे मरतात. युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड (युनिसेफ)नुसार, दररोज 4,000 मुले जीवाणूजन्य दूषित पाण्याच्या सेवनाने मरतात. WHO ने अहवाल दिला की 2.6 अब्जपेक्षा जास्त लोकांना स्वच्छ पाण्याचा अभाव आहे. दरवर्षी सुमारे 2.2 दशलक्ष मृत्यूसाठी जबाबदार आहे, त्यापैकी 1.4 दशलक्ष मुले आहेत. पाण्याची गुणवत्ता सुधारल्याने जागतिक जलजन्य आजार कमी होऊ शकतात. हेक्सॅव्हॅलेंट क्रोमियम आणि इतर हेवी मेटल आयनमुळे होणारा कर्करोग ही जगभरातील एक गंभीर समस्या आहे. जलसंपदा मंत्रालयाच्या अहवालानुसार, भारतीय लोकसंख्या मोठ्या प्रमाणात विषारी जड धातूंच्या प्राणघातक पातळीसह पाणी पितात.
स्वस्तात मस्त
मोसंबीची साले फळांचा कचरा म्हणून सहज उपलब्ध आहेत. यापासून शोषक संश्लेषण आणि चिटोसन ही एक किफायतशीर आणि पर्यावरणास अनुकूल आहे. या संशोधनाचे यशस्वी परिणाम दिसून आले आहेत. ते आता मोठ्या प्रमाणावर घेऊन किफायतशीर बनविण्याची योजना आखली आहे. क्लिनिकल चाचण्या लवकरच प्रयोगशाळेच्या स्तरावर सुरू होतील आणि नंतर त्याचे प्रमाण वाढेल, असेही मिश्रा म्हणाले.
हेही वाचा - हृदयरोगींसाठी दिलासादायक बातमी..! आयआयटी कानपूरमध्ये कृत्रिम हृदय निर्मितीवर होतंय काम