हैदराबाद : संक्रांतीच्या दिवशी काळया वस्त्रांना भरपूर महत्त्व दिले (why we wears black clothes) जाते. तसे पाहायला गेलात तर भारतीय संस्कृतीमध्ये काळ्या रंगाला अशुभ मानले जाते. तसेच कोणत्याही सणासुदीला काळ्या रंगाचे कपडे घातले जात नाही. परंतु मकरसंक्रांतीला (on occasion of makar sakranti) हा रंग आवर्जून परिधान केला जातो. हा सण प्रत्येक जण आवडीने साजरा करत असतो. या सणाला काळया साडया, काळे सुट, काळी झबली अशी वस्त्रे संक्रांतीच्या सुमारास खरेदी करतात. नवविवाहित मुलींसाठी या सणाचे विशेष महत्त्व आहे. लग्नानंतरच्या प्रथम येणा-या संक्रांतीला नवविवाहित मुलींसाठी खास काळया रंगाच्या वस्त्रांची खरेदी केली जाते. त्यांना हलव्याचे दागिने घालतात.
महाराष्ट्रातील संक्रांत : महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (सामान्यतः १४ जाने), संक्रांत (सामान्यतः १५ जाने) व किंक्रांत (सामान्यतः १६ जाने) अशी नावे आहेत. या दिवशी नववधू आणि बाळाची पहिली संक्रांत अगदी उत्साहाने साजरी केली जाते. तिळगुळाच्या वडया, लाडू किंवा तीळेपासून बनवलेले पदार्थ तसेच साखरेपासून बनवलेला हलवा देतात. एखादी उपयुक्त वस्तू सुवासिनींना भेट म्हणून दिली जाते. त्याला ‘आवा लुटणे’ असे म्हणतात. स्त्रियांना वाण वाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' (TIL GUL GHYA GOD GOD BOLA) असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवसापासून हळदी-कुंकू करतात. रथसप्तमी हा संक्रांतीच्या (makar sakranti) हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस असतो.
आहारदृष्ट्या महत्त्वसंक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे : हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे, पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा कार्यक्रम असतो.
भोगी : संंक्रांंतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा होतो. या हवामानात उपलब्ध सर्व शेंंगाभाज्या, फळभाज्या यांंची तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी अणि मुंगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात. संंक्रांंतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते.