भारतात राष्ट्रव्यापी लसीकरणाची मोहीम १६ जानेवारी रोजी प्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरू झाली. तर २ फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्स म्हणजे स्वच्छता कर्मचारी वगैरेंसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. जगातील सर्वात मोठी लसीकरणाची मोहीम, असे जिचे वर्णन केले जाते, त्या लसीकरणाचा दुसरा टप्पा ६० वर्षे वयावरील सर्व आणि ४५ ते ५९ या वयोगटातील असे लोक की ज्यांना गंभीर स्वरूपाचा विशिष्ट आजार आहे, अशांसाठी १ मार्च रोजी सुरू झाला.
लसींविषयी अजूनही पूर्ण माहिती येणे बाकी
कोव्हिड-१९ चे नवीन रूग्ण दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात वाढले असताना, आता भारतातील लसीकरण मोहिमेला मोठी चालना सरकारने दिली आहे. यानुसार, लसीकरणासाठी वयाची अट काढून टाकली असून ४५ वर्षांवरील सर्व वयाच्या लोकांनाही १ एप्रिलपासून लस टोचून घेण्याची परवानगी दिली आहे. आतापर्यंत कोवॅक्सिन आणि कोव्हिशील्ड या दोन्ही लसी कोव्हिड-१९ आजारास प्रतिबंध करण्याच्या दृष्टिने विशेषतः तीव्र आजार आणि मृत्यू टाळण्यासाठी परिणामकारक आहेत, हे चांगल्या प्रकारे समजून आले आहे. तरीही कोव्हिड-१९ ची लागण होण्यास कारणीभूत असलेल्या विषाणूच्या इतर प्रकारांचा बिमोड करण्यास या लस कितपत परिणामकारक आहेत, याबाबत आपण अजूनही समजून घेण्याच्या प्रक्रियेतच आहोत. काही विषाणूच्या प्रकारांचा प्रतिबंध करण्याचे काम ही लस करू शकते. परंतु काही प्रकारांबाबत कमी परिणामकारक आहे, असे प्राथमिक आकडेवारीवरून दिसते. म्हणून एकदा लस टोचून घेतली की आम्ही सारी खबरदारी वाऱ्यावर सोडून आमचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालायचा असा याचा अर्थ नाही. कारण या लसी आजारापासूनच नव्हे तर संसर्गापासूनही आणि संक्रमणापासून किती प्रमाणात संरक्षण करतात आणि किती काळ त्यांचा परिणाम राहिल, याची अद्याप स्पष्टता झालेली नाही. तुमचे लसीकरण झाले याचा अर्थ एवढाच आहे की, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे खरोखर होणाऱ्या आजाराचा धोका तुम्ही खूपच कमी केला आहे. परंतु अजूनही तुम्हाला कोव्हिड-१९ चा संसर्ग होण्याची आणि लस टोचून घेतल्यानंतर तुमच्याकडून आजार पसरवला जाण्याची शक्यता आहेच.
लस घेतल्यानंतर अधिक खबरदारीची गरज
एकदा लस टोचून घेतली की मास्कची गरज नाही, असे अनेक लोकांनी गृहित धरलेले असते. हे मुळीच खरे नाही आणि लसीकरण झालेल्या व्यक्तिकडून होऊ शकणारी ही सर्वात मोठी चूक असेल. तुम्हाला लसीने संरक्षित केलेले असले तरीही आपल्या आसपास असलेल्या सर्व लोकांचे, ज्यांचे लसीकरण अद्याप झालेले नाहि किंवा झालेले असले तरीही, त्यांचे संरक्षण केले पाहिजे. याची आम्हाला अत्यंत दक्षता घेण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, समजा तुमचे लसीकरण झालेले आहे आणि तुम्हाला सार्स-सीओव्ही-२ ची लागण झाली आहे. तुमच्यात त्याची लक्षणे विकसित होण्याची शक्यता जवळपास नाहीच, हे तर स्पष्ट आहे. परंतु कदाचित तुमची रोगप्रतिकारक प्रणाली विषाणूशी संपूर्णपणे लढा देणार नाही. काही विषाणुंना ती जगण्यास आणि गुणाकार करण्यास परवानगी देईलही आणि तुमची नाकपुडी किंवा तोंडातून श्वासावाटे, तसेच खोकला आणि शिंकेद्वारे अशा विषाणूंना बाहेर फेकून देईल. त्यामुळे एक लक्षात ठेवा, हे प्रत्यक्षात घडते का किंवा तुम्ही पुरेशा प्रमाणात जिवंत असलेल्या विषाणूंचे वरील प्रकारांद्वारे उत्सर्जन करून इतरांना रोगाची लागण करू शकता का? याबद्दल कुणीही खात्री देऊ शकत नाही. त्यामुळे, लसीकरण झाले असले तरीही मास्क तोंडावर लावणे आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करणे अजूनही अनिवार्य आहे.
हर्ड इम्युनिटी येईपर्यंत मास्क 'मस्टच'
आमच्याकडे सामुदायिक स्तरावरील रोगप्रतिकार शक्ती जेव्हा साध्य केली जाईल म्हणजे भारतातील बहुतेक लोकांचे लसीकरण झालेले असेल, तेव्हाही आपले संरक्षण करण्यासाठी मास्क लावणे गरजेचे असेलच. ज्या व्यक्तीचे लसीकरण झालेले आहे, अशी व्यक्ती विषाणू वाहून नेऊन ज्याने लस टोचून घेतलेली नाही, त्याच्याकडे त्या विषाणूचे संक्रमण करू शकते का? याबाबत डॉक्टर्स अजूनही निश्चित निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून, खबरदारी बाळगणे अजूनही आवश्यक आहे.
काळजी घेणे गरजेचेच
विषाणूच्या विविध प्रकारांमुळेही कोव्हिडपासून संरक्षण करणाऱ्या साधनांचा वापर चालू ठेवावा लागतो. कारण काही विषाणूचे प्रकार लसीच्या संरक्षणाच्या आवाक्याच्या बाहेर असू शकतात. म्हणून, लस टोचून घेतली असेल तरीही निर्धारित खबरदारी घेणे अनिवार्यच ठरते. याचा अर्थ असा की, गर्दीपासून दूर रहाणे, सार्वजनिक ठिकाणी चांगल्या प्रकारचा मास्क तोंडावर लावणे, आपल्या घराबाहेर लोकांपासून किमान ६ फूट अंतर ठेवणे, सातत्याने हात धुणे आणि सॅनिटायझर्सचा वापर करणे हे आवश्यक आहे.
(स्वरूप पंडा हे सध्या डिफरंशिएटेड कस्टमर करिअर जर्नी मॉडेलद्वारे प्रमुख ग्राहकांसाठी एका प्रकल्पात काम करत असून हा प्रकल्प जपान आणि एपीईसी देशांमध्ये राबवला जात आहे)