आपले मोबाईलच्या व्यसनामुळे झोपेचे चक्र बिघडलेले असते. जर आपण व्यवस्थित झोप नाही घेतली तर त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर आणि सौंदर्यावर दिसायला लागतात. कारण रात्रभर सोशल मिडिया अपडेट्स चेक करत राहण्याची सवय आपल्याला लागली आहे. व्यवस्थित झोप घेणे हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे असते. तुम्हाला चांगली व्यवस्थित गाढ झोप लागते, तेव्हा मनाला आराम मिळून शरीर सुदृढ राहते. जेव्हा आपण व्यवस्थित झोप घेतो तेव्हा आपले सौंदर्य आणि शरीर दोन्हीही निरोगी राहते. त्यामुळे ब्युटी स्लिप ही खूप महत्त्वाची असते.
ब्युटी स्लिपचे फायदे: (benefits of beauty sleep) व्यवस्थित ब्युटी स्लिप घेतल्याने आपला मेंदू फ्रेश राहून आपला मूड देखील चांगला राहतो. मेंदू फ्रेश राहिल्यामुळे आपल्या शरीरातील डोपामाइन आणि सेरोटोनिन सारख्या आनंदी हार्मोन्सचा स्त्राव वाढतो. त्यामुळे त्वचा चमकदार होते आणि चेहऱ्यावरचे आकर्षणही वाढते. यामुळे सौंदर्य आणि शरीर दोन्हीही निरोगी राहते. पुरेशी आणि व्यवस्थित झोप घेतल्याने शरीरावर सूज येण्याची समस्या कमी होते. त्याचबरोबर ब्युटी स्लिप घेतल्यास चेहऱ्यावरील पिंपल्स आणि सुरकत्या देखील कमी होऊ शकता.
ब्युटीनॅप 20 ते 30 मिनिटे आपल्या शरीरातील पेशी झोपेतच सक्रिय असतात आणि त्यांची दुरुस्ती ही झोपेतच होते. त्यामुळे आपल्या पेशींना दुरुस्त ठेवण्यासाठी व्यवस्थित झोप घेणे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. त्याचबरोबर व्यवस्थित झोप घेतल्यास आपल्या त्वचेवरची चमकही वाढू लागते. ब्युटीस्लिप प्रमाणे ब्युटीनॅप देखील घेऊ शकतात. तुम्ही तुमच्या दिनचर्येच्या कामाच्या वेळेत 15 ते 20 मिनिटे वेळ काढून डोळे मिटून हलकीशी डुलकी घेऊ शकतात. असे केल्याने तुम्हाला फ्रेश वाटेल. यामध्ये मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर ब्युटीनॅप 20 ते 30 मिनिटांपेक्षा जास्त घेतल्यास तुमचे वजन वाढवू शकते.
8 तासाची झोप पूर्ण करणे याला ब्युटीस्लिप दररोज वेळेवर झोपणे आणि वेळेवर उठणे आणि त्याचबरोबर 8 तासाची झोप पूर्ण करणे याला ब्युटीस्लिप (Beauty Sleep) असे म्हणतात. प्रत्येक व्यक्तीला दररोज 7 ते 8 तास झोपण्याचा सल्ला डॉक्टर ही देतात. हा सल्ला प्रामुख्याने 18 ते 58 वयोगटातील लोकांना दिला जातो. कारण वय वर्ष 58 नंतर माणसाला काही तासांची झोप लागते. पण वयात असताना तुम्ही योग्य आणि व्यवस्थित झोप घेतली तर तुमची त्वचा आणि शरीर निरोगी राहील. त्याचबरोबर तुमचे मानसिक आरोग्य देखील व्यवस्थित राहील.