आपल्याला वाटतं का, तुप खाल्ल्याने वजन वाढते. त्यामुळे वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी अनेक जण डायटिंग सुरू केल्यानंतर सर्वात पहिले तुप खाणे बंद करतात. पण तसे अजिबात नाही. देशी तुपामुळे आपला मेंदू आणि शरीर तंदुरूस्त राहण्यास मदत होते. काही आजारांमध्ये डॉक्टरांतर्फे तुप खाण्याचा सल्ला दिला जातो. पण हा सल्ला सर्वच रुग्णांना देण्यात येत नाही.
देशी तुपाचे फायदे (Benefits of Ghee) : देशी तुपामध्ये शॉर्ट चेन फॅटी ऍसिड (Fatty Acids) असते त्यामुळे हे पचण्यास एकदम हलके असते. यामध्ये व्हिटॅमिन ए , डी (Vitamin A and D) आणि कॅल्शियम (Calcium), फॉरस्फोरस (phosphorus), मिनरल्स (Minerals), पोटॅशियम (Pottasium) या सारखे अनेक पोषक तत्व देखील उपल्ब्ध असतात. रोज शुद्ध तुप खाल्ल्याने वात आणि पित्त शांत राहण्यास मदत होते. शुद्ध तुप खाण्याने पचन क्रिया उत्तम राहते. मुलांच्या जन्मानंतर शरीरातील वात वाढ होते. त्यासाठी शुद्ध तुप खाल्ले पाहिजे.
ऱ्हदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉकेज असल्यास तुप लुब्रिकेंटचे काम करते. गॅसेसचा त्रास कमी करण्यासाठी तुप खुप फायदशीर आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील पित्त वाढते ते कमी करण्यासाठी तुपाचे सेवन करावे. डाळी शिजवतांना तुप टाकल्याने गॅस होण्याचा त्रास कमी होतो. तुपामुळे डोळ्यांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होते. देशी तुप (Pure Ghee) खाल्ल्यामुळे सांधेदुखीचा त्रास (Joint pain) कमी होण्यास मदत होते. देशी तुपाने डोक्याची मालिश केल्यामुळे केस लवकर पांढरे होत नाही तसेच त्वचेमध्ये चमक येण्यास मदत होते.