ETV Bharat / sukhibhava

Aarogya mantra : अधिक बोलण्याचे आहेत 'हे' अनोखे फायदे; जाणून घ्या - बोलण्यामुळे आपले ज्ञान वाढते

तज्ज्ञ सांगतात की, मेंदूला चालना देण्यासाठी आणि स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठी कायम नवीन गोष्टी शिकायला हव्यात. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यही निरोगी असणे आवश्यक आहे. बोलण्याने चेहऱ्याच्या सक्रिय स्नायूंचा व्यायाम होतो तसेच अधिक बोलण्याचे इतरही फायदे आहेत, चला तर जाणून घेवूया. (Speaking benefits)

know the benefits of Speaking
अधिक बोलण्याचे आहेत 'हे' अनोखे फायदे
author img

By

Published : Nov 11, 2022, 4:10 PM IST

तज्ज्ञ सांगतात की, मेंदूला चालना देण्यासाठी आणि स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठी कायम नवीन गोष्टी शिकायला हव्यात. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यही निरोगी असणे आवश्यक आहे. बदलती जीवनशैली, ताणतणाव यामुळे आपल्या मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम पाहायला मिळतात. त्यामुळे संवाद साधणे गरजेचे (Speaking benefits) आहे. संवादामुळे बराचसा ताण कमी होतो. बोलण्याने मेंदू सक्रिय होतो त्यामुळे मेंदू सक्रिय राहतो. कारण भाषा आणि विचार एकमेकांशी संवाद साधतात, विशेषत: पटकन बोलत असताना, ज्यामुळे नैसर्गिकरित्या विचारांचे प्रतिबिंब जलद होते आणि स्मरणशक्ती देखील वाढते. जे ज्येष्ठ नागरिक बोलत नाहीत, त्यांची स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता असते.

धोके कमी होतात: बोलण्याने चेहऱ्याच्या सक्रिय स्नायूंचा व्यायाम होतो (talking exercises active facial muscles) आणि त्याच वेळी घशाचा व्यायाम होतो. फुफ्फुसाची क्षमता देखील वाढते, त्याच वेळी यामुळे डोळे आणि कान खराब होण्याचा आणि बहिरेपणाचा धोका कमी होतो. तसेच चक्कर येणे यांसारखे धोके कमी होतात. बोलण्याने खूप तणाव दूर होतो आणि मानसिक आजार टाळतो. आपण बऱ्याचदा काहीही बोलत नाही. आपण ते आपल्या मनात दाबून ठेवतो आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतो हे तितकेच खरे आहे. वरिष्ठांना अधिक बोलण्याची संधी दिल्यास आनंद होईल आणि त्यांच्यातला उत्साह अधिक वाढेल. थोडक्यात, सेवानिवृत्त, म्हणजेच ज्येष्ठ नागरिक अल्झायमरपासून बचाव करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शक्य तितके बोलणे आणि लोकांशी सक्रियपणे संवाद साधणे.

मेंदूचा विकास होतो: बोलण्यामुळे आपले ज्ञान वाढते आणि आपल्या मेंदूचा विकास होतो. कामाच्या अति व्यापामुळे मेंदूलाही थकवा जाणवू शकतो असे तज्ज्ञ सांगतात. मेंदूला पुन्हा फ्रेश करण्यासाठी दररोज पाॅझिटीव बोलले पाहिजे. तसेच ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधल्याने आपल्याला त्यांचे अनुभव ऐकायला मिळतील. एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना सक्रिय राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. यासाठी स्वतःला सदैव सक्रिय राहण्याचीही सवय लावा. दिवसेंदिवस तुम्ही काहीतरी नवीन शिकत आहात याची नोंद करत राहा. सवयींमध्ये केलेल्या बदलांमुळे स्वतःमध्ये आलेले सकारात्मक बदल इतरांशी शेअर करा.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.