ETV Bharat / sukhibhava

लोह कमतरता मुलांच्या सर्वांगिण विकासावर परिणाम करू शकते - Iron deficiency children etv bharat

मुलांमध्ये लोहाची कमतरता (iron deficiency) असल्यास त्यांच्या संपूर्ण शारीरिक आणि मानसिक विकासावर परिणाम होतो. इतकेच नव्हे तर लोह कमतरतेमुळे त्यांना पंडुरोग (anemia) देखील होऊ शकतो.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Jul 26, 2021, 5:10 PM IST

Updated : Jul 26, 2021, 5:28 PM IST

मुलांच्या शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक विकासासाठी लोहाचे (iron) पोषण अतिशय महत्वाचे मानले जाते. लोहाच्या कमतरतेमुळे शरीरातील हिमोग्लोबिनच्या पातळीवर परिणाम व्हायला लागते, जे आरोग्यास विविध प्रकारे नुकसान पोहचवू शकते आणि अॅनिमिक देखील बनवू शकते. मुलांमध्ये लोहची आवश्यकता ही वेगवेगळ्या वयोगटानुसार वेगवेगळी असू शकते.

मुलांमध्ये लोहाची कमतरता (iron deficiency) त्याचे शरीरावर प्रभाव आणि वयानुसार लोहाची (iron) गरज याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही भारत सुखीभवने' देहरादून येथील वरिष्ठ बाल रोग तज्ज्ञ डॉ. लतिका जोशी यांच्याशी बातचित केली.

मुलांमध्ये लोहाची कमतरता त्यांच्या आरोग्यास हानी पोहचवू शकते

डॉक्टर लतिका सांगतात की, लोह आपल्या शरीरातील महत्वाच्या पोषक तत्वांपैकी एक घटक आहे. हा फक्त मोठेच नव्हे तर मुलांसाठी देखील महत्वाचा असतो. सामान्यत: बहुतांश आई-वडील हे मुलांमध्ये जीवनसत्वे (vitamin) आणि प्रथिने (protein) यांचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी विशेष प्रयत्न करतात, पण बहुतांश पालक मुलांच्या लोहयुक्त आहारावर लक्ष देत नाहीत. लोह (iron) हे मुलांच्या मनाच्या आणि शरीराच्या बळकटीकरणासाठी आवश्यक आहे. असे असूनही पालक त्याकडे दुर्लक्ष करतात.

लोह महत्वाचे का आहे?

लोहाची (iron) कमतरता झाल्यास शरीरात लाल रक्तपेशी कमी प्रमाणात तयार होतात. त्यामुळे, शरीरातील इतर भागांना आवश्यक्तेनुसार रक्त पुरवठा होत नाही. लोह हे रक्तातील हिमोग्लोबीनचे स्तर वाढवून लाल रक्त पेशींच्या निर्मितीला संतुलित करते आणि ऑक्सिजनला शरीरातील विविध अंगात पोहचवण्याची क्षमता वाढवते.

लोहाच्या कमतरतेमुळे पंडुरोग (anemia) होऊ शकते. अशा अवस्थेत मुलांना आयरन फोलिक अॅसिड, विटामिन-सी, प्रोटीन आणि विटामीन-बी ची सर्वात अधिक गरज असते.

लोह कमतरतेची लक्षणे आणि चिन्हे

लोहाच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये पुढील लक्षणे आणि चिन्हे दिसू शकतात,

1) थकवा आणि भूक न लागणे.

2) शरीराची मंद वाढ आणि विकास.

3) असमान श्वास.

4) लगातार संसर्ग होणे.

5) अशक्तपणा.

6) त्वचा, विशेषकरून नखे आणि डोळे पिवळे दिसून येणे.

7) मुले चिडचिडे आणि सुस्त होतात.

लोहाचे (iron) स्रोत

शाकाहारी : हिरव्या पालेभाज्या, फळे विशेषत: सफरचंद आणि डाळिंब, डाळी, बीटरूट, कोरडी फळे जसे खजूर काळा मनुका आणि मनुका.

मासाहारी : अंडे ऑर्गन मीट जसे, लीवर, मच्छी, चिकन, टर्की, लाल मांस, मटन किंवा कोकरू (lamb).

डॉ. लतिका सांगतात, मुलांच्या शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी त्यांना लोहसोबतच विटामिन-सी ची भरपूर खुराक पण दिली जावी, कारण ते शरीरात लोहाच्या शोषणाचे (absorption) काम करते. यासाठी टोमॅटो, ब्रोकोली संतऱ्याचे ज्यूस आणि स्ट्रॉबेरीचे सेवन देखील केले जाऊ शकते.

किती लोह आवश्यक आहे?

डॉ. लतिका जोशी सांगतात की, स्तनपान करणाऱ्या 4 ते 6 महिन्यांच्या बालकांना आयरनची गरज नसते, कारण त्यांना ते मातेच्या दुधापासून मिळत राहते. काही विशेष परिस्थितीत जर बालकाची लोहाची गरज मातेच्या दुधातून पूर्ण होत नसेल तर चिकित्सक त्यांना लोह (iron) ड्रॉप किंवा आयरनयुक्त फॉर्म्यूला दूध देण्याचा सल्ला देतात.

सामान्य परिस्थितीत 7 ते 12 महिन्यांच्या बालकाला रोज 11 मिलीग्राम, 1 ते 3 वर्षांच्या बालकाला रोज 7 मिलीग्राम, 4 ते 8 वर्षांच्या मुलांना 10 मिलीग्राम आणि 9 ते 13 वर्षांच्या मुलांना प्रत्येक दिवस 8 मिलीग्राम लोहाची (iron) गरज असते.

11 पेक्षा अधिक वय असलेल्या मुलाला 11 मिलीग्राम आणि मुलीला 15 मिलीग्राम रोज लोहाची गरज असते. एका वयानंतर मुलींना मुलांच्या तुलनेत जास्त लोहाची गरज असते.

कोणत्या मुलांना लोहाच्या कमतरतेचा धोका आहे?

1) वेळेपूर्वी जन्म घेणारी प्रिमॅच्यूअर बालके.

2) एक वर्षांपेक्षा कमी वयातच गाय, बकरीचे दूध पिणारी बालके.

3) लोह फॉर्म्यूल्याचा अभाव असणारे दूध पिणारी बालके.

4) गंभीर आजाराने ग्रस्त असलेली मुले.

Last Updated : Jul 26, 2021, 5:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.