हैदराबाद : 'आंतरराष्ट्रीय शेफ दिवस' आज जगभरात साजरा केला जात आहे. याची सुरुवात 2004 साली शेफ डॉ. बिल गॅलाघर यांनी केले होती. ते आता हयात नाहीत. शेफच्या समाजातील योगदानाचा गौरव करणं हा त्याचा उद्देश आहे. या दिवशी शेफ समुदाय मुलांच्या पुढच्या पिढीला स्वयंपाक, निरोगी खाण्याशी संबंधित कला आणि कौशल्यं शिकवतो. त्यांना या व्यवसायात सामील होण्यासाठी आमंत्रित करतो.
1928 वर्ल्ड शेफची स्थापना : अनेक वर्षांपासून, वर्ल्ड शेफ, नेस्ले व्यावसायिकांच्या सहकार्यानं, जगाच्या विविध भागांमध्ये मुलांना शिक्षित करण्यासाठी मोहीम राबवत आहे. हे मजेदार कार्यक्रम होस्ट करण्यासाठी टूलकिटदेखील प्रदान करतं. स्विस कुक्स फेडरेशनने 1920 च्या दशकात आंतरराष्ट्रीय शेफ असोसिएशन तयार करण्याची कल्पना मांडली. आठ वर्षांनंतर 1928 मध्ये, पॅरिसमधील सोर्बोन येथे वर्ल्ड शेफची स्थापना झाली. शेफची जागतिक संघटना म्हणून ही संस्था आपली जबाबदारी पार पाडते.
आंतरराष्ट्रीय शेफ डे थीम : आंतरराष्ट्रीय शेफ डे 2023 ची थीम 'ग्रोइंग ग्रेट शेफ' आहे. नेस्ले प्रोफेशनल आणि वर्ल्ड शेफ यांनी संयुक्तपणे या थीमची घोषणा केली आहे. थीम दिवंगत शेफ डॉ. बिल गॅलेघर यांचा गौरव करण्यात आला. डॉ. गॅलेघरच्या इच्छेनुसार, यावर्षी जगभरातील विविध देशांतील तरुणांना शेफ बनण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा त्यांचा उद्देश आहे.
पाककला बाजाराचा विस्तार : आजकाल स्वयंपाक करण्याची कला खूप महत्त्वाची मानली जाते. यामध्ये जगभरातील रेस्टॉरंट्स आणि कॅफे, टीव्ही, पुस्तके, संबंधित व्यावसायिक शेफ यांचा समावेश आहे. सर्वसामान्यांच्या अभिरुचीतील बदल, खर्च करण्यासाठी उपलब्ध पैसा, इंटरनेट आणि सोशल मीडियाची उपलब्धता यामुळे स्वयंपाकाचे जग आणखी बदलण्याची आणि विस्तारण्याची शक्यता आहे. भारतीय पाककृती खूप समृद्ध आहे. भारतानं जगाला अनेक उत्कृष्ट पदार्थ आणि पाककृती दिल्या आहेत.
जगात आपला ठसा उमटवणारे भारतीय शेफ : भारतात अनेक प्रसिद्ध शेफ आहेत. पाककलेसाठी अनेकांना अनेक पुरस्कार मिळाले. अनेक शेफ त्यांच्या टीव्ही कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध झाले, काही त्यांच्या स्वयंपाकाच्या लेखनासाठी तर काही त्यांच्या अनोख्या आणि नाविन्यपूर्ण पाककृतींसाठी. त्यांच्यापैकी बरेच जण त्यांच्या रेस्टॉरंट चेनमुळे भारतात आणि परदेशात प्रसिद्ध झाले. अनेक मास्टर शेफ अनेक उत्पादनांचे उत्कृष्ट उद्योजक आणि ब्रँड अॅम्बेसेडर बनले. TEDxसारख्या शोमध्ये वक्ते म्हणून त्यांची मते मांडण्यासाठी अनेक शेफना आमंत्रित करण्यात आले आहे. जाणून घ्या भारतातील 10 शेफ ज्यांनी आपल्या कामामुळे जगात आपला ठसा उमटवला.
- विकास खन्ना
- संजीव कपूर
- शिप्रा खन्ना
- मधुर जाफरी
- रणवीर बराड
- तरला दलाल
- विकी रत्नानी
- रितू डालमिया
- फ्लॉइड कार्डोझ
- पंकज भदौरिया
हेही वाचा :