ETV Bharat / sukhibhava

मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी 'या' उत्पादनांचाही होतो वापर, वाचा.. - menstruation tampons use

एक काळ होता जेव्हा महिला मासिक पाळीच्या वेळी फक्त सुती कपडे वापरत असत. पण, जसा काळ पुढे सरकत गेला बाजारात अनेक आरामदायी आणि स्वच्छता प्रदान करणारी नवीन आणि नाविन्यपूर्ण उत्पादने उपलब्ध झालीत. अशाच 5 उत्पादनांची माहिती महिलांना माहिती असणे आवश्यक आहे.

hygiene during menstruation
मासिक पाळी स्वच्छता
author img

By

Published : Oct 6, 2021, 8:45 PM IST

दर महिन्याला 3 ते 4 दिवस मासिक पाळीवेळी प्रत्येक महिलांना अस्वस्थतेसह वेदना आणि तीव्र पोटदुखीचा सामान करावा लागतो. अस्वस्थता ही सॅनेटरी नॅपकिन्स वापरताना उद्भवणारा ओलेपणा आणि इतर समस्यांमुळे वाटते, विशेषकरू तेव्हा जेव्हा सॅनेटरी नॅपकिन्स बऱ्याच तासांपर्यंत वापरलेले असते. पूर्वी स्त्रिया पॅडऐवजी सुती कपडे वापरत असत, परंतु आता अस्वस्थता कमी करण्यासाठी आणि स्वच्छ मासिक पाळीसाठी इतर अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत.

मध्यप्रदेशमधील देवास येथील प्रख्यात स्त्रिरोगतज्ज्ञ डॉ. प्राची माहेश्वरी स्पष्ट करतात की, मासिक पाळीवेळी स्वच्छतेच्या अभावामुळे जगातील मोठ्या संख्येने माहिला विविध आरोग्य स्थितींनी ग्रस्त आहेत. परंतु, जसजसे आपण प्रगती करत आहोत, महिला स्वच्छतेविषयी अधिक जागरूक झाल्या आहेत आणि आरामाची खात्री करणारी स्वच्छताविषयक उत्पादने वापरण्यास उत्सुक आहेत. मासिक पाळीवेळी कालावधी आणि रक्त प्रवाह हे विविध महिलांमध्ये भिन्न असू शकतात. प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी विविध स्वच्छता उत्पादने (sanitary products) उपलब्ध आहेत. पुढे काही उत्पादनांची माहिती देण्यात आली आहे, जी महिलांना माहिती असणे आवश्यक आहे.

1) सॅनिटरी नॅपकिन

Sanitary napkin
सॅनिटरी नॅपकिन

सॅनिटरी नॅपकिन हे मुलींमध्ये आणि स्त्रियांमध्ये सर्वात अधिक वापरले जाणारे उत्पादन आहे. सहज उपलब्धता आणि वापरण्यात सुलभता, यामुळे ते अधिक श्रेयस्कर आहे. ते विविध आकांरांमध्ये देखील उपलब्ध आहेत आणि त्यास बॅग किंवा पर्समध्ये सहजपणे नेता येऊ शकते.

2) टॅम्पॉन

Tampons
टॅम्पॉन

टॅम्पॉन हे मोट्रो शहरातील नोकरदार महिलांमध्ये अधिक प्रचलित आहे. योनीमध्ये टॅम्पॉन घालणे आवश्य असल्याने अनेक महिला ते वापरण्याबाबत थोडे संकोच करतात आणि चिंताग्रस्त होतात. एका वापरानंतर त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. जोरदार रक्तस्त्राव झाल्यास टॅम्पॉनचा वापर अधिक आरामदायक मानला जातो. ते रेग्यूलर, सुपर आणि सुपर प्लस साईझमध्ये येतो. पोहणे किंवा इतर तत्सम क्रियाकलापावेळी टॅम्पॉन वापरणे हा एक चांगला पर्याय आहे.

3) मेन्सट्रुअल कप

Menstrual cup
मेन्सट्रुअल कप

स्वच्छतेच्या बाबतीत साधारणपणे मेन्सट्रुअल कप हे चांगले मानले जातात. ते वापरायला कठीण जाते, असा एक सामान्य समज आहे. मात्र, वापर करणाऱ्या बहुतांश महिला त्याच्याशी सहमत नाही. प्रत्यक्षात मेन्सट्रुअल कप हा टॅम्पॉनसारखा असतो आणि त्याला देखील योनीत घालावे लागते. फरक एवढाच आहे की, त्याला पुन्हा वापरता येऊ शकते. जेव्हा कप पूर्ण भरतो तेव्हा त्यास खाली करून, स्वच्छ करून पुन्हा वापरता येते. ते इको - फ्रेंडली असून त्याची किंमतही कमी असते.

4) पीरियड अंडरवेयर

Period underwear
पीरियड अंडरवेयर

मासिक पाळीसाठी विशेषत: तयार केलेले पीरियड अंडरवेयर देखील मासिक पाळीदरम्यान एक चांगला पर्याय मानला जाते. त्यांची शोषण क्षमता खूप अधिक असते, त्यामुळे सामान्य अंडरवेअरसारखे त्यांना डाग लागत नाही. त्यांना पीरियड पॅन्टीस म्हणून देखील ओळखल्या जाते. ते इको - फ्रेंडली असून त्यांना स्वच्छ करून पुन्हा वापरले जाऊ शकते.

5) पॅन्टी लाइनर्स

पॅन्टी लाइनर्स पॅडसारखे असतात, पण त्यांचा आकार छोटा असतो. सॅनिटरी नॅपकिन्स प्रमाणे त्यांना पॅन्टीसना चिंपकवता येते. पण, जेव्हा ब्लिडिंग सामान्य असते तेव्हा त्याचा वापर करू नये. मासिक पाळीच्या शेवटच्या दिवसांमध्ये जेव्हा फ्लो कमी असतो किंवा पीरियड्स संपतात आणि काही दिवसांसाठी छोटी स्पॉटींग दिसून येते तेव्हा त्यास वापरले पाहिजे. त्याची शोषूण घेण्याची क्षमता कमी असते आणि म्हणूनच डाग पडण्याची संभाव्य शक्यता टाळण्यासाठी महिला टॅम्पॉनसह किंवा मेन्सट्रुअल कपसह त्याचा वापर करतात.

हेही वाचा - डासांना पळवून लावण्यासाठी 'या' वनस्पती ठरू शकतात फायदेशीर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.