अनेक वेळा मिरची कापल्यानंतर (after chilly cutting) हाताला तीव्र जळजळ होते. स्वयंपाकघरात (Kitchen) काम करताना हिरवी (green) किंवा लाल मिरची (red chilies) कापल्यानंतर हातांमध्ये (hands) होणारी जळजळ (burning sensation) ही एक सामान्य समस्या (common problems) आहे. ही जळजळ याला आपण आपल्या सोप्या भाषेत तिखट लागणं असं म्हणत असतो. जे साबणाने धुतल्यानंतरही कमी होत नाही. दुसरीकडे, शरीराच्या कोणत्याही भागाला हात लागला तर तिथेही जळजळ सुरू होते. जर तुमच्यासोबतही असे घडत असेल तर येथे काही युक्त्या आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता.
कोरफड जेल: तज्ज्ञांच्या मते, सूर्यप्रकाशाप्रमाणे मिरचीच्या जळजळीवर कोरफड जेल (Aloe Vera Gel) लावल्यास मदत होऊ शकते. हे रक्त प्रवाह वाढविण्यात मदत करू शकते आणि त्वचेवर मिरचीच्या जळजळीत काही तात्पुरते आराम देण्यास मदत करू शकते.
कात्रीचा वापर करावा: मिरची कापण्यासाठी चाकूचा वापर करू नये. त्याऐवजी मिरच्या कात्रीने (use scissors) कापल्या पाहिजेत. यामुळे मिरची लवकर कापली जाईल तसेच हात जळण्याची समस्याही उद्भवणार नाही. काही कारणास्तव सुरी वापरावी लागली तर हातात मिरची कापण्याऐवजी बोर्डवर किंवा प्लेटमध्ये ठेवून कापता येते.
तूप वापरा: मिरची कापल्यामुळे हाताला जळजळ होत असेल तर तूप वापरू शकता. मिरचीचा जळजळ दूर करण्यासाठी ही आजीची आवडती रेसिपी आहे. तसेच तूप लावल्याने त्वचा मऊ होते.
थंड दूध वापरा: तज्ज्ञांच्या मते, हाताची जळजळ थांबवण्यासाठी दूध हा उत्तम उपाय आहे. दुधामध्ये असलेल्या फॅट्समुळे जळजळ दूर होण्यास मदत होते. सर्वोत्तम परिणामांसाठी थंड दूध वापरा. आराम मिळण्यासाठी दुधात बर्फाचे तुकडे टाका.
हातांवर लावा मध: कोरफडीप्रमाणे मधातही औषधी गुण असतात. जळणाऱ्या हातांवर व्यवस्थित मध लावल्याने ही जळजळ कमी होते.
लिंबू वापरूनही करा जळजळीवर उपाय: आपल्या हातांवर लिंबाचा रस किंवा लिंबू लावल्यानेही जळजळीपासून सुटका मिळते. तसेच कोणत्याही दुष्परिणामांचाही धोका राहात नाही.