ETV Bharat / sukhibhava

How to Handle Emotion : प्रत्येकाच्या बोलण्याने दुखावले जाता; म्हणून या मार्गांनी स्वतःला बनवा भावनिकदृष्ट्या कणखर... - कमतरता दूर करण्याचा विचार

भावनिक होणे, ही काही चुकीची गोष्ट नाही. पण जेव्हा इतर कोणत्याही व्यक्तीचे शब्द तुम्हाला त्रास देतात तेव्हा त्याचे नकारात्मक परिणाम दिसायला लागतात. मग ती व्यक्ती तुमच्यासाठी खास असो वा नसो. या परिस्थितीत स्वत:ला कसे सावरायचे, हे तुम्हाला कळले पाहिजे. जाणून घ्या भावनिक आघातातून तुम्ही स्वतःला कसे वाचवू शकता.

How to Handle Emotion
भावनिकदृष्ट्या मजबूत
author img

By

Published : Aug 14, 2023, 2:47 PM IST

हैदराबाद : आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत, ज्यांना प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीबद्दल वाईट वाटते. महत्त्वाचे म्हणजे दुखावणारी व्यक्ती आपल्या नात्यातली, मित्रपरिवारातली नसली तरीही त्यांच्या बोलण्याने संवेदनशीन माणसे दुखावली जातात. दिवसेंदिवस तणावात राहतात. जर तुम्ही देखील या लोकांपैकी एक असाल तर नक्कीच तुम्हाला खूप भावनिक असण्याचे तोटे ठाऊक असतील. आज आम्ही तुमच्यासोबत अशाच काही टिप्स शेअर करणार आहोत, ज्या तुम्हाला तुमच्या सवयीमध्ये समाविष्ट कराव्या लागतील.

प्रत्येकाकडून अपेक्षा ठेवण्याची सवय सोडा : जेव्हा तुम्ही कोणाकडून खूप अपेक्षा करता आणि ते तुमच्या अपेक्षा पूर्ण करत नाही, तेव्हा तुम्ही वाईट वाटून घेता. अशा प्रसंगी एक उपाय आहे, तो म्हणजे कुणाकडूनही अपेक्षा करण्याची सवय सोडणे. ज्यांच्याबद्दल तुम्हाला खात्री आहे त्यांच्याकडून आशा ठेवा. मानसिक आघातापासून तुम्ही सुरक्षित राहाल.

चांगल्या लोकांबरोबर राहा : याचा अर्थ तुमच्यासारख्या कमी अधिक प्रमाणात लोकांसोबत असणे. अशा व्यक्ती तुमच्या भावना चांगल्या प्रकारे समजून घेतील आणि तुम्हाला दुखावण्याचा विचारही करणार नाहीत. दुष्टांचा सहवास टाळा, इतरांमध्ये दोष शोधू नका. असे लोक फक्त नकारात्मकता पसरवतात आणि तुम्हाला दुखावतात.

स्वतःच्या कमतरता ओळखा : जर कोणी तुम्हाला असे काही बोलले असेल, ज्यामुळे तुम्ही खूप अस्वस्थ होत असाल, तर त्यावर ताण घेण्याऐवजी बसून विचार करा की त्याचे कारण काय असू शकते. तुमच्या स्वभावातील काही दोष निदर्शनास आले असतील तर नाराज होण्याऐवजी ती कमतरता दूर करण्याचा विचार करा.

उत्तर देणे आवश्यक आहे : भावनिक व्यक्ती कधीकधी इतरांच्या बोलण्याला प्रतिसाद देऊ इच्छित नाही. ज्यामुळे ते फक्त स्वतःशी विचार करत आतल्या आत कुढत राहतात. म्हणून उत्तर देणे, हा सोपा उपाय आहे. जर तुम्हाला कोणाची एखादी गोष्ट आवडत नसेल तर ती गोष्ट ऐकून घेण्याऐवजी प्रतिसाद द्यायला शिका. असे केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही स्वतःवरचा भावनिक आघात टाळू शकता.

हेही वाचा :

  1. Crack Heels Remedies : भेगा पडलेल्या टाचांना करा हे सोपे घरगुती उपाय; मिळेल आराम...
  2. Jeera Water Benefits : जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्याल तर शरीराला मिळतील हे आश्चर्यकारक फायदे...
  3. Menopause Diet : 'मेनोपॉज'चा होतोय त्रास ? आहारात खा 'हे' खाद्यपदार्थ, मिळेल आराम...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.