काही पालक येऊन सांगतात, की त्यांचे मूल बराच काळ वैद्यकीय उपचार घेत असल्याने त्याचा अभ्यासातला रस कमी होत आहे. दुसरे पालक अपत्याबद्दल काळजी व्यक्त करत सांगतात की त्यांना शिकवणे खूपच कठीण आहे. कारण एकदा का ते खेळून आले की कंटाळतात आणि मग ते अभ्यासाला बसत नाहीत. मुलाला अभ्यासासाठी बसवणे महाकठीण काम. पण त्याच वेळी आपल्याला हेही समजून घ्यायला हवे की मुलांसाठी ‘खेळ‘ सर्व काही आहे. तेव्हा या दोन्हीमध्ये समतोल कसा काय साधायचा?
मुंबईच्या बोरिवली इथल्या प्रफुल्ता सायकॉलॉजिकल वेलनेस सेंटर मधील करियर समुपदेशक आणि माइंडसाइट, माइंडार्ट, कॉफी कनर्व्हरसेशन्सच्या मानसशास्त्रज्ञ आणि प्ले थेरपिस्ट काजल दवे यांनी मुलांना खिलाडू पद्धतीने अभ्यासात कसे गुंतवायचे याच्या काही टिप्स दिल्या.
मुलांना खेळताना सामर्थ्यवान वाटते. तसेच त्यांना तणावरहित वाटते आणि मुले खेळताना सृजनशील होतात.
- समजा मुलाला धडे वाचण्यात रस नसेल तर त्याला कथा सांगणे किंवा कथेतल्या व्यक्तिरेखा साकारणे हे करायला सांगा.
- समजा मुलांना अर्थ शिकणे कठीण जात असेल तर त्या संकल्पनेचे गुण वर्णन करा आणि ‘ ओळखा पाहू ‘ हा खेळ खेळा. तुमच्या मुलाचे मन चित्रे काढण्यात रमत असेल , तर तुम्ही माध्यम म्हणून चित्रांची डिक्शनरी वापरू शकता.
मुलाने पूर्ण झोकून शिकायचे असेल तर त्याला त्या विषयात रस असणे हे खूप महत्त्वाचे ठरते. समजा मुलाला एखादा विषय अजिबात आवडत नसेल, तर कदाचित वेगवेगळ्या भावना त्या विषयासंबंधी असू शकतील. उदाहरणार्थ गणिताबद्दलची भीती, लिहायची इच्छा नसणे आणि या सर्वामध्ये आणखी भावनेची भर पडते ती म्हणजे मुलाला तणाव जाणवतो, त्याचा शिकण्यातला रस जातो आणि हे सर्व कसे झेपवायचे याबद्दलची चिंता त्याला जाणवायला लागते. समजा मुलाच्या डोक्यावरून इंग्लिश भाषा जात असेल, तर नाट्य रूपांतर करा किंवा व्यक्तिरेखा रेखाटा आणि गोष्ट किंवा संवादांचा वापर करून जास्त सृजनशील करता येईल. त्यामुळे मुलांवरचा तणाव कमी होईल.
शिक्षणासाठी गॅझेट्सचा उपयोग कसा करायचा?
गॅझेट्स वापरामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असेल तर अभ्यासासाठीच त्यांचा उपयोग करून घ्या. समजा मुलाला कम्प्युटर आवडत असेल, पण तो सतत त्यावर गेमच खेळत असेल तर मग व्हाईट बोर्डसाठीचे साॅफ्टवेअर वापरून त्याला टायपिंग करण्यासाठी प्रोत्साहित करा, क्वीझची आवड निर्माण करा. तसेच मित्रांबरोबर ऑनलाइन अभ्यास करण्याचीही आवड निर्माण करता येईल. यामुळे तुमचे मूल रचनात्मक अभ्यासात व्यग्र राहील. तुमच्या अपत्याला गायनाची आवड असेल तर कराओके अॅप वापरा आणि मुलाने अभ्यास पूर्ण केला तर याचा उपयोग बक्षीस म्हणून करता येईल.
विविध भावना हाताळणे
मुलांच्या दिनक्रमात बदल झाला, एक प्रकारची अनिश्चितता असेल, त्यांच्या शारीरिक हालचालींवर बंधने येत असतील तर मुले वेगवेगळ्या भावनांतून जातात. अशा परिस्थितीत काय होऊ शकते , याबद्दल मुलाची मानसिक तयारी करा. त्याच्या वयाला योग्य अशी निवड करण्याची परवानगी द्या. या शिवाय भावना व्यक्त करण्यासाठी खेळणी एकदम उपयोगी पडतात. लहान मुलांसाठी कठपुतळ्या, बाहुली आणि अॅक्शन फिगर्स उपयोगी पडतात. मोठ्या मुलांसाठी रुपके, ईमोजीस, सामाजिक परिस्थिती यामुळे निर्णयक्षमता वाढते. या सर्व गेम्सचा उपयोग होतो.
अधिक माहितीसाठी काजल दवे यांच्याशी davekajal26@gmail.com इथे संपर्क साधा.