ETV Bharat / sukhibhava

काही लोक इतरांच्या तुलनेत लवकर बरे कसे होतात? या संशोधनातून मिळू शकते उत्तर - वेगवेगळी अँटिबॉडी

यूट्रेक्ट विद्यापीठातील रसायनशास्त्र आणि औषधशास्त्राचे प्राध्यापक अल्बर्ट जे आर हेक यांनी एका मुलाखतीत सांगितले की, प्रत्येक व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वेगळी असल्याचे दिसून येते. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी निरोगी आणि आजारी लोकांच्या रक्तामधील अँटिबॉडीज मोजल्यानंतर प्रतिकारशक्तीमधील हा फरक शोधला.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Oct 31, 2021, 7:03 PM IST

यूट्रेक्ट विद्यापीठातील रसायनशास्त्र आणि औषधशास्त्राचे प्राध्यापक अल्बर्ट जे आर हेक यांनी एका मुलाखतीत सांगितले की, प्रत्येक व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वेगळी असल्याचे दिसून येते. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी निरोगी आणि आजारी लोकांच्या रक्तामधील अँटिबॉडीज मोजल्यानंतर प्रतिकारशक्तीमधील हा फरक शोधला.

रोग प्रतिकारशक्तीवरील हे संशोधन स्पष्ट करू शकते की, काही लोकांसाठी कोविड 19 ची लस कमी प्रभावी का दिसून येते? त्याचबरोबर, हे संशोधन व्यक्तींमध्ये विशेषत: प्रभावी अँटिबॉडीची ओळख करणे, त्यांना मिळवणे आणि इतरांना बरे करण्यासाठी त्यांचा वापर याबद्दल माहिती प्रदान करते.

आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या शरीराचा अनेक जंतूंशी सामना होतो आणि ते त्याचावर हल्ला करतात. ते आपल्या शरीरावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्या शरीरात खूप हुशारीने प्रवेश करतात. सुदैवाने आपल्याकडे एक शक्तिशाली संरक्षण प्रणाली आहे, ती म्हणजे रोगप्रतिकारशक्ती.

जर आपली रोग प्रतिकारशक्ती चांगल्याने काम करत असेल तर, आपण सतत आणि आक्रमकपणे आपल्यावर हल्ला करणाऱ्या बहुतेक जंतूशी यशस्वीरित्या लढू शकतो. हल्ला करणाऱ्या जंतूंना अप्रभावी करण्यासाठी आपल्या शस्त्रागारमधील प्रथिने रेणू हे आपले शस्त्र असते ज्यांना अँटिबॉडीज देखील म्हटले जाते.

प्रत्येक जंतूचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी वेगवेगळ्या शस्त्रांची (अँटिबॉडी) गरज पडते. आपल्या शरीराने आपल्याला अब्जावधी भिन्न अँटिबॉडी पुरवले आहेत, ही चांगली बाब आहे, परंतु या सर्व अँटिबॉडी एकाच वेळी तयार होऊ शकत नाही. अनेकदा काही विशेष अँटिबॉडी एका विशेष जंतूच्या हल्ल्याच्या वेळीच तयार होतात.

आपल्याला जिवाणूंचा संसर्ग झाल्यास त्यांचा नायनाट करण्यासाठी आपण अँटिबॉडी बनवतो. जर आपल्याला कोरोना विषाणूची लागण झाली तर, आपण त्या विषाणूला निष्प्रभ करण्यासाठी अँटिबॉडी बनवू लागतो. फ्ल्यू विषाणूची लागण झाल्यास देखील आपण परत इतर अँटिबॉडी बनवतो.

रक्तात किती वेगवेगळ्या अँटिबॉडी तयार होतात आणि आपल्या रक्तात किती अँटिबॉडी आहेत हे एकेकाळी माहीत नव्हते. बऱ्याच शास्त्रज्ञांनी अंदाज लावला की, ते कित्येक अब्जांपेक्षा जास्त आहे आणि म्हणूनच ते जवळजवळ अथांग आहे.

आश्चर्यचकित करणाऱ्या दोन बाबी

सैद्धांतिकदृष्ट्या आपल्या शरीरात हजार, अब्जावधी भिन्न अँटिबॉडी क्षमता आहे, मात्र आश्चर्य तेव्हा वाटला जेव्हा आम्ही बघितले की, निरोगी आणि आजारी अशा दोन्ही लोकांच्या रक्तप्रवाहामध्ये उच्च संहतीकरणात (सांद्रता) केवळ काही शंभर भिन्न अँटिबॉडी उपस्थित होते.

आम्हाला दुसऱ्यांदा आश्चर्च तेव्हा वाटला जेव्हा रक्ताच्या काही थेंबापासून या प्रोफाइल्सचा आभ्यास करताना आम्ही बघितले की, सुक्ष्मजंतूंविरोधात प्रत्येक व्यक्तीची रोग प्रतिकारशक्ती वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देते आणि प्रत्येक व्यक्तीची अँटिबॉडी प्रोफाइल ही वेगळी असते.

या अँटिबॉडीची संहती आजारपणावेळी किंवा लसीकरणानंतर अनोख्या पद्धतीने बदलते. परिणाम हे सांगू शकतात की, का काही लोकांना फ्ल्यू किंवा कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो? किंवा ते दुसऱ्यांच्या तुलणेत काही आजारांपासून लवकर बरे का होतात?

आतापर्यंत शास्त्रज्ञ असे मानत होते की, रक्तातील अँटिबॉडीच्या अत्यंत जटिल मिश्रणाचे अचूकपणे शोध घेणे अशक्य आहे, मात्र मास स्पेक्ट्रोमेट्री पदार्थांना त्यांच्या आण्विक संरचनेच्या आधारावर वेगळी करते आणि प्रत्येक विशिष्ट अँटिबॉडीची भिन्न आण्विक संरचना असल्याने आम्ही सर्व अँटिबॉडीना स्वतंत्रपणे मोजण्यासाठी आवश्यक तंत्राचा शोध घेण्यात यशस्वी झालो.

या पद्धतीचा वापर जवळजवळ 100 लोकांमध्ये अँटिबॉडी प्रोफाइल मोजण्यासाठी केला गेला. या लोकांमध्ये कोविड - 19 आणि कोविड - 19 ची लस घेणारे लोक होते. जरी त्यांना समान लस मिळाली तरी, आम्हाला एकदाही दोन वेगवेगळ्या लोकांमध्ये समान अँटिबॉडी आढळली नाही. असे म्हणणे योग्य आहे की, प्रत्येकाची अँटिबॉडी प्रोफाइल त्यांच्या फिंगरप्रिंट्ससारखीच अद्वितीय आहे.

हेही वाचा - 'या' औषधी वनस्पती चिंता कमी करण्यात मदत करू शकतात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.