ETV Bharat / sukhibhava

Adenovirus Cases : या राज्यात एडेनोव्हायरसचा संसर्ग आहे सर्वाधिक, जाणून घ्या काय आहेत लक्षणे - एडेनोव्हायरस बाधित

पश्चिम बंगालमध्ये एडेनोव्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरल्याचे उघड झाले आहे. एडेनोव्हायरसच्या संसर्गामुळे पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत ४८ बालकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Adenovirus Cases
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 11, 2023, 10:35 AM IST

कोलकाता : देशात एडेनोव्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा हादरा बसला आहे. मात्र देशभरात तपासण्यात आलेल्या स्वॅबच्या नमुन्यांपैकी 38 टक्के एडेनोव्हायरस बाधितांची संख्या पश्चिम बंगालमधील असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ कॉलरा अँड एन्टेरिक डिसीज (NICED) यांनी नुकतेच याबाबत सर्वेक्षण केले आहे. त्यातून अनेक बाबींचा खुलासाही करण्यात आला आहे. 1 जानेवारी ते 9 मार्च या कालावधीत देशभरातील विविध व्हायरल रिसर्च डायग्नोस्टिक प्रयोगशाळांमध्ये 1708 नमुन्यांचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. या सर्व्हेक्षणात 650 नमुने एडेनोव्हायरस बाधित आढळल्याची माहिती एनआयसीडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बंगालमध्ये आढळले सर्वाधिक रुग्ण : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ कॉलरा अँड एन्टेरिक डिसीज (NICED) यांनी विविध राज्यातील रुग्णांच्या स्वॅबचे नमुने गोळा केले होते. त्यामधून धक्कादायक माहिती उघड करण्यात आली आहे. एडेनोव्हायरसमुळे बाधित झालेले सर्वाधिक रुग्ण पश्चिम बंगालमध्ये आढळले आहेत. पश्चिम बंगालमध्ये 650 नमुन्यांपैकी 38 टक्के बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर तामिळनाडू राज्यात 19 टक्के रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तर केरळ राज्यात 13 टक्के रुग्ण आढळून आले असून केरळ हे तिसऱ्या क्रमांचे राज्य ठरले आहे. दिल्लीतही एडेनोव्हायरसचे 11 टक्के रुग्ण आढळून आले असून चौथ्या क्रमांकावर आहे. तर महाराष्ट्रात ५ टक्के रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण आढळून आलेल्या राज्याच्या यादीत महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे.

एडेनोव्हायरसने बंगालमध्ये घेतले सर्वाधिक बळी : एडेनोव्हायरसमुळे पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक बळी गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र राज्यात एडेनोव्हायरसमुळे 19 बळी गेले आहेत. मात्र त्यातील ६ रुग्णांचा मृत्यू एडेनोव्हायरसमुळे झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर बाकी रुग्णांना इतर आजाराची लागण झाल्याचेीह त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते. मात्र आरोग्य विभागाच्या वतीने त्यांच्या दाव्याचे खंडन करत मृत्यूचा आकडा जास्त असल्याचे स्पष्ट केले आहे.

बालमृत्यूंचा आकडा पोहोचला ४८ वर : आरोग्य विभागाच्या सूत्रांनी एडेनोव्हायरसमुळे झालेल्या मृत्यूचा आकडा मोठा असल्याचा दावा केला आहे. त्यातही गेल्या 12 दिवसात ४८ बालमृत्यू झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. तर गेल्या 24 तासात तीन बालकांचा बळी गेल्याची माहितीही आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली आहे. मात्र काही नागरिक जाणूम बुजून एडेनोव्हायरसची दहशत निर्माण करत असल्याचा दावा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. एडेनोव्हायरसमुळे नागरिक घाबरले आहेत. तर दुसरीकडे काही डॉक्टरांचा धंदा तेजीत सुरू झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

काय आहेत एडेनोव्हायरसची लक्षणे : एडेनोव्हायरस हा संसर्गजन्य आजार आहे. त्याचा संसर्ग देशभरात झपाट्याने पसरत आहे. फ्लू सारखी सर्दी, ताप, श्वसनाचा त्रास, घसा खवखवणे, त्यातून न्यूमोनिया ही एडेनोव्हायरसची सामान्य लक्षणे आहेत. दोन वर्षे आणि त्यापेक्षा कमी वय असलेल्या मुलांना या विषाणूचा सर्वाधिक फटका बसतो. एडेनोव्हायरसचा हा विषाणू त्वचेपासून त्वचेच्या संपर्काद्वारे, खोकताना आणि शिंकण्याद्वारे आणि संक्रमित व्यक्तीच्या विष्ठेद्वारेही पसरू शकतो. आत्तापर्यंत या व्हायरसवर उपचार करण्यासाठी कोणतेही मान्यताप्राप्त औषध उपलब्ध नाहीत. किंवा कोणतेही विशिष्ट उपचार नसल्याचेही आरोग्य विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे

आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द : आरोग्य विभागाने डॉक्टरांसह बालरोगतज्ञांना फ्लूसारखी लक्षणे असलेल्या मुलांचीविशेष काळजी घेण्यासाठी अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. संसर्गाची धोकादायक स्थिती असल्याने आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्या अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आल्या आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये विशेष बालरोग युनिटसह विशेष बाह्य युनिट्स उघडण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

हेही वाचा - H3N2 Virus : भारतात H3N2 व्हायरसचा शिरकाव; जाणून घ्या, उपचार आणि मार्गदर्शक सूचना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.