ETV Bharat / sukhibhava

Poor Sleep Can Affect Your Work : खराब झोपेचा कामावर होतो वाईट परिणाम; जाणून घ्या चांगले काम करण्याचे मार्ग - खराब झोप

अगोदरच्या रात्री चांगली झोप झाली नसल्यास त्याचा कार्यालयीन कामावर विपरित परिणाम होत असल्याचा दावा डब्लिन येथील ट्रिनिटी महाविद्यालयातील संशोधकांनी केला आहे.

Poor Sleep Can Affect Your Work
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 3, 2023, 12:07 PM IST

डब्लिन : रात्रीची खराब झोप तुमच्या कार्यालयीन कामावर विपरित परिणाम करते. त्यामुळे रात्रीची झोप न झाल्यास दिवसभर आपल्याला अस्वस्थ वाटते. कामावर लक्ष लागत नाही. इतकेच काय दिवसही लवकर जात नाही. चांगली झोप शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाची असल्याचे संशोधक स्पष्ट करतात. चांगली झोप न झाल्यास कार्यालयात कामावर लक्ष कसे केंद्रीत करायचे याबाबतची ही खास माहिती आम्ही तुमच्यासाठी देत आहोत.

सहकाऱ्यांवर अपमानास्पद टीका : रात्रीच्या खराब झोपेचा कामाच्या दुसऱ्या दिवशी कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होतो. आपण कोणत्याही नकारात्मक प्रभावांना तोंड देऊ शकतो. संशोधनाने चांगले काम करण्यासाठी झोप महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले आहे. एखाद्या कर्मचाऱ्याची झोप व्यवस्थित झाली नसल्यास त्याचे कार्यालयातील वर्तन चांगले होत नाही. झोपेच्या कमतरतेमुळे कर्मचार्‍यांना उशीर होण्याची शक्यता असते. कर्मचारी अनैतिक वर्तनात गुंतण्याचीही शक्यता असते. यात एखाद्याच्या कामाचे श्रेय घेणे, आदी वर्तनाचाही समावेश असतो. व्यवस्थापकांची झोप न झाल्यास ते त्यांच्या कर्मचार्‍यांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचेही डब्लिन येथील ट्रिनिटी महाविद्यालयातील असोसिएट प्राध्यापक व्लादिस्लाव रिवकीन यांनी आपल्या संशोधनातून स्पष्ट केले आहे.

झोपेचा इच्छाशक्तीवर होतो परिणाम : झोप ही संज्ञानात्मक कौशल्यांसाठी विशेषतः महत्वाची आहे. झोपेमुळे आपल्याला विचारांसह वर्तन नियंत्रित करण्यास मदत होते. आपण जे काही काम करतो, त्यासाठी इच्छाशक्ती आवश्यक असते. आपल्या आवेग आणि भावनांवर इच्छाशक्तीमुळे नियंत्रण ठेवता येते. मात्र झोप चांगील न झाल्यास आपल्या इच्छाशक्तीवर त्याचा वाईट परिणाम होतो.

असे करु शकता चांगले काम : अनेक संशोधनातून चांगल्या झोपेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. झोपण्यापूर्वी स्मार्टफोन वापरणे टाळा, संगणकावर काम करणे टाळा, आदी सूचना या संशोधनातून देण्यात येतात. मात्र तरीही आपल्यापैकी बहुतेकांना तणाव वाटत असल्यास दुसऱ्या दिवशी कामावर चांगले कार्य कसे करू शकतो, असा सवालही निर्माण होतो. त्यामुळे चांगले काम करण्यासाठी या काही टीप्सचा तुम्ही उपयोग करू शकता.

कामाबद्दल धोरणात्मक व्हा : तुम्ही आदल्या रात्री नीट झोपला नसल्यास इच्छाशक्ती आवश्यक असणारी कामे टाळली पाहिजेत. त्याऐवजी सोप्या आणि जास्त लक्ष देण्याची आवश्यकता नसलेल्या कामांवर भर द्या. इच्छाशक्ती आवश्यक असणारी कामे तुम्ही टाळू शकत नसाल, तर अशी कामे दिवसाच्या सुरुवातीला शेड्यूल करा.

आपली मानसिकता बदला : इच्छाशक्तीचा वापर केल्याने आपली मानसिक उर्जा संपुष्टात येत असल्याचे संशोधनातून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे आपण इच्छाशक्ती कमी करू शकतो आणि इच्छाशक्ती वाढवू शकतो. परंतु इच्छाशक्ती मर्यादित मानसिक संसाधनांवर अवलंबून असते. त्यामुळे ती पुनर्प्राप्त केली जाऊ शकत असल्याने आपली मानसिकता बदलून काम करा.

तुम्ही बदलू शकत नसाल तर परिस्थिती बदला : काम करताना काही नागरिक आपल्यात बदल घडवू इच्छित नाहीत. मात्र जर तुम्हाला बदलायचे नसेल, तर तुमची परिस्थिती बदलणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही प्रकृती स्वास्थ्यासाठी डायटवर असाल, तर चॉकलेट खरेदी करू नका. कारण इच्छाशक्ती असतानाही प्रत्यक्षात आवश्यक असलेली परिस्थिती टाळण्याचा काही जण प्रयत्न करतात.

मजेदार व्हिडिओ पहा : सकारात्मक भावना आपली मानसिक ऊर्जा पुनर्संचयित करण्यात मदत करू शकते. नकारात्मक भावनांच्या हानिकारक प्रभावांना तोंड देता येते. दिवसा मजेदार व्हिडिओ पाहिल्याने कामाचे मानसिक परिणाम कमी होऊ शकतात. कर्मचाऱ्यांची परिणामकारकता वाढते. त्यामुळे ज्या दिवशी तुमची झोप चांगली झाली नाही, त्या दिवशी तुमची मानसिक ऊर्जा कमी असते. त्यामुळे मजेदार व्हिडिओ पाहून लक्ष संतुलित करता येते.

हेही वाचा - World Autism Awareness Day 2023 : भारतात दरदिवशी 8 जण होतात ऑटिझमचे शिकार ; जाणून घ्या काय आहेत या आजाराची लक्षणे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.