काही लोकांमध्ये हार्मोनल अॅक्ने पीरियड किंवा गर्भावस्थेत दिसून येते, कारण त्यावेळी तुमच्या शरीरात हार्मोन्स मोठ्या प्रमाणात बनतात किंवा कमी प्रमाणात बनतात. हार्मोनल अॅक्नेवर कायमस्वरुपी उपाय आहे का? किंवा या समस्येला उपचारच नाही? याविषयी 'ईटीव्ही भारत'ने लव अर्थ, हर्बल अँड ऑरगॅनिक स्किन केअर ब्रांडच्या संस्थापक परिधी गोयल यांच्याकडून माहिती घेतली. परिधी सांगतात की, जरी हार्मोनल अॅक्नेवर कायमस्वरुपी उपचार नसला तरी तुम्ही एका स्किन केअर दिनचर्येने आपले मुरुम किंवा अॅक्ने कमी करू शकता.
- आपल्या चेहऱ्याला दिवसातून अनेकवेळा धुवा कारण चेहऱ्याच्या त्वचेवर जेव्हा धूळ आणि मातीचा थर स्थिरावतो तेव्हा हार्मोनल अॅक्नेला प्रोत्साहन मिळते. तुमच्या त्वचेचा पृष्ठभाग स्वच्छ राहील तेव्हा अॅक्ने कमी होऊ शकतो. अतिशय सौम्य फेसवॉशने आपल्या चेहऱ्याला दिवसातून कमीत कमी 2 ते 3 वेळा धुवा. जेव्हा चेहरा स्वच्छ असतो तेव्हा धुळ आणि मातीमुळे चेहऱ्यावरील छिद्र बुजत नाही आणि अॅक्नेची समस्या देखील कमी होते.
- स्वत:ला नेहमी हायड्रेटेड ठेवा म्हणजेच खूप पाणी प्या, जेणेकरून तुमच्या त्वचेतील ओलावा कायम राहील. आपल्या पेय पदार्थांच्या यादीत ग्रीन टी ला नक्की स्थान द्या. कारण, ग्रीन टी तुमच्या शरीराला आतून डिटॉक्स करते, ज्यामुळे हार्मोनल मुरुमे म्हणजेच अॅक्ने कमी होते. तुम्ही ग्रीन टी ला मॅजिक पोशन देखील म्हणून शकता.
- मुल्तानी मातीचा फेस पॅकही तुमची मुरुमे कमी करू शकतो. कारण ती तुमच्या त्वचेला थंड करते. ती तुम्हाला कुठल्याही दुकानात सहज मिळेल. गुलाब जलसोबत मुल्तानी मातीचा फेस पॅक बनवून आपल्या चेहऱ्यावर लावा. हा पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावू शकता.
- नेहमी एका चांगल्या ब्रांडच्या मॉइश्चरायझरचा वापर करा, परंतु कमी प्रमाणात, कारण तुमची त्वचा आधीच तेलकट असते, जी मुरुम होण्याचे कारण होऊ शकते. नेहमी जेल आधारित मॉइश्चरायझर वापरा.
- विटामिन ए मधून निघालेले रेटिनॉल किंवा रेटिनॉइडचा वापर करा. हे त्वचेसाठी खूप फायदेशीर समजले जाते. हे त्वचेतून मृत पेशींना बाहेर काढते, जे मुरुमाचे कारण असते, त्याचबरोबर त्वचेत नवीन पेशींना प्रोत्साहन देते. रेटिनॉल किंवा रेटिनॉइड तोंडाच्या छिद्रांना स्वच्छ करतात. जर तुम्ही त्वचेसाठी कुठली स्किन क्रिम वापरत असाल तर ते औषध आत शिरण्यास मदत करते.
- टी ट्री ऑइल त्वचेसाठी एक योग्य पर्याय आहे, जे सर्व प्रकारचे मुरुम काढून टाकण्यास मदत करते. हे त्वचेत होणारी जळजळ दूर करते, ज्यामुळे मुरुम होतात. टी ट्री ऑइलचे थेंब घ्या आणि मुरुमावर लावा, मात्र ज्या बोटाने तुम्ही एका मुरुमावर तेल लावले, त्याच बोटाने दुसऱ्या मुरुमावर तेल लावू नका. एका थेंबापेक्षा जास्त तेलाचा वापर करू नये, कारण ते त्वचेला कोरडे करते, त्यामुळे ते कमी लावावे, मात्र रोज लावावे.
- गर्भावस्थेत आपल्या स्त्रिरोग तज्ज्ञाशी बोला आणि हार्मोनल असंतुलनाच्या समस्येवर उपचार जाणून घ्या आणि त्यांनी सुचवलेल्या क्रिमचाच वापर करा. जेव्हा तुम्हाला तुमच्या हार्मोनल असंतुलनाचे कारण कळेल तेव्हा त्यानुसार तुम्ही उपचार सुरू करा.
- जेव्हाही तुम्ही उन्हात बाहेर निघाल तेव्हा सनस्क्रिन वापरा. आपल्या त्वचेला मुरुमांपासून दूर ठेवण्यासाठी एक चांगला सनस्क्रिनचा वापर अवश्य करा.
- तुमच्या त्वचेच्या छिद्रांना बंद करणाऱ्या मेकअप प्रोडक्ट्सचा वापर करू नका, शक्य तितके अशा उत्पादनांचा वापर टाळा, कारण ते मुरुम होण्याचे कारण होते.
- हार्मोनल मुरुमांपासून पूर्णपणे सुटका मिळू शकत नाही, मात्र त्यांना योग्य प्रोडक्ट्स आणि घरगुती उपचारांनी कमी करता येऊ शकते.
हेही वाचा - ऑफिसमध्ये बसून बसून डोळे, खांदे दुखत आहेत? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' व्यायाम