हैदराबाद : अपचन, आंबट ढेकर येणं, अन्न खाल्ल्यानंतर उलट्या होणं यासारख्या समस्यांनी तुम्हाला त्रास होत असेल, तर ही सर्व अॅसिडिटीची लक्षणं असू शकतात. घरी राहून काही घरगुती उपाय करून या समस्या सहज दूर केल्या जाऊ शकतात.
अॅसिडिटी दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय-
- बडीशेप पाणी : जर तुम्हाला दीर्घकाळ अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर बडीशेपचं पाणी प्या. बडीशेपचं पाणी प्यायल्यानं अॅसिडिटीची समस्या कमी होते. हे पाणी तयार करण्यासाठी 1 ग्लास पाण्यात 1 चमचा बडीशेप घाला. सुमारे 30 मिनिटांनंतर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. पाणी थंड झाल्यावर ते प्या.
- पुदीनाची पाने : अॅसिडिटी, गॅस, अपचन यांसारख्या तक्रारींवर पुदिन्याची पाने रामबाण उपाय मानली जातात. अॅसिडिटीचा त्रास होत असल्यास पुदिन्याची पाने चावून खा.
- ताक प्या : ताकामध्ये लॅक्टिक अॅसिड असतं, ज्यामुळं पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. ताक प्यायल्यानं पोटाची उष्णता शांत होते. अॅसिडिटी दूर करण्यासाठी काळी मिरी आणि कोथिंबीर ताकासोबत प्यायल्यानं खूप आराम मिळतो.
- केळी खा : केळी खाल्ल्यानं केवळ अॅसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळत नाही तर पोटात जळजळ होण्यापासूनही आराम मिळतो. खूप दिवसांपासून अॅसिडिटी होत असल्यास केळीचं सेवन थंड दुधासोबत करा.
- पपई : पपई गॅस्ट्रिक अॅसिड स्राव कमी करते आणि अॅसिडिटीपासून आराम मिळवून देण्यासाठी प्रभावी आहे. पपईमध्ये पपेन हे एन्झाइम असते, जे दीर्घकाळापर्यंत अॅसिडिटीची समस्या कमी करू शकते.
- ओवा खा : ओवाचं सेवन केल्यानं अॅसिडीटी आणि पोटफुगीच्या समस्येपासून आराम मिळतो. अॅसिड-विरोधी एजंट असण्याबरोबरच पचनासाठी देखील ओवा चांगला मानला जातो.
- थंड दूध प्या : अॅसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी रोज एक ग्लास थंड दूध प्या. या उपायाचा अवलंब करून तुम्हाला अॅसिडिटीपासून त्वरित आराम मिळू शकतो.
हेही वाचा :