कोविड 19 मधून बरे झाल्यानंतर मोठ्या प्रामाणात लोकांमध्ये केस गळण्याचा समस्या दिसून येत आहेत. तज्ज्ञ आणि डॉक्टर यांच्या मते, उपाचारादरम्यान घेतल्या जाणाऱ्या औषधींचे पार्श्व परिणाम आणि संसर्गादरम्यान शरीरात आलेली कमजोरी आणि समस्यांमुळे शरीरात पोषणाची कमी व्हायला लागते. केस गळणे हा याचा परिणाम आहे.
कोविडच्या रिकवरीच्या कालावधीत आहाराच्या मदतीने कसे केसांच्या गळतीला काही प्रमाणात कमी करत येईल, या विषयी 'ईटीव्ही भारत सुखीभव'च्या टीमने इंदौरच्या आहार व पोषण तज्ज्ञ डॉ. संगीता मालू यांच्यापासून माहिती घेतली.
प्रथिने आणि इतर पोषक घटकांचा ऱ्हास
डॉ. संगीता सांगतात की, संसर्गादरम्यान होणाऱ्या तीव्र तापाने शरीराच्या चयापचयावर परिणाम होतो आणि प्रथिनेसह विविध आवश्यक पोषक तत्वांचा ऱ्हास होते. या अवस्थेत अनेक लोकांमध्ये जेवण करण्याची इच्छा राहात नाही किंवा ती नसल्याच्या बरोबर असते.
जर एखाद्या व्यक्तीचे केस आवश्यक्तेपेक्षा अधिक गळत आहे तर, त्याचा अर्थ त्याच्या शरीरात प्रथिने (protein) आणि जस्त यांची कमी आहे. अशा अवस्थेत पीडितने हाई प्रोटीन डाइट घेणे गरजेचे आहे, असा सल्ला डॉ. संगीता यांनी दिला.
शाकाहाराला प्राधान्य द्या
अशा अवस्थेत डॉ. संगीता लोकांना शाकाहाराला प्राधान्य देण्याचा सल्ला देतात. कारण, यात केवळ एका आहारापासून मिळणाऱ्या प्रथिन्यावर अवलंबून राहावे लागत नाही. असे मानले जाते की, मिश्रित धान्य आणि डाळींपासून मिळाणाऱ्या प्रथिन्यांचे फायदे दुप्पट असतात. त्याचबरोबर, ते मांसाहार प्रमाणे पचायला कठीण देखील जात नाही.
डॉ. संगीता सांगतात की, डाळी, तृणधान्ये आणि भाज्यांच्या मिश्रित आहारात प्रथिन्याची गुणवत्ता आणि त्याची मात्रा दोन्हीही खूप अधिक असते. डाळी आणि तृणधान्याच्या मिश्रित आहारालाच बायोलॉजिकल हाई प्रोटीन डाईटमध्ये गणल्या जाते, जसे खिचडी, इडली, उत्तपम, पुरणपोळी इत्यादी. त्याचबरोबर, दूध आणि अन्य डेअरी उत्पादनांचा देखील नियमित आहारात समावेश केला पाहिजे.
जस्तासाठी हिरव्या पालेभाज्या आणि सुका मेव्याचे सेवन केले पाहिजे
डॉ. संगीता सांगतात की, केवळ प्रथिनेच नव्हे तर, केसांच्या आरेग्यासाठी झिंक देखील खूप महत्वाचे आहे. कोरोनाच्या रिकवरी कालावधीत पीडित जर वैद्यकीय सल्ल्यानुसार हिरव्या पालेभाज्यांच्या ज्यूसचा अधिक सेवन केल्यास शरीराला त्याचे पोषण शिजवलेल्या हिरव्या पालेभाज्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात आणि चांगल्या प्रकारे मिळेत. कारण, हिरव्या भाज्यांना शिजवले किंवा उकळले की त्यांचे अर्ध्याहून अधिक पोषण नष्ट होते. त्याचबरोबर, मशरूम जस्ताच्या प्रमुख स्रोतांपैकी एक आहे, त्यामुळे त्याचा ज्यूसच्या रुपात, सलादच्या रुपात, उकळून किंवा अन्य पद्धतीने आपल्या आहारात समावेश केला पाहिजे.
या व्यतिरिक्त सलादमध्ये लेट्यूस, बीटरूट, स्प्राउट्स, फळांच्या स्मूदीचे सेवन खूप फायदेशीर असते. सर्वात महत्वाचे म्हणजे, पीडितने प्रतिदिवस कमीत कमी 10 ते 12 ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. जर, व्यक्ती कमी प्रमाणात पाणी पित असेल तर, त्याच्या शरीराच्या टॉक्सिनना शरीरातून बाहेर पडता येत नाही.
केवळ खाऊ नका, तर डोक्यावरही लावा
डॉ. संगीता मालू सांगतात की, केवळ आहारात प्रथिन्यांचे प्रमाण वाढल्यानेच नव्हे तर, केसांना कढीपत्ता (गोड निंब), कडूनिंब आणि कांद्याचा ज्यूस किंवा पेस्ट लावल्याने देखील केस गळतीच्या समस्येपासून आराम मिळू शकते. इतकेच नव्हे तर, केसांना हिरव्या पालेभाज्यांचा पेस्ट बनवून त्याचा लेप लावल्याने देखील केस तुटण्याच्या समस्येपासून आराम मिळू शकते, कारण ते केसांच्या मुळांना पोषण देते, त्याचबरोबर डोक्याच्या त्वचेच्या रोम छिद्रांची देखील सफाई करते. त्याचबरोबर, केसांना वाफ दिल्यानेही या समस्येपासून आराम मिळू शकते.
वैद्यकीय सल्ला घेतल्याशिवाय सप्लिमेंट्स घेऊ नये
डॉ. संगीता मालू सांगतात की, वैद्यकीय सल्ला घेतल्याशिवाय प्रथिने, विटामिन डी 3, बी 12 किंवा अन्य प्रकारचे सप्लिमेंट घेऊ नये. विशेषकरून कोरोना नंतर जर व्यक्ती हाई प्रोटीन किंवा विटामिन डी ची आवश्यक्ता नसतानाही त्याचे डोस घेत असेल तर, याने त्याच्या शरीराला फायदा मिळण्याऐवजी अनेक इतर समस्यांचा जन्म होऊ शकतो, विशेषत: असे लोक जे कोणत्याही प्रकारची कोमॉरबिटी किंवा किडनीत समस्येसारख्या समस्येपासून ग्रस्त आहेत.
डॉक्टर कोणत्याही व्यक्तीची संपूर्ण तपासणी केल्यानंतर तिच्या अहवालाच्या आधारावरच तिला विशिष्ठ सप्लिमेंट घेण्याचा सल्ला देतात, अशी माहिती देखील डॉ. संगीता मालू यांनी दिली.
या विषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी dr.sangeetamalu@gmail.com आणि smart6sangeeta@yahoo.co.in वर संपर्क करता येईल.
हेही वाचा - पाळीव प्राणी पाळण्याचा विचार आहे? त्याआधी 'या' बाबी नक्की वाचा..