ETV Bharat / sukhibhava

Coffee with Milk : दुधासोबत कॉफी घेणे आरोग्यासाठी फायदेशीर, वाचा सविस्तर - दुध आरोग्यासाठी फायदेशीर

डॅनिश शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात असे समोर आले आहे की, जे दुधासोबत कॉफी पितात त्यांना आरोग्यासाठी फायदे मिळतात. प्रयोगांनी दर्शविले आहे की, त्यांचा दाहक-विरोधी प्रभाव आहे. त्यांनी स्पष्ट केले की, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्सचे संयोजन रोगप्रतिकारक पेशींचे दाहक-विरोधी गुणधर्म दुप्पट करते.

Coffee with Milk
दुधासोबत कॉफी घेणे आरोग्यासाठी फायदेशीर
author img

By

Published : Feb 1, 2023, 4:27 PM IST

लंडन : कॉफी पिणे आरग्यासाठी चांगले का वाईट यावर अनेकदा बोलले जाते. पण, तुम्हाला कॉफी आवडत असेल तर तुम्ही कॉफी दुधासोबत प्यायला काहीच हरकत नाही. नव्या संशोधनानुसार दुधासोबत कॉफी पिणे आरोग्यासाठी चांगले असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोपनहेगन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. जेव्हा जीवाणू आणि विषाणू शरीरात प्रवेश करतात तेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती प्रतिक्रिया देते. पांढऱ्या रक्त पेशी आणि इतर रसायने आपल्या शरीराचे संरक्षण करते.

'हेल्दी कॉफी' प्यावी : पॉलिफेनॉल मांस उत्पादने आणि दुधात प्रथिने असल्याचे आधीच आढळले आहे. दुधासह कॉफीमध्ये हे दोन घटक काम करतात की नाही याची अलीकडेच तपासणी करण्यात आली. कॉफी बीन्समध्ये पॉलिफेनॉल भरपूर असते आणि दुधात प्रथिने भरपूर असतात. या प्रकारच्या कॉफीमध्ये पॉलिफेनॉल आणि प्रथिने यांचा परस्परसंवाद असल्याचे समोर आले आहे, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. कॉफी पिणाऱ्यांनी 'हेल्दी कॉफी' प्यावी, असेही हे अभ्यासक सांगतात. गरोदरपणात जास्त कॉफी पिणे आरोग्यासाठी अपायकारक असल्याचे संशोधकांनी सांगितले.

पॉलिफेनॉलचा दाहक-विरोधी प्रभाव : कॉफी पिणाऱ्याचे वय, ध्रूमपानाची सवय, नियमित व्यायाम हे मुद्देही लक्षात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मानव, वनस्पती, फळे आणि भाज्यांमध्ये पॉलीफेनॉल नावाचे अँटिऑक्सिडंट असतात. ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करते. शास्त्रज्ञांनी अलीकडेच प्रथिनांचे मुख्य घटक असलेल्या अमीनो ॲसिडसह एकत्रित केल्यावर हे पॉलिफेनॉल कसे कार्य करतात याचे परीक्षण केले. अमिनो ॲसिडसह प्रतिक्रिया दिल्यावर पॉलिफेनॉलचा दाहक-विरोधी प्रभाव वाढल्याचे दिसून आले आहे. अशा प्रकारे या मिश्रणाचा मानवांमध्ये जळजळ होण्यावर सकारात्मक प्रभाव असल्याचे दिसून आले आहे.

दुध आरोग्यासाठी फायदेशीर : दुध हे संपूर्ण आहाराच्या श्रेणीत आहे. त्यामध्ये पाणी, प्रथिने, कार्बोहायड्रेट, लिपिड फॅट, साखर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, जस्त, तांबे, सेलेनियम, रिबोफ्लेविन, नियासिन, पॅन्टोथेनिक अ‍ॅसिड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी-6, बी-12, व्हिटॅमिनमध्ये ई, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन के, बीटा केराटिन, आयोडीन, रेटिनॉल आणि कोलीन आणि फॅट इत्यादींसह अनेक खनिज आढळून येतात.

डॉक्टर काय म्हणतात : दिल्लीतील आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ञ डॉ. दिव्या शर्मा सांगतात की, कॉफी हे मूळ नैसर्गिक रूप आहे, त्यामुळे त्यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म तुलनेने जास्त प्रमाणात आढळतात. त्या सांगतात की, बाजारात मिळणारी कॉमन कॉफी तयार करण्यासाठी आधी कॉफीचे दाणे चांगले भाजले जातात. याशिवाय कॉफी तयार करण्यासाठी इतर काही प्रक्रियांचा अवलंब केला जातो. त्यामुळे कॉफीच्या बियांमध्ये आढळणारे नैसर्गिक घटक तुलनेने कमी किंवा पूर्णपणे नष्ट होतात. कॉफीच्या हिरव्या बियांमध्ये क्लोरोजेनिक ऍसिड आढळते, ज्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आपली त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यास मदत करतात. सौंदर्य वाढवण्यापासून आरोग्य निरोगी ठेवण्यापर्यंत आणि अनेक प्रकारच्या रोगांपासून संरक्षण करतात. याशिवाय त्यात असे गुणधर्म आणि घटक आढळतात जे मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब यांसारख्या समस्यांपासून बचाव करण्यास मदत करतात. याशिवाय, क्लोरोजेनिक ॲसिड देखील आपले चयापचय आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर आहे.

हेही वाचा : अमेरिकन झोपेच्या विकाराने ग्रस्त, शारीरिकसह मानसिक आरोग्य राखण्यासाठी उच्च-गुणवत्तेची झोप आवश्यक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.