ETV Bharat / sukhibhava

Good Friday 2023 : सणांच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची वाढली गर्दी, ओयोच्या बुकिंगमध्ये तब्बल 167 टक्के वाढ - समुद्र

सलग सुट्ट्यांमुळे ओयोच्या बुकींगमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यात समुद्र किनाऱ्यावरील हॉटेलचे 57 टक्के तर हिल स्टेशनचे 43 टक्के बुकींग करण्यात आले आहे.

Good Friday 2023
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 7, 2023, 1:47 PM IST

हैदराबाद : सध्या गुड फ्रायडेमुळे सलग सुट्ट्या आल्याने नागरिकांनी पर्यटनाला चांगलेच महत्व दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा फायदा ओयो या हॉटेलच्या व्यवसायाला चांगलाच झाल्याचे दिसून आले. ओयोने सलग सुट्ट्यांमुळे बुकींचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. ओयोच्या बुकिंगमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 167 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती ट्रॅव्हल टेक फर्मने दिली आहे. समुद्र किनाऱ्यांवरील ठिकाणांची मागणी 57 टक्क्यांनी वाढली आहे. तर हिल स्टेशन्सची मागणी 43 टक्क्यांनी वाढल्याचा दावाही या कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे.

तीर्थक्षेत्रांना आहे जास्त मागणी : सलग सुट्ट्यांमुळे अनेक ठिकाणचे समुद्र किनारे फुल्ल झाले आहेत. त्यासह हिल स्टेशनचे बुकींगही फुल्ल झाले आहेत. मात्र त्यासह अध्यात्मिक आणि तीर्थक्षेत्रांनाही नागरिक भेट देत असल्याचे बुकींग ट्रेंडवरुन सिद्ध होत आहे. भारतीय प्रवासी सुट्ट्यांमध्ये लक्झरीपेक्षा आध्यात्मिक ठिकाणांना जास्त प्राधान्य देत असल्याचेही या कंपनीने स्पष्ट केले आहे. वाराणसी, पुरी, शिर्डी, अमृतसर आणि हरिद्वार या तीर्थक्षेत्रांना सर्वोच्च पर्याय म्हणून पाहण्यात आले आहेत. ओयोने तिरुपती, मथुरा, वृंदावन आणि मदुराई हे देखील लाँग वीकेंडसाठी बुकिंग मागणीमध्ये सर्वोच्च पर्याय असल्याचे स्पष्ट केले आहे.

दक्षिण भारताला पर्यटक देतात प्राध्यान्य : ट्रॅव्हल टेक फर्मने प्रदेशनिहाय केलेल्या बुकिंगनुसार दक्षिण भारताला नागरिक सर्वात जास्त प्राध्यान्य देत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर पूर्व, उत्तर आणि पश्चिम क्षेत्रासाठी जास्तीत जास्त बुकिंग करण्यात आले. दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि कोलकाता या शहरांना 7 एप्रिलपासून सुरू होणार्‍या लाँग वीकेंडमध्ये वाढीव मागणी असल्याचे या बुकींग ट्रेंडवरुन स्पष्ट झाले आहे.

ओयोला वाढती मागणी : सलग सुट्ट्यांचा लाभ घेण्यासाठी अनेक पर्यटक भारतातील विविध ठिकाणी भेटी देतात. यातील पर्यटकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचेही ओयोच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे. ओयोला गेल्या वर्षभरात लाँग वीकेंडसाठी प्रवासी मागणीत सातत्याने वाढ होत आहे. गुड फ्रायडे लाँग वीकेंडही त्याला अपवाद नसल्याचेही या प्रवक्त्याने सांगितले.

हेही वाचा - Indians Financial Condition : भारतीयांना खिशाला झळ बसल्याची वाटते चिंता; तब्बल 74 टक्के नागरिकांनी खर्चाला घातला आळा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.