ETV Bharat / sukhibhava

Cashless Claim In Health Insurance : आरोग्य विमा घेताना करा कॅशलेस क्लेम, जाणून घ्या फायदे

author img

By

Published : Jun 19, 2023, 10:09 AM IST

कुटूंबाच्या भविष्यातील कल्याणासाठी विमा घेणे कधीही फायदेशीर असते. मात्र यात विमा कंपनीकडून कॅशलेस विमा घेणे पॉलिसीधारकाला कधीही चांगले असते.

Cashless Claim In Health Insurance
संग्रहित छायाचित्र

हैदराबाद : आपल्या देशात विम्याच्या बाबत खूपच कमी जनजागृती झालेली आहे. योग्य आकलनाच्या अभावामुळे नागरिक विमा पॉलिसी घेण्याकडे फारसा कल दाखवत नाहीत. अनपेक्षित अपघात झाल्यास एखाद्या व्यक्तीला आर्थिक संरक्षण देण्यासाठी विमा कंपनीकडे अनेक धोरणे आहेत. मात्र आरोग्य विमा घेताना कॅशलेस क्लेमसाठी जाणे केव्हाही चांगले. हे कसे वापरावे? त्रास टाळण्यासाठी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. याबाबतची खास माहिती ईटीव्ही भारतच्या वाचकांसाठी आम्ही येथे देत आहोत.

दोन प्रकारचे असतात विमा पॉलिसींमधील दावे : आरोग्य विमा पॉलिसींमधील दावे साधारणपणे दोन प्रकारचे असतात. यात विमा कंपनीने दिलेल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे हा पहिला आणि सोयीचा प्रकार आहे. यामुळे पॉलिसीधारकाला कोणताही खर्च लागत नाही. याला कॅशलेस उपचार म्हणतात. पॉलिसी मूल्यापर्यंतचा खर्च हॉस्पिटल देते. दुसऱ्या पद्धतीमध्ये उपचाराचा खर्च अगोदर भरणे आणि नंतर खर्च वसूल करणे समाविष्ट आहे.

नेटवर्क हॉस्पीटल निवडा : विमा कंपनी आपल्या पॉलिसीधारकाला हॉस्पीटलची यादी देते. या हॉस्पिटलची माहिती तुम्ही तिथे गेल्यावर विमा कंपनीला कळवा. हॉस्पिटलला भेट देताना तुमचे आरोग्य विमा ओळखपत्र किंवा तुमच्या आरोग्य विमा पॉलिसीचे दस्तऐवज सोबत ठेवा. सरकारने जारी केलेले फोटो ओळखपत्र सोबत असणे अनिवार्य आहे. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये विमा पॉलिसींसाठी स्वतंत्र विभाग असतो. ते तुम्हाला तुमच्या दाव्याच्या प्रक्रियेत पूर्णपणे मदत करतील. काही रुग्णालयांमध्ये विमा कंपनी किंवा थर्ड पार्टी अॅडमिनिस्ट्रेटर (TPA) चे प्रतिनिधी देखील असतात. आजारपणात विमा कंपनीकडून लाभ हवा असल्यास कंपनीकडे आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. अर्जावर स्वाक्षरी करून वैद्यकीय अहवालांसह विमा कंपनीकडे पाठवावे लागेल. सर्व तपशील तपासल्यानंतर, विमा कंपनी प्राथमिक मान्यता पाठवेल. रुग्णालयात उपचार सुरू असताना विमा कंपनी टप्प्याटप्प्याने मंजुरी पाठवते. उपचार पूर्ण झाल्यावर रुग्णालय एकूण खर्च देते.

कॅशलेस सोल्यूशन फक्त नेटवर्क हॉस्पिटलमध्ये : काहीवेळा विमा पॉलिसीसह पॉलिसीधारकांना स्वतःहून काही रक्कम भरावी लागते. कॅशलेस उपचाराचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवावेत. कॅशलेस सोल्यूशन फक्त नेटवर्क हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असते. पॉलिसीमध्ये किती खोलीचे भाडे आणि इतर उपचार समाविष्ट आहेत ते तपासून घ्यावे. विमा पॉलिसीमध्ये खोलीच्या भाड्याच्या इतक्या टक्केवारीची तरतूद असते. पॉलिसीनुसार खोलीचे भाडे दिले जाते त्याच खोलीत राहण्याचा प्रयत्न करा. जर ते जास्त असेल तर ते आपल्याला खिशातून भरावे लागेल. खोलीच्या भाड्यातील फरक भरला तरीही, खोलीच्या भाड्याशी संबंधित अतिरिक्त खर्च होतात, हेही लक्षात घ्या. विमा पॉलिसीशी संलग्न रायडर्स आणि टॉप-अप पॉलिसींबद्दल हॉस्पिटलला माहिती द्या. विमा कंपनीला विचारा आणि स्पष्ट माहिती मिळवा. तुमचे बिल मूलभूत पॉलिसीपेक्षा जास्त असल्यास, टॉप अप उपयुक्त ठरु शकतो.

हेही वाचा -

  1. Health Policy : तुमच्या आरोग्य पॉलिसीमध्ये सर्व वैद्यकीय खर्च असावे समाविष्ट
  2. Child Insurance Policies : मुलांच्या भविष्यातील शैक्षणिक, आर्थिक गरजांकरिता विमा काढताय? जाणून घ्या प्रक्रियेसह फायदे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.