पहिल्या पीरियडवेळी मुलींना बऱ्याच समस्यांचा आणि गैरसोयींचा सामना करावा लागतो. हे तोपर्यंत चालते जोपर्यंत त्यांना या शारीरिक बदलाची सवय होत नाही. काही मुलींना मेनोरेजिआचा (Menorrhagia) सामना करावा लागतो. यात अधिक काळ रक्तस्त्राव होतो, जो 7 दिवसांपेक्षा अधिक काळ चालतो, मळमळ (nausea), हलके डोके दुखणे (light headedness), पोट दुखी आणि डोकेदुखी होते. यामुळे पीरियडविषयी अनेक गैरसमज निर्माण होतात ज्याचे रुपांतर नंतर भीतीमध्ये होऊ शकते.
मुलीच्या आयुष्यातील या महत्वाच्या काळात पालकांची भूमिका खूप महत्वाची असते. त्यांनी आपल्या मुलीला फक्त पीरियड, शरीरातील बदल याबद्दलच नव्हे, तर पोषण, स्वच्छता आणि व्यायाम याबद्दल देखील सल्ला द्यायला हवा. मासिक पाळी आणि पोषण याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही भारत सुखीभवने' पोषणतज्ञ दिव्या काळसेकर यांच्याशी बातचीत केली. यावेळी त्यांनी काही महत्वाच्या मार्गदर्शक सूचना आमच्याशी शेअर केल्या.
आहार पौष्टिक आणि पचण्याजोगा असावा
जीवनशैलीतील समस्या आणि जंक फूडमुळे आज अनेक मुलींना पीसीओएस ची समस्या आहे. मुलींना हलके आणि सहज पचण्याजोगे जेवण द्यावे, असा सल्ला दिव्या काळसेकर यांनी दिला. काळसेकर पुढे म्हणाल्या की, आहारामध्ये भरपूर प्रथिने (protein), लोह (iron) आणि कॅल्शियम असावे. त्यात फॅट नसावे आणि जंक फूड नसावे. मुलींना फक्त शारीरिक बदलांचा अनुभवच नव्हे तर मानसिक बदलांचा देखील अनुभव होतो. जसे, स्तन आणि चेहरा, शरीर आणि जघनस्थानीय केसांची (pubic hair) सवय होणे. त्वचा तेलकट होते आणि पिंपल्स होतात. हे सर्व बदल आपण योग्य पोषणाने संतुलित करणे गरजेचे आहे. योग्य आहार हा मुलीला केवळ तिच्या शारीरिक बदलांशी जुळवून घेण्यातच मदत करणार नाही, तर तिला सकारात्मक दृष्टिकोन देखील देईल.
आहार काय असावा?
आहारात जंक फूड किंवा कार्बोनेटेड पेय नसावे. जरी मुली या पदार्थांना स्ट्रेस फूड समजत असल्या तरी या पदार्थांच्या सेवनाने केवळ वजनच वाढते असे नाही, तर लठ्ठपणा (child obesity) देखील होऊ शकतो. म्हणून मुलींना तिच्या आहारात भरपूर रंगीत भाज्यांचे सेवन करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. हिरव्या पालेभाज्या जसे पालक, मेथी, डाळी, तृणधान्य आणि संपूर्ण धाण्य. हे पदार्थ जीवनसत्त्वे (vitamin) आणि खनिज्यांबरोबरच (minerals) फोलिक अॅसिड देते ज्याला मासिक पाळी आलेल्या मुलींसाठी महत्वाचे मानले जाते.
साधारणपणे महिला आणि मुलींना लोहच्या (iron) कमतरतेचा सामना करावा लागतो. त्यामुळे, त्यांनी लोहयुक्त अन्न खावे, अशी शिफारस दिव्या यांनी केली. तसेच, शरीरातील लोहची कमतरता भरून काढण्यासाठी डाळिंब, गाजर आणि बीटरूटचे सेवन केले जाऊ शकते. त्याचबरोबर, द्राक्षांचा ज्यूस, गाजर आणि बीटरूटच्या ज्यूसचा देखील आहारात समावेश केला जाऊ शकतो, असा सल्ला दिव्या काळसेकर यांनी दिला.
दिव्या यांनी पुढे सांगितले की, जर मुलगी निरोगी असेल तर तिला पीरियडच्या अनेक समस्या होणार नाही, ज्या अस्वास्थ्य आहार पद्धतीमुळे आजकाल रूढ झाल्या आहेत. त्याचबरोबर, मुलीला सामान्य पीरियड रक्तस्त्राव होईल आणि तिला डोकेदुखी, पोटदुखी आणि तीव्र पोटदुखी होणार नाही.
आहारात काय समाविष्ट करू नये?
दिव्या यांनी सांगितले की, कधीकधी डाळींसारखे नियमित अन्न पदार्थ देखील काही विशिष्ट परिस्थितीमध्ये आरोग्य समस्या उद्भवू शकतात. जसे, पीरियडदरम्यान मुलींची पाचन प्रणाली कमकुवत असते. त्यामुळे, जेव्हा मुलीला पहिल्यांदा पीरियड येतात तेव्हा तिला पोषक, मात्र सहज पचेल असे अन्न दिले पाहिजे. सामान्यत: पीरियड दरम्यान देखील अशीच व्यवस्था राखली पाहिजे. अन्न पदार्थ जसे डाळी आणि संपूर्ण धान्य (whole grains) हे पीरियडदरम्यान जड जाऊ शकतात, त्यामुळे मुलींमध्ये पचन समस्या निर्माण होऊ शकते.
राजमा (Kidney bean), हॉर्स ग्राम, उरद डाळ आणि कोअर्स ग्रेनचे सेवन करणे टाळले पाहिजे. मसालेदार, पॅक केलेले अन्न, प्रक्रिया केलेले अन्न, चिप्स, फास्ट फूड, चहा आणि कॉफी टाळले पाहिजे. हे अन्न पदार्थ पचनासाठी योग्य नाही. पीरियडमधील वेदनांवर देखील ते प्रभाव टाकू शकतात आणि मुलींमध्ये झोप न येण्याची समस्या देखील निर्माण करू शकतात, अशी माहिती पोषणतज्ञ दिव्या काळसेकर यांनी दिली.
हेही वाचा - स्तनपान करणं अवघड जातं? 'ही' उत्पादनं ठरू शकतात फायदेशीर