ETV Bharat / sukhibhava

Ginger Water Benefits : सर्वच समस्येवर रामबाण उपाय आहे आल्याचं पाणी; जाणून घ्या फायदे - Ginger

Ginger Water Benefits : आल्याचा वापर आयुर्वेद आणि होमिओपॅथीमध्येही दीर्घकाळापासून केला जात आहे. आल्याचं पाणी तुम्हाला खूप मदत करू शकतं. जाणून घ्या काय आहेत आल्याचे फायदे.

Ginger Water Benefits
आल्याचं पाणी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2023, 2:55 PM IST

हैदराबाद : Ginger Water Benefits आले हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा अतिशय लोकप्रिय मसाला आहे. जेवणाची चव वाढवणाऱ्या आल्यामध्ये असलेले अनेक पोषक घटक निरोगी त्वचा आणि केसांना फायदेशीर ठरतात. जाणून घेऊया रोज सकाळी आल्याचं पाणी पिण्याचे फायदे...

त्वचेसाठी फायदेशीर : जर तुम्ही अनेकदा त्वचेशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर आल्याचं पाणी तुम्हाला खूप मदत करू शकते. त्यात भरपूर अँटिऑक्सिडंट जिंजरोल्स असतात, जे मुक्त रॅडिकल्सशी लढतं, तुम्हाला गोरी आणि चमकणारी त्वचा देतं. हे वृद्धत्वाची लक्षणंदेखील कमी करतं. तसेच, यामध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म सर्व प्रकारच्या संसर्गाशी लढतात, ज्यामुळं तुमची त्वचा निरोगी आणि स्वच्छ होते.

कोलेस्टेरॉलची पातळी कमी करा : आजकाल अनेक लोक कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याच्या समस्येनं त्रस्त आहेत. शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यानं अनेक गंभीर आजार होऊ शकतात. अशा परिस्थितीत आल्याचं पाणी हाच उपाय आहे. जे लोक दररोज अदरक पाणी पितात त्यांच्यामध्ये ट्रायग्लिसराइड्स आणि एलडीएल, खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.

पचनाच्या समस्या दूर करा : जर तुम्हाला पचनाच्या समस्यांमुळे अनेकदा त्रास होत असेल, तर आल्याचं पाणी फायदेशीर आहे. दिवसातून दोनदा आल्याचं पाणी प्यायल्यानं अपचन आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. याशिवाय अ‍ॅसिड रिफ्लक्स, मळमळ किंवा पोटात जास्त गॅसची समस्या दूर करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे. एका अभ्यासानुसार आल्याचं पाणी उलट्या आणि मळमळ यापासून खूप आराम देतं.

पीरियड क्रॅम्पपासून आराम मिळतो : आजकाल अनेक महिला पीएमएस (प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम) मुळं होणाऱ्या समस्यांमुळं त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत आल्याचं पाणी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतं. खरं तर पीरियड वेदना आणि पेटके कमी करण्यासाठी आलं ओटीसी पेनकिलर इतकेच प्रभावी आहे.

  • वजन कमी करण्यास उपयुक्त : तुम्हीही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर आल्याचं पाणी पिऊ शकता. आल्याचं पाणी नियमितपणे प्यायल्यानं तुम्हाला बराच काळ पोट भरल्यासारखं वाटतं, ज्यामुळे तुम्ही जास्त खाणं टाळता.

हेही वाचा :

  1. Benefits of Roasted chana : फुटाणे आहेत अनेक समस्येवर रामबाण उपाय; जाणून घ्या फायदे
  2. Benefits Of Makhana : मखाना खाण्याचे आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या
  3. Benefits Of Potatoes : बटाटे आहेत आरोग्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या फायदे..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.