हैदराबाद : एका फूड ऑर्डरिंग आणि डिलिव्हरी कंपनीनं आपला वार्षिक ट्रेंड रिपोर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये भारतात किती लोकांनी काय ऑर्डर केले याचा डेटा आहे. ही कंपनी गेल्या आठ वर्षांपासून हा अहवाल प्रसिद्ध करत आहे, ज्याद्वारे वर्षभरात लोकांनी काय ऑर्डर केले हे कळते. आपण जवळपास सर्वच प्रसंगी खाद्यपदार्थ ऑर्डर करतो, पण एक खास डिश आहे ज्याची वेगळीच क्रेझ भारतात पाहायला मिळते. कोणती डिश सर्वात जास्त ऑर्डर केली गेली आहे ते जाणून घ्या.
'ही' डिश सर्वात जास्त ऑर्डर केली गेली होती : गतवर्षीप्रमाणे यंदाही बिर्याणीने इतर सर्व पदार्थांना मागे टाकत सर्वाधिक ऑर्डर केलेल्या डिशचा मुकुट पटकावला आहे. बरं यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही कारण ती गेल्या आठ वर्षांपासून अव्वल आहे. या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मच्या 2023 च्या अहवालानुसार, दर सेकंदाला सुमारे 2.5 बिर्याणीची ऑर्डर देण्यात आली होती, परंतु केवळ बिर्याणीच नाही तर इतर अनेक पदार्थ आहेत ज्यांनी यावर्षी नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. यंदा केवळ डिशेसच नव्हे तर काही ग्राहकांनीही नवे विक्रम केले आहेत.
'हा' झाला स्टार ऑर्डरर : यंदा मुंबईतील एका रहिवाशाने एका वर्षात ४२.३ लाख रुपयांचे खाद्यपदार्थ मागवले आहेत. या व्यक्तीने एवढ्या पैशांचे जेवण ऑर्डर करून नवा पण आश्चर्याचा विक्रम रचला. त्याचवेळी झाशीतील एका व्यक्तीने एका दिवसात 269 खाद्यपदार्थांची ऑर्डर दिली. भुवनेश्वरमधील एका व्यक्तीने एका दिवसात 207 पिझ्झाची ऑर्डर दिली. चंदीगडमधील एका कुटुंबाने एकाच वेळी ७० प्लेट बिर्याणीची ऑर्डर देऊन बिर्याणी ही भारतातील सर्वाधिक ऑर्डर केलेली डिश का आहे हे सिद्ध केले आणि या वर्षी वापरकर्त्याने केलेल्या एकूण ऑर्डरची संख्या १६३३ झाली. लोकांना ही डिश इतकी आवडते की या डिलिव्हरी अॅपवर सुमारे 20 लाख लोकांनी त्यांच्या पहिल्या ऑर्डरसाठी बिर्याणीची निवड केली आणि या प्लॅटफॉर्मवर बिर्याणी सुमारे 40 लाख वेळा शोधली गेली.
'हे' पदार्थही जिंकले : काही पदार्थ इतके प्रभावी ठरले आहेत की ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. यावर्षी दुर्गापूजेच्या वेळी बंगालच्या प्रसिद्ध गोड रसगुल्ल्याऐवजी गुलाब जामुन हा सर्वात जास्त ऑर्डर केलेला पदार्थ होता. या वर्षी बेंगळुरूहून 80 लाख चॉकलेट केक मागवण्यात आले होते. त्याच वेळी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी भारतभर दर मिनिटाला 271 केक ऑर्डर केले जातात. अशा परिस्थितीत भारत आणि येथील लोक त्यांच्या खाद्यपदार्थांसाठी जगभरात का ओळखले जातात, हे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा :