ETV Bharat / sukhibhava

Exercise Improves Brain Health : व्यायामामुळे सुधारते मेंदूचे आरोग्य, रासायनिक सिग्नल करतात 'असे' कार्य - हिप्पोकॅम्पस

व्यायामाचा शरीराला चांगलाच फायदा होतो. मात्र व्यायामादरम्यान स्नायूच्या माध्यमातून सोडण्यात आलेले सिग्नल मेंदूतील न्यूरोनल विकासाला प्रोत्साहन देत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

Exercise Improves Brain Health
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 19, 2023, 1:17 PM IST

वॉशिंग्टन : व्यायाम हा शरीरासाठी आवश्यक असलेला घटक असून त्यामुळे शरीर निरोगी राहते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही सुधारण्याचा व्यायाम हा एकमेव मार्ग असल्याचा वारंवार उल्लेख केला जातो. मात्र व्यायामामुळे मेंदूचे आरोग्य सुधारत असल्याचा दावा बेकमन इन्स्टिट्यूट फॉर अ‍ॅडव्हान्स्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी केला आहे. व्यायामादरम्यान स्नायूंद्वारे सोडण्यात येणारे रासायनिक सिग्नल मेंदूतील न्यूरोनल विकासाला कसे प्रोत्साहन देतात, याबाबतचे संशोधन या संशोधकांनी केले आहे.

व्यायामाने सुधारते मेंदूचे आरोग्य : व्यायामामुळे शरीर निरोगी राहुन व्यक्तीला व्यायामाचा चांगलाच लाभ होतो. मात्र व्यायामामुळे स्नायू आकुंचन पावल्याने ते रक्तप्रवाहात विविध संयुगे सोडतात. ही संयुगे मेंदूसह शरीराच्या वेगवेगळ्या भागात जाऊ शकतात. विशेषतः हिप्पोकॅम्पस नावाच्या मेंदूच्या एका विशिष्ट भागाला व्यायामाचा फायदा होऊ शकतो, असा दावा या संशोधकांनी केला आहे. बेकमन इन्स्टिट्यूट फॉर अ‍ॅडव्हान्स्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी केलेले हे संशोधन न्यूरोसायन्स जर्नलमध्ये प्रकाशीत करण्यात आलेले आहे.

हिप्पोकॅम्पस स्मरणशक्तीसाठी आहे महत्वाचे : हिप्पोकॅम्पस हे शिक्षण, स्मरणशक्तीसह आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचा दावा इलिनॉय अर्बाना चॅम्पेन विद्यापीठातील संशोधक युन ली यांनी केला आहे. व्यायाम कसा करावा हे समजून घेण्यासाठी हिप्पोकॅम्पसचे फायदे आहेत. त्यामुळे स्मृतीभ्रंश आजारासह विविध आजारांवर व्यायामावर आधारित उपचार होऊ शकतात, असा दावाही त्यांनी केला आहे. स्नायूंच्या आकुंचनातून बाहेर पडणारी रसायने वेगळे करण्यासह हिप्पोकॅम्पल न्यूरॉन्सवर त्यांची चाचणी करणे गरजेचे होते. त्यासाठी संशोधकांनी उंदरांकडून लहान स्नायू पेशींचे नमुने गोळा केले. त्यानंतर प्रयोगशाळेतील सेल कल्चर डिशमध्ये ते वाढवले. जेव्हा स्नायू पेशी परिपक्व झाल्यानंतर त्या स्वतःच आकुंचन पावू लागतात. त्यांचे रासायनिक संकेत सेल कल्चरमध्ये सोडत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

हिप्पोकॅम्पल पेशींवर होतो परिणाम : या संशोधकांनी स्नायू पेशींमधून रासायनिक सिग्नल असल्याचा दावा केला आहे. हिप्पोकॅम्पल, न्यूरॉन्स आणि अॅस्ट्रोसाइट्ससह इतर सपोर्ट पेशींच्या वाढीचा संशोधकांनी मागोवा घेतला. यावेळी इम्युनोफ्लोरोसंट आणि कॅल्शियम इमेजिंगसह न्यूरोनल इलेक्ट्रिकल रेकॉर्ड करण्यासाठी मल्टीइलेक्ट्रोड अॅरेसह अनेक उपायांचा वापर केला. या रासायनिक सिग्नलच्या प्रदर्शनाचा हिप्पोकॅम्पल पेशींवर कसा परिणाम होतो हे संशोधकांनी तपासले. मात्र संशोधकांनी केलेल्या संशोधनात धक्कादायक परिणाम उघड झाले. यात स्नायू पेशींच्या आकुंचनातून रासायनिक सिग्नल्सच्या संपर्कात आल्याने हिप्पोकॅम्पल न्यूरॉन्स मोठ्या प्रमाणात विद्युत सिग्नल तयार करतात. हे मजबूत वाढीसह चांगल्या आरोग्याचे लक्षण असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. काही दिवसातच न्यूरॉन्सने हे विद्युत सिग्नल अधिक समकालिकपणे फायर करण्यास सुरुवात केली. न्यूरॉन्स एकत्रितपणे अधिक परिपक्व नेटवर्क तयार करत असल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे.

हेही वाचा - Dead Satellite To Crash Into Earth : मृत उपग्रह बुधवारी कोसळणार पृथ्वीवर, मानवाला धोका नसल्याचे नासाने केले स्पष्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.