ETV Bharat / sukhibhava

जाणून घ्या, पुरुषांचा सेक्स संप्रेरक टेस्टोस्टेरॉनबद्दल

author img

By

Published : Aug 15, 2020, 11:38 AM IST

पुरुष लैंगिक संप्रेरक, टेस्टोस्टेरॉन वृषणात तयार होणारा एक स्टिरॉइड संप्रेरक आहे. हा केवळ सेक्ससाठीच नाही तर इतर अनेक गोष्टींसाठी महत्त्वाचा ठरतो. आमचे तज्ज्ञ अँड्रोलॉजिस्ट डॉ. राहुल रेड्डी यांनी पुरुषांचा सेक्स संप्रेरक टेस्टोस्टेरॉनबद्दल अधिक माहिती दिली आहे.

Everything about the Male sex hormone Testosterone
टेस्टोस्टेरॉन

शरीराच्या विकासासाठी टेस्टोस्टेरॉन

हे संप्रेरक स्नायूंची वाढ, हाडांची मजबुती आणि पुरुषांच्या दाढी, मिशी आणि छातीवरचे केस यांच्या वाढीसाठी उपयोगी असते. पुरुषांचा आवाजही याच्यामुळेच विकसित होतो. या संप्रेरकाची पातळी कमी असेल तर पुरुषांना टक्कल पडते. हे संप्रेरक रक्तपेशींच्या निर्मितीसदेखील जबाबदार आहे. जेव्हा संप्रेरकाची पातळी कमी होते तेव्हा पुरुषाच्या शरीरात काय बदल घडतात ते पाहूया-

लैंगिक कृतीसाठी टेस्टोस्टेरॉन

एखाद्याच्या लैंगिक इच्छेसाठी टेस्टोस्टेरॉन महत्त्वाची भूमिका पार पाडते. यामुळे शुक्राणूंची संख्या ठरते आणि प्रजनन क्षमताही निश्चित होते. लैंगिक वर्तन आणि जननेंद्रियांची निर्मिती यातही या संप्रेरकाचा महत्त्वाचा सहभाग असतो. या संप्रेरकामुळे लैंगिक उत्तेजना वाढते आणि लैंगिक वर्तन सुधारते. शिवाय यामुळे प्रजनन क्षमताही राखली जाते.

मनासाठी टेस्टोस्टेरॉन

या संप्रेरकामुळे पुरुषाची आकलन क्षमता सुधारते. पुरुषातली आक्रमकता वाढते (टेस्टोस्टेरॉनची पातळी सर्वसामान्य असते ) आणि कदाचित नैराश्य, अस्वस्थता येऊ शकते. ( जेव्हा ही पातळी कमी होते ). तुम्हाला आल्हाददायी वाटत असेल तर त्यालाही हे संप्रेरक कारणीभूत आहे. यामुळे तुमचे मूड्स आणि वागणेही सुधारते.

पुरुषांमध्ये या संप्रेरकाची पातळी २.८-८ एनजी/ डीएल असायला हवी. अर्थात हे वयावर अवलंबून असते. १८ वर्षांच्या मुलाकरता टेस्टोस्टेरॉनची पातळी ७-८ एनजी/ डीएल असायला हवी. तर ६० वर्षांच्या पुरुषांत ती २.८ ng/dl हवी. २५ वर्ष आणि ४५ वर्षांच्या मधल्या पुरुषांमध्ये ही पातळी ४-६ एनजी/ डीएल असायला हवी.

स्मरणशक्तीसाठी टेस्टोस्टेरॉन

टेस्टोस्टेरॉनमुळे स्मरणशक्ती सुधारते. याची पातळी कमी असेल तर व्यक्तीला विस्मरण होते. वृद्ध लोकांमध्ये ही लक्षणे दिसून येतात.

जेव्हा पुरुषांमध्ये ही पातळी कमी असेल तर केस गळणे, केसांची वाढ सावकाश होणे, स्नायू दुबळे असणे ही लक्षणे दिसतात. अशा पुरुषांना औदासिन्य येते. ते दु:खी राहतात. कामवासनेचा अभाव, स्नायू कमकुवत होणे, हाडे ठिसूळ होणे ही टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होण्याचे परिणाम आहेत. ही पातळी कमी झाल्याने आणखी जाणवणारे परिणाम म्हणजे शुक्राणूंची संख्या कमी होते आणि प्रजनन पातळीही कमी होते.

टेस्टोस्टेरॉनची पातळी जास्त असणारी व्यक्ती आक्रमक असते. त्या व्यक्तीची लैंगिक इच्छा विकृत असू शकते. बऱ्याचदा यातूनच स्त्रिया आणि मुलांविरोधात होणारे गुन्हे घडतात.

अनेक घटकांमुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी खालावते. त्यात अल्कोहोल आणि बैठी जीवनशैली ही महत्त्वाची कारणे आहेत. याशिवाय डी जीवनसत्त्वाची कमतरता आणि पुरेशी झोप न मिळणे हीसुद्धा यामागे कारणे आहेत. हा संप्रेरक पुरुषाच्या शरीरात असंख्य मार्गांनी मदत करतो, त्यात मुख्य कार्य आहे लैंगिक क्रिया. निरोगी लैंगिक जीवन टिकवण्यासाठी, एखाद्याची टेस्टोस्टेरॉनची पातळी योग्य असणे महत्त्वाचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.