हैदराबाद : टाचांना भेगा पडण्याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये लठ्ठपणा, चुकीच्या आकाराचे शूज घालणे, जास्त वेळ उभे राहणे, टाचांवर कोरडी त्वचा येणे, पायांची योग्य काळजी न घेणे, पाय स्वच्छ न ठेवणे यांचा समावेश होतो. या त्रासदायक समस्येपासून तुम्ही घरच्याच काही सोप्या पद्धतींनी पाय मऊ करू शकता. चला तर मग आज जाणून घेऊया भेगा पडलेल्या टाचांसाठी काही सोपे घरगुती उपाय.
- केळी : केळी मॉइश्चरायझर म्हणून काम करते, ज्यामुळे पायांमध्ये आर्द्रता टिकून राहते आणि आपली त्वचा कोरडी होण्यास प्रतिबंध होतो. २ पिकलेली केळी मॅश करून गुळगुळीत पेस्ट बनवा. ही पेस्ट सर्व पायावर लावा, ती नखे आणि बोटांच्या बाजूला देखील लावता येते. 20 मिनिटे राहू द्या आणि नंतर पाण्याने पाय धुवा.
- मध : नैसर्गिक अँटीसेप्टिक म्हणून ओळखले जाणारे मध पायाला भेगा न पडण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कोमट पाण्यात एक कप मध मिसळा. पाय स्वच्छ करा आणि या मिश्रणात बुडवा नंतर पायाला आणि घोट्याला २० मिनिटे मसाज करा. यानंतर आपले पाय स्वच्छ पाण्याने धुवा. नंतर वाळवून पायांना मॉइश्चरायझर लावा. काही आठवडे झोपण्यापूर्वी हे नियमितपणे करा.
- व्हॅसलीन आणि लिंबाचा रस : लिंबूमध्ये ऍसिडिक गुणधर्म आढळतात. भेगा पडलेल्या टाचांवर तुम्ही लिंबू वापरू शकता. आपले पाय कोमट पाण्यात सुमारे 15 मिनिटे बुडवून ठेवा. यानंतर, धुवा आणि वाळवा. आता एक चमचा व्हॅसलीन आणि काही थेंब लिंबाचा रस एकत्र मिसळा. ते तुमच्या घोट्यावर आणि पायाच्या इतर भागांवर नीट लावा. ही पेस्ट लावल्यानंतर सुती मोजे घाला आणि रात्रभर ठेवा. त्यानंतर सकाळी पाय धुवा. तुम्ही हे काही दिवस रोज करू शकता.
- खोबरेल तेल : खोबरेल तेल त्वचेला चांगले पोषण देते. हे नैसर्गिकरित्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ देखील आहे आणि सुजलेल्या आणि क्रॅक झालेल्या टाचांमध्ये संसर्ग टाळण्यास मदत करू शकते. झोपण्यापूर्वी दररोज 5 ते 10 मिनिटे कोमट खोबरेल तेलाने पायाची मसाज करा. सकाळी उठून पाय धुवा.
हेही वाचा :