न्यूयॉर्क : गर्भधारणेदरम्यान मातेला कोरोनाचा संसर्ग झाला असल्यास त्यांच्या बाळांना अनेक आजाराने ग्रासल्याचे उघड झाले आहे. आता मात्र अशा बाधित मातेच्या प्रसूतीनंतर त्यांच्या मुलाला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर हा आजार होण्याचा दावा संशोधकांनी केला आहे. SARS-CoV-2 संसर्गाने बाधित असलेल्या मातेच्या प्रसूतीनंतर हा आजार पहिल्या 12 महिन्यातच मुलाला होत असल्याचेही या संशोधकांनी स्पष्ट केले आहे.
मुलांना होतो ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर आजार : कोरोनामुळे बाधित झालेल्या गरोदर महिलांना प्रसूतीनंतर जन्मलेल्या बाळाला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर होण्याचा दुप्पट धोका आहे. या बाळांना प्रसूतीनंतर पहिल्या 12 महिन्यात हा आजार ग्रासत असल्याचा दावा मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल (MGH) च्या संशोधकांनी केला आहे. मात्र या आजाराचा धोका मुलींना होत नसल्याचेही या संशोधकांनी स्पष्ट केले आहे. मुलांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण ४२ टक्के असल्याचेही या संशोधकांनी स्पष्ट केले आहे.
मुलाला द्यावे लागते असुरक्षिततेशी तोंड : मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलच्या संशोधकांनी याबाबत संशोधन करुन काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. SARS-CoV-2 संसर्गाशी लढा देताना मुलाला असुरक्षिततेशी तोंड द्यावे लागल्याचे या संशोधनाच्या संशोधक एंड्रिया एडलो यांनी यावेळी स्पष्ट केले. मागील अभ्यासांमध्ये गर्भधारणेदरम्यान इतर संसर्ग आणि मुलांमध्ये न्यूरोडेव्हलपमेंटल विकारांचा धोका वाढलेला आढळला आहे. यात ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर या आजाराचेही निदान झाले होते. मात्र गर्भधारणेदरम्यान SARS-CoV-2 संसर्गाशी असा संबंध आहे की नाही हे स्पष्ट झाले नव्हते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या संशोधकांनी कोरोना महामारीत 18 हजार 355 जन्मलेल्या मुलांच्या इलेक्ट्रॉनिक आरोग्य नोंदी तपासल्याचा दावा केला आहे. यात गर्भधारणेदरम्यान SARS-CoV-2 पॉझिटिव्हिटी असलेल्या 883 गरोदर महिलांचा समावेश असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
12 महिन्यात न्यूरोडेव्हलपमेंटल निदान : या संशोधकांनी गोळा केलेल्या नमुन्यावरुन फक्त मुलांनाच ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील SARS-CoV-2 संसर्ग झालेल्या 883 मुलांपैकी 26 जणांना पहिल्या 12 महिन्यात न्यूरोडेव्हलपमेंटल निदान झाले. तर इतर मुलांपैकी 317 जणांना असे निदान मिळाले नाही. लसीकरणाने धोका कमी झाल्याचे निर्धारित करण्यासाठी खूप कमी मातांना लसीकरण करण्यात आल्याचेही संशोधकांनी स्पष्ट केले. मात्र याबाबत स्पष्ट करण्यासाठी पुढील अभ्यासाची गरज असल्याचेही एंड्रिया एडलो यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा - World Unborn Child Day 2023 : न जन्मलेल्या चिमुकल्यांची आठवण करुन देतो जागतिक अनबॉर्न चाईल्ड डे