मुंबई - (महाराष्ट्र) - होमिओपथीमध्ये वापरले जाणारे कोविड-१९ नोसोड्स हे औषध सध्या सर्व लोकांमध्ये औत्सुक्याचा विषय ठरले असून त्याबाबत वेगवेगळ्या प्रकारचे समज आणि गैरसमजही पसरलेले आहेत. हे औषध कोविड-१९ आजारावर लसीला पर्याय म्हणून मानले जाते. कोविड-१९ नोसोड्समुळे कोरोनापासून बचाव होत असल्याचे आणि कोरोनाला प्रतिबंधक म्हणूनही या औषधाने जोरदार यश मिळवले असल्याने त्याच्या या भूमिकेबद्दल लोकांच्या मनात आज अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी टीम सुखीभवने होमिओपथी रोगनिदान संशोधक आणि तज्ञ डॉ. राजेश शहा यांच्याशी चर्चा केली. शहा हे मुंबईच्या लाईफ फोर्स होमिओपथी अँड बायो सिमिलियाचे प्रमुख आहेत. डॉ. शहा यांनी शास्त्रीय आधारावर संशोधन करून जगातील पहिले कोविड-१९ नोसोड विकसित केले आहे, हे उल्लेखनीय आहे. (नोसोड्स हे एक होमिओपथीतील औषध आहे आणि नेहमीच्या साबुदाण्याच्या आकाराच्या गोळ्यांसारखेच ते असते).
लस म्हणजे काय?
डॉ. शहा यांच्या म्हणण्यानुसार, नोसोड्स आणि लस यांची तुलना करण्याअगोदर लस म्हणजे काय असते आणि ती शरिरात कसे कार्य करते, हे अगोदर जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. रोगनियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या(सीडीसी) तज्ञांनुसार, कोणताही आजार, विषाणु किंवा संसर्गाशी लढण्यासाठी लस शरिराला सुसज्ज करत असते. लसीमध्ये आजाराला कारण ठरणाऱ्या एखाद्या जिवाणुचे काही दुर्बल किंव निष्क्रिय अंश असतात. हे अंश शरिरातील रोगप्रतिकारक शक्ति प्रणालीला कोणताही नवीन विषाणुचा संसर्ग ओळखण्यासाठी प्रेरित करतात आणि त्यांच्या विरोधात शरिरात अँटिब़ॉडीज (प्रतिपिंड) तयार करतात. हे प्रतिपिंड नंतर शरिराला कोणत्याही विषाणुच्या बाह्य हल्ल्यांशी लढण्यात मदत करतात.
कोविड-19 नोसोड्स
होमिओपथीचे डॉक्टर्स आणि या क्षेत्रातील जाणकार लोक कोविड-19 नोसोड्सना कोविड प्रतिबंधक लसीला पर्याय किवा लसीच्या समकक्ष म्हणून दर्जा देत आहेत. कोविड-19 नोसोड्स शरिरात अगदी लसीप्रमाणेच प्रतिकारशक्ति निर्माण करतात, असे त्यांचे म्हणणे आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नोसोड्सच्या भूमिकेबद्दल डॉ.शहा यांनी अधिक स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, नोसोड्सची निर्मिती गेल्या दीडशे वर्षांपासून आपल्या वातावरणात असलेले बॅक्टेरिया आणि विषाणुना लक्षात घेऊन करण्यात येते. गेल्या काही वर्षांत अनेक प्रकारच्या होमिओपथिक नोसोड्सची निर्मिती करण्यात आली असून विविध प्रकारचे विषाणु, जिवाणु आणि परोपजीवी विषाणु ज्यांना पॅरासाईट्स म्हटले जाते, त्यांना वापरून नोसोड्त यार केले आहेत. इन्फ्लुएंझा, लेप्टोसिरोसिस आणि डेंग्यूच्या किटाणुंना घेऊन तयार करण्यात आलेल्या अशा प्रकारच्या नोसोड्सचा प्रयोग केला असता, शरिरात संबंधित आजार आणि संसर्गाना रोखण्याची रोगप्रतिकारक शक्ति ते निर्माण करतात, असे समोर आले आहे. याचसंदर्भात, इन्फ्लुएंझा, लेप्टोसिरोसिस आणि डेंग्यूच्या किटाणुंना घेऊन तयार करण्यात आलेले नोसोड्स कोरोनापासून बचावासाठीही उपकारक ठरले असल्याचे ब्राझिल आणि क्यूबा या देशातील संशोधनातून आढळले आहे.
भारतातही कोविड नोसोड्सची निर्मिती
सर्वप्रथम चिनमधून संपूर्ण जगात कोविड-१९च्या संसर्गाचा प्रसार झाल्यापासूनच जगभरातील होमिओपथी संशोधक कोविड-१९पासून बचावासाठी कोविड नोसोड्स तयार करण्यासाठी विचार करू लागले होते आणि त्यादिशेने प्रयत्न सुरू केले होते, असे डॉ. शहा सांगतात. मार्च २०२० पासूनच मुंबईची हाफकिन इन्स्टिट्यूट आणि गुजरात विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या विषयातील तज्ञांच्या साथीने आंतरराष्ट्रीय ओईसीडी नियमावलीचे पालन करत, होमिओपथी कोविड नोसोड्सच्या निर्मितीचे काम सुरू केले होते, असे शहा यांनी सांगितले. होमिओपथी कोविड-१९ नोसोड्सचा पहिल्या टप्प्यात मानवावर प्रयोग केला असता, या औषधाचा चांगला परिणाम दिसून आला. या औषधाची चाचणी घेतली असता, व्यक्तिच्या शरिरात कोविड विषाणुच्या संसर्गाशी लढण्यासाठी जबरदस्त संरक्षक भिंत निर्माण झाल्याचे दिसून आले. डॉ.शहा यांनी पुढे सांगितले की, नोसोड्सची चाचणी मुबई महापालिकेने आपल्या काही क्वारंटाईन सुविधा केंद्रांमध्येही घेतली असून तेथे नोसोड्सने ६२ टक्क्याहून अधिक यश नोंदवले.
कोरोनापासून बचावाच्या कार्यात कोविड-१९ नोसोड्स यशस्वी
कोविड-१९ नोसोड्स हे संसर्गाच्या बाबतीत अतिसंवेदनशील असलेल्या लोकांच्या शरिरांमध्ये आणि एकाच कुटुंबात रहाणार्या लोकांमध्ये उत्तम परिणाम दाखवतात, असे अनेक प्रयोगांतून आढळले आहे. ज्या व्यक्ति अगोदरच कोविड संसर्गाच्या शिकार झाल्या आहेत, त्यांची लक्षणे कमी करण्यात आणि त्यांच्या संसर्गाचा कालावधी कमी करण्यातही कोविड-१९ नोसोड्स यशस्वी झाल्याचे मानले जाते. जरी अजून या क्षेत्रात संशोधन सुरू आहे, होमिओपथीमध्ये विकसित करण्यात आलेले कोविड नोसोड्सकडे कोरोनाच्या संदर्भात एक उत्तम पर्याय म्हणून पाहिले जात आहे, असे डॉ. शहा यांनी सांगितले.
या विषयावर अधिक माहिती हवी असल्यास info@lifeforce.in वर संपर्क करू शकता.
हेही वाचा -महाराष्ट्राला लवकरच रोज १ लाख रेमडेसिवीरचा पुरवठा होईल - राजेंद्र शिंगणे