ETV Bharat / sukhibhava

Covid Update : जगात कोरोनामुळे मृत्यूंची संख्या शेकडोच्या घरात, वाचा भारतातील परिस्थिती

जगात कोरोनामुळे (Covid 19) सातत्याने मृत्यू होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने जपान, अमेरिका, जर्मनी, ब्राझीलमध्ये मरण पावलेल्यांची संख्या शेकडोच्या घरात आहे. आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले की, टोकियोमध्ये गंभीर लक्षणांसह रूग्णालयात दाखल झालेल्या संक्रमित लोकांची संख्या गुरुवारपेक्षा चार अधिक आहे. देशव्यापी आकडा 659 होता. जपानमध्ये डिसेंबर 2022 मध्ये कोविडमुळे 7688 मृत्यूची नोंद झाली.

Covid Update
जगात कोरोनामुळे मृत्यूंची संख्या शेकडोच्या घरात
author img

By

Published : Jan 8, 2023, 10:41 AM IST

टोकियो : आताही जगातील काही देशांमध्ये कोरोनामुळे सातत्याने मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने अमेरिका (200 मृत्यू), जर्मनी (170), ब्राझील (198 मृत्यू) मध्ये मृतांची संख्या शेकडोच्या घरात आहे. जपानमध्ये शुक्रवारी 456 कोविड-संबंधित मृत्यूची नोंद झाली. ती एका दिवसातील आतापर्यंतची सर्वाधिक आहे. देशात एका महिन्यात हजारो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एका रिपोर्टनुसार, देशात आतापर्यंत 2,45,542 लोकांना कोरोनाची लागण (Coronavirus infection) झाली आहे. गुरुवारी 18,638 च्या तुलनेत शुक्रवारी 20,720 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली.

मृतांची संख्या झपाट्याने वाढली : आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले की, टोकियोमध्ये गंभीर लक्षणांसह रूग्णालयात दाखल झालेल्या संक्रमित लोकांची संख्या गुरुवारपेक्षा चार अधिक आहे. देशव्यापी आकडा 659 होता. जपानमध्ये डिसेंबर 2022 मध्ये कोविडमुळे 7688 मृत्यूची नोंद झाली. मागील कोरोना लाटेदरम्यान ऑगस्टमध्ये नोंदवलेल्या 7,329 चा उच्चांक ओलांडला. आठव्या लाटेच्या सुरुवातीपासून नोव्हेंबरपासून मृतांची संख्या झपाट्याने वाढली (death toll has risen sharply) आहे.

जपानमध्ये कोविड-19 मुळे मरण पावलेल्या लोकांची संख्या : जपानमध्ये गेल्या तीन महिन्यांत कोविड-19 मुळे मरण पावलेल्या लोकांची संख्या गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत सुमारे 16 पट अधिक आहे. या वर्षी 31 ऑगस्ट ते 27 डिसेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत कोविडमुळे मृत्यू झालेल्यांपैकी 40.8 टक्के लोक 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. अहवालात नमूद केले आहे की, मरण पावलेल्या लोकांमध्ये 90 आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांची संख्या 34.7 टक्के आणि 70 वरील लोकांची संख्या 17 टक्के होती. एकूण, 92.4 टक्के मृत्यू या तीन वयोगटांमध्ये (three age groups) झाले आहेत.

भारतात कोरोना (Corona in India) : शनिवारी भारतात कोविड 19 (Covid 19) चे 214 नवीन रुग्ण नोंदवले गेले, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या किरकोळ वाढून 2,509 वर पोहोचली. शनिवारी सकाळी आठ वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, नवीन रुग्णांची संख्या 4.46 कोटी झाली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, संसर्गामुळे आणखी चार रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 5,30,718 झाली आहे. यामध्ये दोन रुग्ण केरळमधील आहेत, ज्यांचा कोविड-19 मुळे मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. याशिवाय गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात एका रुग्णाचा (One patient died in Maharashtra) तर उत्तर प्रदेशात एका रुग्णाचा मृत्यू (One patient died in Uttar Pradesh) झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.