वॉशिग्टन : कृत्रिम गोडवा कोणात्याही व्यक्तीच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. मात्र यूरोप आणि अमेरिकेतील नागरिकांना एरिथ्रिटॉलचा गोडवा हृदयविकाराच्या झटक्यास कारणीभूत ठरू शकत असल्याचा दावा क्लीव्हलँडच्या संशोधकांनी केला आहे. त्यासाठी या संशोधकांनी अमेरिका आणि युरोपमधील तब्बल ४ हजार नागरिकांवर संशोधन केले आहे. यावेळी या संशोधकांनी ज्यांच्या रक्तात एरिथ्रिटॉलचे प्रमाण जास्त आढळले, त्यांनी हृदयविकाराचा झटका, मृत्यू किंवा स्ट्रोक सारख्या आजारांचा धोका असल्याचा दावा करण्यात आला आहे.
रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यात : अमेरिकेतील आणि यूरोपमधील तब्ब्ल ४ हजार नागरिकांच्या रक्ताचे नमुने या संशोधकांनी तपासले आहेत. त्यातून एरिथ्रिटॉल हे रक्तामध्ये गुठळ्या निर्माण करण्यास कारणीभूत असल्याचे दिसून आले. याबाबत जर्नल नेचर मेडिसिनमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात एरिथ्रिटॉलमुळे प्लेटलेट्स सक्रिय करण्यासह गुठळ्या तयार करण्यास हातभार लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे. प्री-क्लिनिकल अभ्यासाने एरिथ्रिटॉलच्या सेवनाने रक्तात गुठळ्या तयार होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे एरिथ्रिटॉल हे आरोग्यास अपायकारक असल्याचे दिसून आले.
हृदय व रक्तवाहिन्यांना धोका : जगभरातील अन्नांसह पेयाच्या हजारो ब्रँडमध्ये कृत्रिम गोड पदार्थाचा समावेश आहे. सध्या युरोपियन अन्न सुरक्षा प्राधिकरण, जागतिक आरोग्य संघटना आणि इतर आरोग्य संस्थांद्वारे या पदार्थाचे पुनर्मूल्यांकन केले जात आहे. यातून कृत्रिम गोडवा आरोग्यास किती धोका आहे, याबाबतची माहिती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासाच्या निष्कर्षांमध्ये एरिथ्रिटॉलच्या वापरामुळे हृदय व रक्तवाहिन्यांना धोका वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे संशोधकांनी कृतीम गोडवा टाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
जागात वाढले हृदयविकारामुळे मृत्यू : अलिकडच्या वर्षांत एरिथ्रिटॉल सारख्या गोड पदार्थांची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे. मात्र त्यांच्या दीर्घकालीन परिणामांबद्दल सखोल संशोधन करणे गरजेचे असल्याचे क्लीव्हलँड क्लिनिकमधील प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीचे सहविभाग प्रमुख स्टॅनले हेझन यांनी सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे आजार कालांतराने वाढतात. त्यामुळे जगात सर्वाधिक मृत्यू हृदयविकाराने होत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे एरिथ्रिटॉलमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचे संशोधक सांगत आहेत. लठ्ठपणा, मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी म्हणूनच एरिथ्रिटॉल असलेली पदार्थ टाळण्याचे सांगण्यात येत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा - Proper Care For Healthy Hair : सुंदर आणि लांब केसांसाठी अशी घ्या आरोग्याची काळजी; दिसाल सुकेशनी