हैदराबाद : भगवान गौतम बुद्ध यांनी अखिल विश्वाला शांतीचा संदेश दिला. त्यामुळे गौतम बुद्ध यांच्या विचाराची गरज आज जगाला असल्याचे मत विविध तज्ज्ञ व्यक्त करतात. गौतम बुद्ध यांचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला आहे. त्यामुळे जगभरात गौतम बुद्धांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. मात्र यावर्षी बुद्ध पौर्णिमेला अनोखा योगायोग येत आहे. त्यामुळे नेमका काय आहे हा योगायोग याविषयीची माहिती आपण जाणून घेऊ.
काय आहे गौतम बुद्ध यांचा इतिहास : गौतम बुद्ध यांचा जन्म लुंबिनी येथे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी इसपू 563 मध्ये राजा शुद्धोधन आणि महामाया यांच्या पोटी झाला. राजकुलीन असलेल्या गौतम बुद्ध यांनी सगळे राज्य सोडून ध्यान करण्यासाठी आपले जीवन व्यथीत केले. गौतम बुद्ध यांनी बौद्धगया येथील बोधी वृक्षाखाली घोर तपस्या केल्यामुळे त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झाले. त्यानुसार गौतम बुद्ध यांनी आपल्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्यांनी स्थापन केलेल्या बौद्ध धर्माचे अनेक अनुयायी झाले. त्यामुळे गौतम बुद्ध यांची किर्ती सर्वदूर पसरली.
वैशाख पौर्णिमेचे महत्व : गौतम बुद्ध हे हिंदू धर्मात जन्मल्याने त्यांना हिंदू धर्मीय त्यांना भगवान विष्णूचा 9 वा अवतार मानतात. त्यामुळे वैशाख पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त होते. गौतम बुद्ध यांना वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच बौद्धगया येथील बोधी वृक्षाखाली दिव्य ज्ञान प्राप्त झाल्याने या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय फार महत्वाची असल्याचे मानतात. तर प्रत्येक पौर्णिमेला जगाचे तारणहार असलेल्या भगवान विष्णूची पूजा हिंदू धर्मीय करतात. त्यामुळे हिंदू आणि बौद्ध अशा दोन्ही धर्माचे नागरिक वैशाख पौर्णिमेला मोठ्या भक्तीभावाने साजरी करतात.
काय आहेत गौतम बुद्धांचे चार आर्य सत्य : भगवान गौतम बुद्ध यांनी जगाला बुद्ध धर्म दिला आहे. आज बुद्ध धर्म जगभरात पसरला आहे. गौतम बुद्ध यांनी नागरिकांना अष्ठांग मार्ग दाखवला आहे. मात्र त्यापेक्षाही त्यांनी जगाला चार आर्य सत्य सांगितले आहेत. हे नागरिकांच्या जगण्याचे सूत्र असल्याचे मानले जाते. यात पहिले आहे दु:ख, दुसरे आहे दुखाचे कारण, तिसरे आहे दुखाचे निदान आणि चवथे आर्य सत्य दुखाचे निवारण हे आहे. भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेल्या या चार आर्य सत्य नागरिकांनी अंमलात आणण्याचे आवाहन गौतम बुद्धांनी आपल्या अनुयायांना केले आहे.
काय आहे वैशाख पौर्णिमेला येणारा योगायोग : वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात येते. यावर्षी वैशाख पौर्णिमेला चंद्रग्रहणाचा योग येत आहे. चंद्रग्रहण पाच मेच्या रात्री 8 वाजून 45 मिनीटांनी सुरू होणार असून ते रात्री एक वाजतापर्यंत राहणार आहे. त्यामुळे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशीच लागणारे चंद्रग्रहण हा योगायोग असल्याचे मानण्यात येत आहे. त्यासह पाच मेच्या दिवशीच सकाळी सुर्योदयापासून 9 वाजून 17 मिनीटापर्यंत सिद्धीयोग असणार आहे. याच दिवशी स्वाती नक्षत्रही असल्याने हा आणखी योगायोग असल्याचे मानण्यात येत आहे. स्वाती नक्षत्र सकाळपासून ते रात्री 09.40 मिनीटापर्यंत राहणार आहे. तर पूजेचा शुभमुहुर्त दुपारी 11.51 ते 12.45 पर्यंत राहणार आहे. त्यामुळे या वर्षी वैशाख पौर्णिमेला विविध योगायोग असल्याने नागरिक मोठ्या धुमधडाक्यात ही पौर्णिमा साजरी करणार आहेत.
हेही वाचा - Chandra Grahan 2023 : जाणून घ्या कधी आहे वर्षातील पहिले चंद्रग्रहण, कुठे दिसेल चंद्रग्रहण