ETV Bharat / sukhibhava

Health tips : रक्तदाब कमी करण्याचा 'हा' आहे उत्तम उपाय - Health tips

तुमच्यासोबत कधी ना कधी असे घडलेच असेल, जेव्हा तुम्ही तुमची आवडती वस्तू खातात आणि त्यात मीठ कमी झाले तर त्या पदार्थाची सारी चव संपते. मीठ अन्नात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. अन्नाची चव वाढवण्याव्यतिरिक्त सोडियम बायकार्बोनेट आणि मोनोसोडियम ग्लूटामेटमध्ये देखील सोडियम आढळते. सोडियम शरीरातील रक्तदाब आणि रक्ताचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते. अशा पदार्थांचे सेवन करणे ज्यामध्ये सोडियमचे प्रमाण खूपच कमी असते, तसेच या गोष्टी आरोग्यासाठीही खूप (best solution for lower blood pressure) फायदेशीर ठरतात. चला या गोष्टींबद्दल जाणून घेऊया...

best solution for lower blood pressure
रक्तदाब कमी करण्याचा उत्तम उपाय
author img

By

Published : Jan 9, 2023, 5:28 PM IST

हैदराबाद : पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर हे हेल्दी रक्तदाबाला नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असतात. या सर्वांव्यतिरिक्त, हिरव्या पालेभाज्या खाणे आणि दररोज व्यायाम करणे देखील उच्च रक्तदाबाच्या लक्षणांमध्ये लक्षणीय सुधारणा करू शकते. उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी जंक फूड टाळा. फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा. मीठ सोडियमचा सर्वात सामान्य स्त्रोत आहे. मीठ ही अशी गोष्ट आहे जी अन्नाच्या सर्व चवींना बांधून ठेवते. शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी करून रक्तदाब (best solution for lower blood pressure) आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करता येतो.

1. काकडी (Cucumber) : काकडी आरोग्यासाठी खूप आरोग्यदायी मानली जाते. काकडीचे सेवन करणे हे शरीरासाठी फायदेशीर (good for health) मानले जाते. शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यापासून ते अनेक पोषक तत्वांची प्राप्तता होण्यासाठी काकडी खाणे लाभदायक ठरते. कारण त्यात कॅलरीज, सोडियम आणि फॅट जवळजवळ नसते. एक कप काकडीत 3 ग्रॅम सोडियम असते, ज्यामुळे तुम्ही ते मुक्तपणे सेवन करू शकता. काकडीत पाण्याची पातळी खूप जास्त असते ज्यामुळे ती शरीराला डिहायड्रेट होऊ देत नाही.

2. सफरचंद (Apple) : फळांमध्ये नैसर्गिकरित्या सोडियम कमी आणि पोटॅशियम जास्त असते. सफरचंदात सोडियमचे प्रमाण खूपच कमी असल्याचे आढळून आले आहे. सफरचंदमध्ये चरबीचे प्रमाण कमी असते आणि ते व्हिटॅमिन सी आणि फायबरचा चांगला स्रोत आहे. सफरचंद आणि इतर फळांमध्ये आढळणारे पॉलिफेनॉल हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. जर तुम्ही सकाळी सफरचंद खाल्ले तर त्यात असलेले फायबर तुमच्या पोटासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. सफरचंदाच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

3. लिंबाचा रस आणि औषधी वनस्पती : जेवणात मीठाऐवजी लिंबाचा रस आणि औषधी वनस्पती वापरून सोडियमचे प्रमाण कमी करू शकता. रोज सकाळी एक ग्लास पाण्यात एक लिंबाचा रस आणि दोन चमचे मध टाकून घेतल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यासोबत लोणचे, पापड, खारवलेले बिस्किटे, सॉल्टेड बटर, चीज इत्यादी जास्त सोडियमयुक्त पदार्थ खाणे टाळावे. आहारात बदल करण्यासोबतच रोज व्यायाम करा.

4. बदाम (Almond) : बदाम हेल्दी स्नॅक मानले जातात. 100 ग्रॅम बदामामध्ये 1 मिलीग्राम सोडियम आढळते. बदामामध्ये अनेक पोषक आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात. व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, प्रथिने, जस्त इत्यादी बदामामध्ये आढळतात. मधुमेह झालेल्या व्यक्तींनी बदाम खाल्ल्यास त्यांची शुगर लेवल नियंत्रणात (lower blood pressure) राहते. जेवणानंतर रक्तात वाढणारी साखरेची पातळी कमी करण्याची ताकद बदामात आहे. बदाम शरीरातील रक्तातील साखरेची पातळी, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. बदाम खाल्ल्याने भूक कमी होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास खूप मदत होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.