हैदराबाद : हिरव्या भाज्यांमध्ये सिमला मिरचीचा देखिल समावेश होतो. सिमला मिरचीची लागवड जगभरात केली जाते. सामान्य भाषेत याला मिरची म्हणजेच सिमला मिरची म्हणतात. ढोबळी मिरची असंही म्हटलं जातं. सिमला मिरचीचा वापर सर्व प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जातो. हिरवी सिमला मिरची आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. हिरव्या सिमला मिरचीबरोबर लाल अणि पिवळी सिमला मिरचीही मिळते. सर्व प्रकारच्या सिमला मिरची पौष्टिकतेने परिपूर्ण आहेत. पण हिरवी सिमला मिरची इतर सर्व सिमला मिरचीपेक्षा जास्त फायदेशीर मानली जाते. हिरव्या सिमला मिरचीमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हिरवी सिमला मिरची खाण्याचे अनेक फायदे आहेत.
पोषणाचा खजिना : हिरव्या सिमला मिरचीला पोषक घटकांचा खजिना म्हणतात. त्यात कॅलरी, प्रथिने, कार्बोहायड्रेट, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम आणि पायरीडॉक्सिन सारखे घटक मुबलक प्रमाणात असतात.
आतड्यांसाठी उत्तम मिरची : हिरव्या सिमला मिरचीचे सेवन आतड्यांसाठी खूप फायदेशीर आहे. हिरव्या सिमला मिरचीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. जे खाल्ल्याने शरीराची पचनक्रिया मजबूत होते आणि आतड्यांमध्ये कॅन्सर सारख्या आजाराचा धोका राहत नाही.
अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध : हिरव्या सिमला मिरचीमध्ये लाल आणि पिवळ्या सिमला मिरचीपेक्षा जास्त अँटी-ऑक्सिडंट घटक असतात. हिरवी सिमला मिरची हा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत देखील मानला जातो. अशा परिस्थितीत हिरवी सिमला मिरची खाल्ल्याने उच्च रक्तदाब, कर्करोग आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
हृदय आणि डोळे निरोगी राहतील : हिरव्या सिमला मिरचीच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखरेची पातळी आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्याचबरोबर हिरव्या सिमला मिरचीमध्ये असलेले ल्युटीन नावाचे घटक देखील डोळ्यांची दृष्टी वाढवण्यास मदत करतात.
वजन कमी करण्यात मदत : शरीराचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी दैनंदिन आहारात सिमला मिरचीचे सेवन उत्तम ठरू शकते. सिमला मिरची फायबर समृद्ध तसंच कमी चरबीयुक्त अन्न आहे. ज्याच्या सेवनाने लठ्ठपणा कमी होतो आणि पोटाची चरबीही नाहीशी होते.
हेही वाचा :