हैदराबाद : केळी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. केळी शरीराला ऊर्जा देते. केळीमध्ये लोह आणि पोटॅशियम खूप जास्त प्रमाणात आढळतं. शरीरातील थकवा दूर करण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी हे खूप फायदेशीर ठरतं. परंतु काही लोकांसाठी केळीचं सेवन हानीकारक ठरतं. काही लोकांना केळी खाल्ल्यानं अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. अशा परिस्थितीत केळी खाण्याचे तोटे जाणून घेऊया-
केळीच्या अतिसेवनानं नुकसान होत : ज्या लोकांचं वजन खूप वाढलं आहे त्यांनी केळी खाणं टाळावं कारण केळीमध्ये भरपूर कॅलरीज असतात. ज्यामुळं वजन वाढतं. यासोबतच केळ्यामध्ये असलेलं फ्रुक्टोज पोटात गॅसची समस्या वाढवतं, ज्यामुळं अनेक समस्या निर्माण होतात. केळीमध्ये प्रोटीनचे प्रमाण खूपच कमी असते, त्यामुळं त्याचं सेवन केल्यानं स्नायूही कमकुवत होतात. तसेच जर तुमची किडनी कमकुवत असेल तर तुम्ही केळीचं सेवन करू नये. केळ्यामध्ये आढळणारं पोटॅशियम किडनीला हानी पोहोचवतं.
केळी खाण्याचे तोटे :
- बद्धकोष्ठता : केळी खाल्ल्यानं बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. अशा स्थितीत ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी केळीचं सेवन कमी प्रमाणात करावं.
- लठ्ठपणा : केळ्यामध्ये फायबर आणि नैसर्गिक साखर असते, दुधासोबत खाल्ल्यास वजन वाढतं.
- अॅसिडिटी : केळी खाल्ल्यानं गॅस आणि पोटदुखीचा त्रास होतो. केळीमध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असल्यानं ते पचायला जास्त वेळ लागतो.
- साखरेची पातळी वाढवते : मधुमेहाच्या रुग्णांसाठी केळी खूप हानिकारक ठरू शकते. केळ्यामध्ये नैसर्गिक साखर असते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. अशा परिस्थितीत मधुमेहाच्या रुग्णांनी केळीचे सेवन कमी प्रमाणात करावे.
या समस्या होतात : केळ्यामध्ये टायरोसिन एमिनो अॅसिड असते, जे शरीरात टायरामाइनमध्ये बदलते. यामुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. केळी खाल्ल्यानंतर अनेकांना सूज आणि एलर्जीचा त्रासही होतो. अशा परिस्थितीत या लोकांनी केळी खाणे टाळावे.
हेही वाचा :