निद्रानाश, झोप न येणे किंवा कमी येणे, ही अशी समस्या आहे, ज्यामुळे इतर गंभीर आजार होऊ शकतात. मात्र, आयुर्वेदमध्ये अनेक प्रक्रिया, उपाय आणि औषधी वनस्पतींची माहिती मिळते, ज्यांचा अवलंब केल्यास निद्रानाशच्या समसेस्यापासून आराम मिळते.
मेलाटोनिनच्या कमतरतेमुळे उद्भवतात झोपेचे विकार
मेलाटोनिन हा हार्मोन रात्री पीनियल ग्रंथिद्वारे स्त्रावित होतो. त्याच्या कमतरतेमुळे झोपेसंबंधी विकार उद्भवतात. हा हार्मोन झोप येणे तथा जाग येण्याच्या चक्राला नियंत्रित करतो. चांगली झोप ही संपूर्ण आरोग्य, चांगली स्मरनशक्ती तथा एकाग्रतेसाठी खूप आवश्यक आहे. झोपेच्या कमतरतेमुळे नागरिकांना उच्च रक्तचाप, लठ्ठपणा, जठर संबंधी समस्या, समन्वयाची कमी, एकाग्रतेची कमी आदी आरोग्यसंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात.
निद्रनाशचे वर्गीकरण
निद्रानाशला आपण दोन मोठ्या श्रेणींमध्ये वर्गीकृत करू शकतो.
१) प्राथमिक निद्रानाश
या प्रकारचा निद्रानाश कुठल्याही आरोग्य स्थिती किंवा आजाराशी संबंधित नाही. मात्र, विशेष परिस्थितीत निर्माण झालेल्या तनावामुळे ही समस्या होऊ शकते. या व्यतरिक्त ध्वनी, प्रकाश आणि हवामान यांसारखे पर्यावरणीय घटक, जेट लॅग तथा कामावर शिफ्टमध्ये बदल या बाबी देखील झोपेला प्रभावित करू शकतात.
२) माध्यमिक निद्रानाश
यात निद्रानाश ही मुळात आरोग्य समस्या जसे, अस्थमा, संधिवात, कॅन्सर, उच्च रक्तचाप, रजोनिवृत्ती आदीमुळे होऊ शकते. त्याचबरोबर, वेदना, एलर्जी, अमली पदार्थांचा (दारू, तंबाखू, कॅफीन) उपयोग आणि काही औषधी देखील झोप न येण्याचे कारण बनू शकते. विशेषकरून, चिंता आणि औदासिन्यसारखी मानसिक समस्या, स्लीप एपनिया, रेस्टलेस लेग सिंड्रोमसारखी झोपेसंबंधी समस्या देखील झोप न येणे किंवा कमी येण्याचे कारण ठरू शकते.
या व्यतरिक्त, निद्रानाशचे दुसरे तीन प्रकार देखील विचारात घेण्यात आले आहे, ज्यांचे वर्गीकरण समस्येच्या कालावधीच्या आधारावर होऊ शकते. ते म्हणजे,
१) क्षणिक निद्रानाश - ही अवस्था एका रात्रीपासून आठवड्यापर्यंत टिकू शकते. सहसा असे प्रवास करणे किंवा नव्या किंवा बदललेल्या वातावरणात झोपल्याने सामान्य झोपेच्या बदललेल्या पद्धतीमुळे होऊ शकते.
२) अल्प मुदतीचा निद्रानाश - ही अवस्था एक ते २ आठवड्यापर्यंत राहू शकते. सामान्यत: मानसिक ताण किंवा चिंता यांसारख्या भावनिक घटकांमुळे होते.
३) तीव्र निद्रानाश - तीव्र निद्रानाशची समस्या एक महिना किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपर्यंत राहू शकते.
निद्रानाशचे लक्षण
निद्रानाशचे लक्षण पुढीलप्रमाणे आहेत:
१) जांभई येणे
२) निद्रा
३) अस्वस्थता /असुविधा
४) थकवा आणि आळशीपणा
५) डोकेदुखी
६) लक्ष केंद्रित करण्यास असमर्थता
७) विसरणे
८) कमकुवत ज्ञानेंद्रिय आकलन क्षमता
९) अपचन
१०) बद्धकोष्ठता
११) वजन कमी होने
निद्रानाश निर्मुलनासाठी आयुर्वेद कशाप्रकार मदत करू शकते?
निद्रानाश दूर करण्यासाठी आयुर्वेदमधील अनेक उपाय, प्रक्रिया आणि औषधी वनस्पतींची मदत घेता येईल, ज्यातील काही पुढील प्रमाणे आहे,
प्रक्रिया
१) अभ्यंग ( तेलाने शरीराची मालीश करणे)
२) चक्षू तर्पण ( औषधीयुक्त तेलाने डोळे भिजवणे)
३) शिरो लेपम ( डोक्यासाठी हर्बल पेस्ट उपचार)
४) मुख लेपम ( चेहऱ्यासाठी हर्बल पेस्ट उपचार)
५) शिरोधारा ( कपाळावर औषधीयुक्त तेल टाकणे)
६) शिरोबस्ती ( औषधीयुक्त तेलांना डोक्याच्या चारही भोवती एका टोपीत टाकणे आणि काही वेळापर्यंत उभे राहू देणे.
७) पाद अभ्यास ( तेलाने पायांची मालीश)
उपाय -
रात्री अर्धा ग्लास दुधात १०-२० मि.ली एरंडेल तेल टाकून त्याचे सेवन करायला हवे.
उपचार -
१) औषधी वनस्पती - अशा अनेक औषधी वनस्पती आहेत ज्या ७ ते १४ दिवसांच्या आत निद्रानाशच्या समस्येला दूर करण्यात उपयुक्त ठरू शकतात. जसे, अश्वगंधा, जटामांसी, ब्राम्ही, मंडुकपर्णी, मांस्यादी क्वाथ, सर्पगंधादि वटी आदी.
२) मानसिक उपचार - मानसिक उपचार मनाला शांत करते, या कार्यात छान गंध, ध्वनी किंवा सुखद स्पर्श, सकारात्मक विचार आणि संतुष्टीची भावना ठेवणे खूप उपयुक्त ठरू शकते. त्याचबरोबर, योग आणि ध्यान हे तनाव कमी करण्यास मदत करू शकतात. ते निद्रानाशचीही प्रमुख कारण आहेत.
उपरोक्त उपचार किंवा इतर उपचार करण्यापूर्वी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा - डॉ. यास्मीन, सहाय्यक प्राध्यापक तथा एमडी, आयुर्वेद, एस.ए.एस.ए.एस आयुर्वेद मेडिकल कॉलेज आंध्रप्रदेश.