हैदराबाद : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक आजार उद्भवत आहेत. अशा आजारांचे परिणाम मानवी शरीरावर झपाट्याने होत आहेत. यामध्ये डायबटीज्, बीपी अणि लठ्ठपणा यांचा जास्त प्रमाणात समावेश आहे. शरीराची हालचाल न होणे, आनुवंशिक समस्या असणे, झोप न लागणे, जास्त ताण आणि अनियमित आहार यासारख्या अनेक सवयी याचे कारण बनू शकतात. हे सर्व रोग एकमेकांशी संबंधित आहेत. लठ्ठपणा हा जसा हाय-बीपीशी निगडीत आहे. त्याचवेळी डायबिटीज लठ्ठपणाशी निगडीत आहे. ह्या आजारांवर नियंत्रण ठेवले तर अनेक समस्या वाढण्याआधीच टाळता येतील. यासाठी एवोकॅडो तुमची मदत करेल.
वजन कमी करण्यासाठी असे फायदेशीर आहे एवोकॅडो :
1. कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि कॅलरीज : एका एवोकॅडोमध्ये फक्त 114 कॅलरीज असतात. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. टाइप 2 मधुमेहाचा धोका यामुळे कमी होतो.
2. एवोकॅडोमध्ये असलेले शक्तिशाली गुणधर्म : एवोकॅडोमध्ये असलेले उच्च फायबर योग्य वजन नियंत्रित करण्यास मदत करू शकतात.
- चांगले फॅट्स - एवोकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असते. हे एखाद्या व्यक्तीला दीर्घ कालावधीसाठी तृप्त ठेवण्यास मदत करते. काहीतरी खावेसे वाटण्याची इच्छाही कमी करण्यास मदत करते. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यताही कमी होते.
- फायबरचे प्रमाण जास्त : भूकेवर नियंत्रण ठेवण्यात आणि आतड्याच्या आरोग्यासाठी फायबर महत्वाचे आहे. जे हृदयरोग, स्ट्रोक, टाइप 2 मधुमेह आणि आतड्यांसंबंधी आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.
3. भरपूर पोषक : एवोकॅडोमध्ये आवश्यक खनिजे, बायोएक्टिव्ह संयुगे आणि सी, ई, के आणि बी-व्हिटॅमिन असतात, जे शरीरासाठी उपयुक्त असतात आणि मेटाबॉलिक सिंड्रोम (मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा) सारख्या अनेक रोगांना प्रतिबंधित करण्यात मदत करतात.
4. डायटिंग सोपे करते : एवोकॅडो हे असेच एक फळ आहे, जे शरीर सहजतेने स्वीकारते आणि ते डायटिंग सोपे करून वजन नियंत्रणात ठेवते. तुम्ही सॅलड, साल्सा किंवा सूपमध्ये एवोकॅडो मिक्स करू शकता.
5. एवोकॅडो बहुमुखी आहे : एवोकॅडोला त्याच्या अनेक गुणधर्मांमुळे बहुमुखी म्हटले जाते. कारण ते ब्रेडवर पसरून सॅलड म्हणूनही खाऊ शकतात. याशिवाय इतरही अनेक प्रकारे याचा वापर करता येतो.
हेही वाचा :