हैदराबाद : शहरात होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. आता मात्र शहरी भागातील हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण असल्यामुळे लहान मुलांना दम्याचा धोका होण्याची शक्यता वाढली आहे. लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ जर्नलमध्ये याबाबतचे संशोधन प्रकाशित झाले आहे. या संशोधनात दमा वाढण्यासाठी जबाबदार असलेल्या हवेतील प्रदूषणांवर संशोधन करण्यात आले.
प्रदूषीत हवेमुळे वाढला मुलांना दम्याचा धोका : हवेत वाढणाऱ्या प्रदूषणांच्या उच्च पातळीमुळे शहरी भागात राहणाऱ्या मुलांना दमा किंवा अटॅकचा धोका वाढत असल्याचा दावा या संशोधनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बहुतेक प्रदूषित हवेत केलेले श्वसन दम्यासाठी जबाबदार मानले जात. मात्र या संशोधनातून शहरी भागातील हवेत प्रदूषण, ओझोन आणि इतर सूक्ष्म कणांसारख्या विषाणूजन्य नसलेल्या घटकांमुळेही मुलांना दम्याचा झटका येण्याचा धोका वाढला आहे. या अभ्यासात वायू प्रदूषण आणि दम्याचा धोका यांच्यातील संबंधाचे बारकाईने विश्लेषण करण्यात आल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे.
प्रदूषमांमुळे दम्याचा धोका वाढतो : शहरी भागातील मुलांना हवेतील मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण ओझोन आणि इतर कणांमुळे दम्याचा झटका येऊ शकतो. त्यामुळे फुफ्फुसाचे कार्य बिघडू शकते, असा दावा या संशोधनात करण्यात आला आहे. या प्रदूषणात हवेतील प्रमाण राष्ट्रीय वायु गुणवत्ता मानकांपेक्षा कमी असले तरीही याचा मुलांना धोका असतो. हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषणामुळे शहरी भागातील मुलांमध्ये दम्याचा झटका येण्याचा धोका कसा वाढवू शकतो, याचा लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात अभ्यास करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
हिवाळ्यात दम्याचे प्रमाण वाढते : लहान मुलांना प्रदूषित हवेमुळे दम्याचा धोका वाढल्याने पालकांमध्ये चिंता पसरली आहे. याबाबत माहिती देंताना या संशोधनाचे संशोधक तथा न्यूयॉर्क मेडिकल कॉलेजमधील पल्मोनोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. अॅलन डॉजर यांनी मुलांमध्ये व्हायरल इन्फेक्शन्स ही खूप सामान्य बाब आहे. दमा किंवा अस्थमाची सर्वात गंभीर प्रकरणे बहुतेक अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन ( URI ) किंवा सर्दी यांना कारणीभूत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरवर्षी व्हायरल इन्फेक्शन आणि दम्याच्या प्रकरणांची संख्या वाढते. बहुतेक हिवाळ्यात याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. वायू प्रदूषण जास्त प्रमाणात असलेल्या भागातील मुलांना हिवाळ्यामध्ये दम्याचा तीव्र झटका येण्याची शक्यता जास्त असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण असलेल्या भागात वायू प्रदूषणामुळे विषाणूजन्य आणि विना विषाणू असलेल्या हवेमुळेही दम्याचा अटॅक येऊ शकतो. त्यामुळे मुलांची प्रकृती बिघडण्याची शक्यता असते.
संशोधकांनी तपासली ९ शहरामधील हवा : संशोधकांनी अमेरिकेतील ९ शहरातील हवा तपासून मुलांच्या दम्याचे प्रमाणही तपासण्यात आले. संशोधकांनी काही जुन्या निरीक्षण अभ्यासातील डेटा आणि सहभागी मुलांच्या जनुकांचे विश्लेषण केले. त्यामुळे विषाणूजन्य आणि विशाषू नसलेल्या हवेतून झालेल्या दम्याच्या तीव्रतेचा संशोधकांनी संबंध तपासला आहे. या संशोधकांनी ६ ते १७ या वयोगटातील २०८ मुलांचा डाटा तपासला. या मुलांच्या श्वासोच्छवासाच्या आजाराची लक्षणे सुरू झाल्यापासून फुफ्फुसाच्या कार्यावरील डेटा आणि नाकासंबंधित नमुने गोळा करण्यात आल्याची माहिती अॅलन डॉजर यांनी दिली. यात श्वासोच्छवासाचा आजार व्हायरल इन्फेक्शनमुळे झाला आहे, की नॉन-व्हायरल घटकामुळे झाला यासाठी संशोधकांनी नाकासंबंधित नमुने वापरल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यासह संशोधकांनी दुसऱ्या गटात ६ ते २० वयोगटातील ४१९ मुलांचा डाटाही तपासल्याची माहिती यावेळी अॅलन डॉजर यांनी दिली.
हेही वाचा - Proper Care For Healthy Hair : सुंदर आणि लांब केसांसाठी अशी घ्या आरोग्याची काळजी; दिसाल सुकेशनी