हैदराबाद: तुम्ही देखील डबल चीनमुळे त्रस्त आहात, तुमच्या हनुवटीखालील अतिरिक्त चरबी तुमची सुंदरता कमी होत आहे का? गळा तसेच हनुवटीखालील अतिरिक्त चरबी ही अनेकांचा चिंतेचा विषय ठरत आहे. विशेषत: स्त्रीयांमध्ये या समस्येबाबत फार चर्चा होताना दिसून येते. अशा परिस्थितीत, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण निरोगी शरीराच्या वजनामुळे डबल चीन दिसून येते. आपल्या चेहऱ्याची जॉलाइन स्पष्टपणे दिसावी, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. डबल चिनची समस्या दूर करण्यासाठी काही साधे-सोपे फेशिअल एक्सरसाइझ तुम्ही करू शकता. जाणून घेऊया सविस्तर माहिती… (Facial Exercises For Double Chin)
डबल चीनसाठी चेहऱ्याचे व्यायाम: (do simple facial exercises)
पहिला व्यायाम- हा व्यायाम खूप सोपा आहे. हे करण्यासाठी, तुम्हाला पाठ सरळ करून खुर्चीवर बसावे लागेल, नंतर तुमचा उजवा हात डाव्या गालावर ठेवावा, त्यानंतर तुमची मान वाकवून चेहरा खाली ढकलण्याचा प्रयत्न करा आणि दुसऱ्या बाजूलाही असेच करा.
दुसरा व्यायाम- पहिला व्यायाम करण्यासाठी, तुम्ही तुमची पाठ सरळ करून बसा. यानंतर तुमचा चेहरा वरच्या दिशेने स्ट्रेच करा. यानंतर चेहरा खाली आणा, हा व्यायाम 10 वेळा करा. असे केल्याने तुम्ही दुडबल चीनपासून मुक्त होऊ शकता.
तिसरा व्यायाम- हा व्यायाम करण्यासाठी, तुम्ही तुमचे ओठ पसरवा. आता जीभ एका बाजूला वळवा आणि नंतर हळू- हळू खाली करा. हा व्यायाम गाल वर उचलण्यासाठी आणि जबडा खाली करण्यासाठी उत्तम आहे.
चौथा व्यायाम- डबल चीन कमी करण्यासाठी तुम्ही हा व्यायाम देखील करू शकता. हे करण्यासाठी, तुम्ही सरळ बसा, त्यानंतर, तुमच्या तोंडात हवा भरा. नंतर उजव्या आणि डाव्या बाजूला तोंडात आळीपाळीने हवा फुंकावी. तुम्हाला हे किमान 30 सेकंद करावे लागेल. हे तुमचे गाल स्लिम करण्यात मदत करते.
(Discailmer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ETV Bharat याची पुष्टी करत नाही.)